जाणून घ्या पॅनकार्ड वरील नंबर मागचं लॉजिक!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

१८ वर्षे पूर्ण झाली की भारतीय नागरिकाला पॅनकार्ड काढावेच लागते, अहो कारण सरकारने घालून दिलेल्या महत्त्वपूर्ण ओळखपत्रांमध्ये पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचे आहे. बँकविषयक, आर्थिक, मालमत्ताविषयक वा शासकीय प्रक्रियांवेळी पॅनकार्डचा उपयोग होतोच. तर अश्या या पॅनकार्डवर एक क्रमांक असतो, जो तुम्ही नक्कीच पाहिला असेल. बऱ्याच ठिकाणी या क्रमांकाबद्दल तुम्हला विचारणाही झाली असेल.

pancard-marathipizza00

तुमच्याही मनात कधीना कधी विचार आला असेल की हा क्रमांक बऱ्याच ठिकाणी विचारला जातो, म्हणजे नक्कीच हा क्रमांक महत्त्वाचा असणार आणि या मागे नक्कीच काहीतरी लॉजिक असणार. अजूनही या क्रमांकामागचा अर्थ तुम्ही शोधत असालं तर तुमचा तो शोध इथे संपणार आहे, कारण आज आम्ही तुम्हाला या क्रमांकामागचे गुपित सांगणार आहोत.

पॅनकार्ड वरील या क्रमांकाला पॅन नंबर म्हणतात. हा पॅन नंबर १० आकडी असतो. हा क्रमांक पाच भागांमध्ये विभागून आपण प्रत्येक भागाचा अर्थ जाणून घेऊया.

 

१) पॅन नंबरमध्ये पहिली तीन इंग्रजी मुळाक्षरे असतात.  ही मुळाक्षरे AAA-ZZZ या सिरीजमधील असतात.

pancard-marathipizza01

समजा एखाद्या पॅनकार्डला AAB ही तीन मुळाक्षरे दिली तर त्या नंतरच्या पॅनकार्डला AAC ही मुळाक्षरे दिली जातात. अश्याप्रकारे प्रत्येक पॅनकार्डवर AAA-ZZZ या सिरीजमधील मुळाक्षरे आढळून येतात.

 

२) चौथे मुळाक्षर हे पॅनकार्ड धारकाचे स्टेट्स दर्शवते. पॅन नंबर मधील हे इंग्रजी मुळाक्षर अतिशय महत्त्वाचे असते.

pancard-marathipizza02

C – म्हणजे कंपनी
P – म्हणजे पर्सन (व्यक्ती)
H – म्हणजे Hindu Undivided Family (हिंदू संयुक्त कुटुंब)
F – म्हणजे फर्म
A – म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन
T – म्हणजे ट्रस्ट
B – म्हणजे बॉडी ऑफ ईंडीव्हिड्यूअल्स
L – म्हणजे लोकल ऑथोरिटी
J – म्हणजे आर्टिफिशियल ज्युरीशियल पर्सन
G – म्हणजे सरकारी संस्था

अश्याप्रकारे प्रत्येक मुळाक्षराचा एक अर्थ आहे. त्यानुसार ते मुळाक्षर त्या पॅनकार्डचे स्टेट्स दर्शवते.

 

३) पाचवं मुळाक्षर हे पॅनकार्ड धारकाच्या आडनावामधील पहिले मुळाक्षर असते.

pancard-marathipizza03

म्हणजे जर तुमचं नाव राहूल राणे आहे तर पाचवं अक्षर हे R असेल.

 

४) त्यापुढील ४ क्रमांक हे 0001 ते 9999 या सिरीजमधील असतात.

pancard-marathipizza04

समजा एखाद्या पॅनकार्डला 1125 हे क्रमांक दिले असतील तर त्या नंतरच्या पॅनकार्डला 1126 हे क्रमांक दिले जातात. अश्याप्रकारे प्रत्येक पॅनकार्डवर 0001 ते 9999 या सिरीजमधील क्रमांक आढळून येतात.

 

५) शेवटचे इंग्रजी मुळाक्षर हे चेक डीजीट असते. जो पॅन नंबरचा फॉर्म्युला पूर्ण करतो.

pancard-marathipizza05

 

असं आहे हे पॅनकार्ड मागचं गौडबंगाल!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?