जेव्हा बछड्यांसाठी ‘माया’ वाघिणीने तोडला होता निसर्ग नियम…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

वाघांची दुनिया तशी बऱ्यापैकी सरळसोट असते. परस्परांच्या इलाख्यात दखल न देणारे वाघ एका ठराविक मोसमात मात्र मिलनाकरता एकत्र येतात. मिलना नंतर वाघ काही दिवस वाघिणीसोबत घालवून आपल्या इलाख्यात निघून जातो. होणाऱ्या अपत्यांचे संगोपन सहसा वाघीण एकटीच करते. आपल्या पिल्लांच्या सुरक्षिततेबाबत वाघीण प्रचंड काळजी घेते. पिल्लं 17-24 महिन्याची होई पर्यंत आईच्या संरक्षणात राहून शिकार करायला शिकतात.

दुसऱ्या नरांच्या अपत्यांना वाघ संभाव्य धोका किंवा स्पर्धक या नजरेने पाहतात आणि अशा अपत्यांना मारून टाकतात. म्हणून अपत्य असणारी वाघीण नर वाघांपासून शक्यतो लांब राहते आणि त्यांना जवळपास फिरकू देत नाही!

 

maya tigress marathipizza 00

 

पण गेल्या काही दिवसात वन्य जीव अभ्यासकांना चक्रावून सोडणाऱ्या काही घटना ताडोबा अभयारण्यात घडत आहेत. अभयारण्याच्या पांढरपाणी विभागातली वाघीण “माया” आणि तिची एक वर्षाची 3 पिल्लं, दोन नर आणि एक मादा, पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. अचानक एक दिवस मायासोबत दिसणारी तिची पिल्लं दिसेनाशी झाली. शिवाय पिल्ले असणारी माया ‘मटकासुर’ नावाच्या नरासोबत मिलन करताना आढळून आली.

काही अफवांच्या अनुसार ‘मटकासुर’ मायाच्या पाठलागावर होता. पांढरपाणीमध्ये दाखल होताच त्याने मायाच्या एका नर असणाऱ्या पिल्लावर हल्ला चढवला. ह्या हल्ल्यात पिल्लू सुखरूप असलं तरी मायाने तिन्ही पिल्लाना एकाकी सोडून मटकासुराशी जवळीक साधली. एका बछडे असणाऱ्या वाघिणीसाठी हे वागणे नेहमीचे नाही.


 

maya tigress marathipizza 01

 

काही दिवसांनी ‘गब्बर’ नावाच्या दुसऱ्या तरण्याबांड नरासोबत झालेल्या लढतीत मटकासुरने पराभव पत्करून पांढरपाणीचा इलाखा सोडून दिला. सध्या माया गब्बरसोबत मिलन करते आहे. मायाचे हे वागणे अभ्यासकांना आश्चर्यचकित करून टाकणारे आहे.

मायाची तिन्ही पिल्लं जिवंत आणि सुखरूप असून आपापल्या वाटेवर आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी चितळ, माकड आणि एका भेकराची शिकार केल्याच्या बातम्या आहेत. हल्लीच पर्यटकांच्या चमूला तिन्ही बछड्यांचे दर्शन घडून आले आहे. एक नर एकटा, तर दुसरा नर आणि मादी एकत्र जंगलात वावरत असल्याचे पहिले गेले आहे.

 

maya tigress marathipizza 02

 

वन्यजीव अभ्यासकांच्या आकलनानुसार मायाचं आधी मटकासुर आणि नंतर गब्बरशी जवळीक साधणं नैसर्गिक नसून पिल्लांच्या सुरक्षिततेच्या हमीकरता उचललेलं पाऊल आहे…! मायाचा इलाखा इतर नर वाघांच्या इलाख्याशी जोडलेला असल्याने पिल्लांची सुरक्षा हवी असेल तर तिला नर वाघांशी जुळवून घेणं भाग आहे.

अन्यथा तिन्ही पिल्लांचा आणि तिचा स्वतःचा जीव धोक्यात आहे. म्हणून स्वतः नर वाघांना गुंतवून ती पिल्लाना त्यांच्यापासून दूर ठेवते आहे!

वन्य प्राण्यांच्या काटेकोर निसर्ग नियमनाची माहिती असणाऱ्यांसाठी हे सगळंच प्रकरण अत्यंत रंजक आहे.

तरी एक गोष्ट निश्चित लक्षात येते : मनुष्य असोत कि वन्यप्रजाती असोत, आई शेवटी आईच असते.

मुलांच्या संरक्षणार्थ ती कुठल्याही गोष्टीला तोंड देऊ शकते…!

माहिती आणि छायाचित्र स्रोत : टाईम्स ऑफ इंडिया

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 32 posts and counting.See all posts by suraj

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *