पुरुषांनो, “#Me Too” सारख्या आरोपात अडकायचं नसेल तर हे १३ नियम तुम्ही पाळायलाच हवेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

‘#मी_टू’ या विषयावर फार सुंदर चर्चा अनेक वाहिन्यांवर चालू आहे. महिला सक्षम होतायत आणि पुढे येऊन तक्रार नोंदवतायत हे प्रेरणादायी आहे.

दुर्दैवाने अजून तरी समाजतल्या क्लास वन महिलांचा यात समावेश होतोय. घराघरातल्या कचरा धुणीभांडी करणाऱ्या मोलकरीण स्त्रिया यात पडतील तेंव्हा जास्त बरं होईल.

तरीही, पुरुषांनी काही मार्गदर्शनपर तत्वे अमलात आणली तर फार छान होईल असा विश्वास वाटतो. सदर तत्वे ही ‘९५ टक्के पुरुष शोषक असतात आणि आयुष्यात प्रत्येक पुरुष कुठे ना कुठे स्त्रीवर चान्स मारून घेतो’ या जगमान्य धारणेतून तयार झालेली आहेत.

त्यामुळे पुरुषांनी स्वतःवर संयम ठेवायचा असेल तर काही पथ्ये पाळावी लागतील. मनाचा कंट्रोल वगैरे काही नसतं. मन फुटलेल्या धरणातून निघणाऱ्या पाण्यासारखं असतं. त्यामुळे काही आचार पाळले तर बरं.

१) अनेकदा कामाच्या अनुषंगाने, विभिन्नलिंगी (स्त्रियांशी) भेट होत असते. ही भेट पहिली किंवा कितवीही असू शकते. शक्यतो उत्तम मैत्री होईपर्यंत सदर स्त्रीला हॉटेलमध्ये किंवा स्वतःच्या ऑफिसात न बोलावता गजबजलेल्या ठिकाणी बोलवावे.

ठाण्यात विवियन मॉलचा फूड कोर्ट भाग यासाठी आदर्श आहे. बसून बोलता येतं, प्रायव्हसी मिळते आणि जागाही पूर्ण उघड्यावर, वरून एसी. सुद्धा. अशा जागी बसण्याचा अजून एक फायदा म्हणजे सगळीकडे भिरभिरत नजर टाकता येते.

परिणामी समोरची व्यक्ती कितीही सुस्वरूप असली तरी ३.५ सेकंदापलीकडे तिला बघावं लागत नाही.

 

dating-inmarathi
unsplash.com

२) ऑफिसात आपल्या हाताखालच्या महिलांना रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवणं पाप आहे. आपल्यापेक्षा त्यांच्यावर संसार अधिक अवलंबून असतो.

 

overtime-inmarathi
videoblocks.com

३) आपल्यासह जर रात्री उशिरापर्यंत थांबणारी आपली महिला सहकारी असेल तर किमान तीनवेळा सीसीटीव्ही कॅमेरा चेक करूनच त्यांच्याबरोबर बसून किंवा त्याच कॅबिनमध्ये काम करावं. अन्यथा दुसरी बरीच लांबची जागा पकडावी.

 

working-late-inmarathi
depositphotos.com

४) महिला सहकाऱ्यांशी वार्तालाप करताना त्यांच्या मोबाईल नंबरला आपल्या फोनमध्ये स्थान देण्याची घाई नको. शिवाय तो मिळवल्यास, व्हाट्सअँपवर ‘हाय’ वगैरे पाठवायची घाई करायची गरज नाही.

 

whatsapp_inmarathi
businesstoday.in

५) माफी मागून कोणी लहान होत नसतो. तोंडून वावगं शब्द आला तर ताबडतोब मोठ्याने जाहीर सॉरी म्हणून टाकावं. तुम्ही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नाही आणि तुमच्यावर काही दंगलींचा आरोप नाही.

 

Apology-inmarathi
leadersinstitute.com

६) लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे की नाही याची खबरदारी घ्यावी. नीट असेल तरच स्त्रीबरोबर एकट्याने २०-२५ सेकंद प्रवास करावा. तिसरी व्यक्ती शक्यतो स्त्री असावी.

म्हणजे व्हिक्टिम्सची संख्या अधिक असली की त्यांची बाजू मजबूत होते. जिन्याने प्रवास टाळावेत.

 

lift-inmarathi
shutterstock.com

७) एकट्याने एखाद्या एकट्या स्त्री सहकाऱ्यासह प्रवास आणि त्यातही लांबचा प्रवास शक्यतो टाळा. प्रवास करावा लागल्यास पब्लिक ट्रान्सपोर्ट कधीही छान. हॉटेलवर राहणं वगैरे महागात पडू शकतं.

 

 

८) सहलींना गेल्यावर आपला अधिकाधिक वेळ मित्रांबरोबर जाईल हे बघा. रात्री अंधारात डीजे वगैरे शक्यतो टाळा. अगदीच नाचायचं असेल तर स्वतःसाठी नाचा. एकटे नाचा पण शक्यतो बहुजिनसी (हेट्रोजिनियस) गृप टाळा.

 

dance_beach_inmarathi
videohive.net

९) शिक्षकांना घरी भेटायला विद्यार्थिनी येणार असेल तर एकतर पालक किंवा तिची मैत्रीण(च) बरोबर असू द्या.

१०) गाडीत अथवा मोबाईलमध्ये समोर विभिन्नलिंगी व्यक्ती असेल तर पुरुषांनी अर्जित सिंग, कुमार सानू, ७० च्या दशकातला किशोरकुमार शक्यतो टाळावेत. जमत असेल तर हेडसेट बेस्ट.

 

listening-to-songs-inmarathi
businessinsider.in

११) आपल्या आस्थापनांचे मालक आपणच असून जर आपल्यालाच व्यक्ती नेमण्याचा अधिकार असेल तर शक्यतो पुरुष व्यक्ती नेमण्याकडे कल असतो. स्त्रियाच हव्यात अशी काही गरज नसेल तर पुरुष नेमला जातो. तो कुठूनही येऊ शकतो, कितीही वेळ थांबू शकतो.

११A ) हाताखालच्या महिला नोकरदाराने कितीही मोठी चूक करू द्या, बोंब नही मारणे का!

 

office-inmarathi
csharplawfirm.com

१२) दारू पिणं महत्वाचं असेल तर पिताना बरोबर कंपनी अत्यंत विश्वासातलीच हवी. दारू प्यायल्यावर आपण काय करतोय हे लक्षात यायला हवं इतकी कमी प्यावी.

त्याचबरोबर पिऊन झाल्यावर आपण काय केलं आणि काय बोललो हे दुसऱ्या दिवशी तुमच्या लक्षात नसेल तर तुमच्या नशिबाची दोरी बळकटच हवी.

 

drink-inmarathi
cbc.ca

१३) सदर कमांडमेंट्स या विवाहित अविवाहित सर्व पुरुषांसाठी असून समोरची व्यक्ती विवाहित की अविवाहित हा मुद्दाच होत नाही. चारित्र्य संपलं की सगळं संपलं. त्यामुळे एवढं करायला हरकत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 41 posts and counting.See all posts by sourabh

One thought on “पुरुषांनो, “#Me Too” सारख्या आरोपात अडकायचं नसेल तर हे १३ नियम तुम्ही पाळायलाच हवेत!

  • October 15, 2018 at 9:18 am
    Permalink

    chan

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?