मुंबई सारख्या आधुनिक शहरात दडलंय एक जुनं गाव

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारताला खूप मोठा इतिहास लाभला आहे. भारताची काही राज्य आणि शहरे अजूनही त्या इतिहासाची आठवण करून देतात. भारतातील ही शहरे भारताच्या विविध जुन्या संस्कृती, परंपरा आणि त्या युगाच्या साक्षीदार आहेत. आता हि जुनी शहरे आधुनिक शहरांमध्ये रुपांतरीत झाली आहेत. पण आजही या शहरांमध्ये जुन्या संस्कृतीचा वारसा लाभेलेल्या काही पाउलखुणा अस्तित्वात असल्याचे दिसून येते.

मुंबई शहरामध्ये देखील असेच एक ठिकाण आहे, जे प्राचीन आठवणी आपल्यात साठवून आजही डौलाने उभे आहे. ते ठिकाण म्हणजे मुंबईच्या माझगाव परिसरातील मॅथेरपॅक्डी हे गाव होय.

परंतु आजही खुद्द मुंबईमध्ये कित्येक वर्षे स्थायिक असलेल्या मुंबईकरांना देखील या प्राचीन गावाबद्दल काहीही माहित नाही.

 

Matharpacady-Village-marathipizza01
livemint.com

 

१८१७ मध्ये लिहिलेल्या ’मँगोज ऑफ माझा गोंग’ ह्या थॉमस मुरेच्या महाकाव्यामधील ‘लल्ला रुख’ कवितेमध्ये या गावाबद्दलचा उल्लेख केला आहे. मुंबईसारख्या आधुनिक शहरामध्ये त्या काळातील संस्कृती जपणारी माणसे आजही या ठिकाणावर वास्तव्य करून आहेत. या गावातील बहुतांश लोकसंख्या ही रोमन कॅथलिक वंश्याची असूनही ते उत्तम मराठी बोलतात. मुंबई शहरामधील माझगाव हा संपूर्ण परिसरच जुना आहे. पूर्वी या परिसराला पोर्तुगीज वसाहत म्हणून ओळखले जाई. आजही या वसाहतीमधील वृद्ध व्यक्तींच्या तोंडून उत्तम पोर्तुगीज भाषा ऐकायला मिळते.

 

Matharpacady-Village-marathipizza02
matharpacadyvillage.com

मॅथेरपॅक्डी गावात आजही काही पोर्तुगीज कुटुंबे आढळतात, आणि आजही आपल्या मूळ देशापासून दूर राहून ते आपली संस्कृती प्रामाणिकपणे जपत आहेत. मुंबईत आज सगळीकडेच जुन्या इमारती तोडून त्या जागी नव्या इमारती बांधण्याचे काम सुरु आहे, पण मॅथेरपॅक्डी आणि डॉकयार्ड रोड सारख्या भागात गेल्यावर तुम्हाला उलट स्थिती आढळून येईल, येथील लोकांनी आपल्या जुन्या संस्कृतीचा वारसा जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे.

मॅथेरपॅक्डी हे गाव मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये स्वतःचे अनोखे आणि स्वयंपूर्ण स्थान टिकवून आहे. हे गाव पोर्तुगीज शैलीतील घरांच्या रचनेसाठी  आणि आंब्याच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे या झाडांना वर्षातून दोनदा आंबे लागतात. वैशिष्टपूर्ण टायलिंग छप्पर आणि वरंडा, विक्री कर कार्यालय, मेघटन कोर्ट, गनपावडर लेन या गोष्टींसाठी देखील पर्यटक या भागाला आवर्जून भेट देतात.

 

Matharpacady-Village-marathipizza03
dnaindia.com

अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे येथे पुरातन चीनी मंदिर देखील आढळते. ते पाहिल्यावर लक्षात येते कश्याप्रकारे या भागात त्या काळी विविध संस्कृतीचे लोक एकत्र राहत होते आणि कश्या प्रकारे आजही त्या आठवणी जपल्या जात आहेत. डिसेंबरमध्ये नाताळला नवीन वर्ष साजरा करण्यासाठी येथे सर्व लोक एकत्र जमतात, तो सोहळा तर नक्कीच पाहण्यासारखा आहे.

 

Matharpacady-Village-marathipizza0
topyaps.com

तर मंडळी, मुंबईत राहूनही तुम्ही या गावाला भेट दिली नसेल तर, नक्कीच लवकरात लवकर वेळात वेळ काढून हे गाव पाहून या. तुम्हालाही जुन्या काळात गेल्यासारखे वाटल्याखेरीज राहणार नाही.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?