मार्क झुकरबर्ग ने फेसबुक निर्माण केले नसते तर काय झाले असते? उत्तर अपेक्षितच आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लहानपणी भाषेच्या परीक्षेत निबंधाला हमखास एक कल्पनाविस्ताराचा विषय असायचा. मी पंतप्रधान झालो तर किंवा अमुक झाले तर, तमुक नसते तर? तसाच हल्ली आपण एक विषय घेऊ शकतो. फेसबुक नसते तर?!

फेसबुक नसते तर आपण काय केले असते किंवा नसते हा नंतरचा विषय झाला – पण स्वतः ज्याने फेसबुकची निर्मिती केली आहे त्या मार्क झुकरबर्ग ने काय केले असते?

Quora वर हा प्रश्न विचारला गेला आणि अभिषेक कुलकर्णी ह्या एका अभ्यासूने फार अभ्यासपूर्ण उत्तर दिलं. त्या उत्तराचं हे मुक्त भाषांतर. मूळ प्रश्न आणि त्यावरील इतर उत्तरं वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

जर फेसबुक बनवलं नसतं तर, कदाचित,  मार्क ला फारसा फरक पडला नसता – कारण त्याने फेसबुक ऐवजी दुसरे काहीतरी बनवले असते…!

mark zuckerberg marathipizza

तो wirehog नावाच्या एका नेट्वर्किंग वेबसाईट वर काम करत होता. त्याने त्याच वेबसाईट वर मेहनत घेऊन त्याचे संपूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित केले असते.

२००४ च्या उन्हाळ्यात Palo Alto येथे फेसबुक ह्या सोशल नेट्वर्किंग साईट वर काम करत असतानाच Andrew McCollum, Mark Zukerberg, Adam D’Angelo आणि Sean Parker ह्यांनी wirehog तयार केले. Wirehog वर जॉईन होण्यासाठी त्याचा आधीच मेंबर असलेल्या व्यक्तीची रिक्वेस्ट आवश्यक होती. त्याशिवाय wirehog जॉईन करता येत नसे. Wirehog हे फेसबुकचेच महत्वाचे फिचर असणार होते. हे फिचर जे फेसबुक वर नाहीत त्यांनाही वापरता येणार होते. Wirehog ऑक्टोबर २००४ मध्ये लाँच झाले होते. पण जानेवारी २००६ ला ते इंटरनेट वरून काढून टाकण्यात आले. जेव्हा wirehog लाँच झाले होते त्याच्या आदल्या वर्षी त्याच सारखे campus only file sharing सर्विस देणारे I2Hub सुद्धा इंटरनेट प्लॅटफॉर्म वर आले होते आणि ते बरेच लोकप्रिय झाले होते. द हार्वर्ड क्रिमसन ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मार्क झुकेरबर्ग म्हणाला होता कि कदाचित फेसबुक सारखेच wirehog सुद्धा जगात पटकन आणि खूप लोकप्रिय झाले असते.

Facebook-wirehog-logo-marathipizza

२०१० साली झालेल्या एका मुलाखतीमध्ये Sean Parker ने सांगितले कि wirehog हे झुकेरबर्ग चे साईड प्रोजेक्ट होते. पण मार्क ने wirehog वरच इतके जास्त लक्ष केंद्रित केले होते कि कदाचित त्यामुळे फेसबुक बंद पडले असते. फेसबुक चे पहिले वर्जन, ज्याला त्यांनी “द फेसबुक” असे नाव दिले होते, त्याच्या निर्मिती नंतर मार्क ने wirehog वरच भरपूर काम करणे सुरु केले होते. त्याच्या ह्या कामामुळे फेसबुक कडे दुर्लक्ष होऊन ते बंद पडू नये असे त्या सगळ्यांना वाटत होते. म्हणून त्यांना (झुकेरबर्ग आणि त्याच्या टीम ला ) फेसबुक वर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी wirehog बंद करावे लागले.

काय होतं Wirehog ?

Wirehog म्हणजे आधीच्या फेसबुक वरची P2P (peer to peer) file-sharing service होती. म्हणजेच मोठ्या फाईल्स एकमेकांना पाठवण्याची सोय. सध्या आपण gmail attachment करून किंवा गूगल ड्राइव्ह वर अपलोड करून एकमेकांना व्हिडीओ, फोटो इत्यादी पाठवतो – तेच करण्याची खास सोय.

जेव्हा २००४ मध्ये त्यांनी ते लाँच केले तेव्हा मार्क काळाच्या पुढच्या टेकनॉलॉजी चा विचार करत होता. हे अँप्लिकेशन फेसबुक वर काम करत होते. ते २००६ पर्यंत व्यवस्थित सुरु होते पण फेसबुक च्या भविष्यासाठी पार्करने ते संपवले. एका आर्टिकल मध्ये मार्क ने म्हटले आहे कि जवळजवळ सगळेच व्यावसायिक हे सुरुवातीला क्रीयेटीव पण अधीर असतात. हा संयोग बऱ्याच वेळा घातक ठरतो. कारण व्यावसायिकांना एका वेळी बऱ्याच गोष्टींसाठी प्रयत्न करण्याची सवय असते. अशा वेळी एक न धड भाराभर चिंध्या असे होऊ शकते. मार्क अशाच जाळ्यात ओढल्या जात होता. २००४ साली Palo Alto येथे काम सुरु केल्यानंतर त्याने त्याचे पूर्ण लक्ष फाईल शेअरिंग सर्विस वर केंद्रित केले – ज्याला त्याने wirehog नाव दिले होते. २००५ पर्यंत wirehog व्यवस्थित काम करत होतं आणि त्याच्या पुढील डेव्हल्पमेंट्वर देखील काम सुरू होतं. फेसबुक वर wirehog बद्दल माहिती देखल होती –

Wirehog is a social application that lets friends exchange files of any type with each other over the web. Facebook and Wirehog are integrated so that Wirehog knows who your friends are in order to make sure that only people in your network can see your files. Facebook certifies that it is okay to enter your facebook email address and password into Wirehog for the purposes of this integration.

Facebook-wirehog-marathipizza

 

फेसबुक तेव्हा लोकांना आवडू लागले होते पण ते पुढे मार्केट मध्ये टिकेल कि नाही ह्याची मार्कला खात्री नव्हती. जेव्हा पहिल्यांदा फेसबुकने मार्क ला फायदा मिळवून दिला तेव्हा मार्कने त्याचे आणि टीमचे संपूर्ण लक्ष फक्त फेसबुकच्या डेव्हलपमेंट कडे केंद्रित केले.

थोडक्यात – फेसबुक निर्माणच झाले नसते तर किंवा चालले नसते तरीही मार्क झुकेरबर्गने wirehog नावाची टेक कंपनी काढली असती.

कोणी असेही म्हणेल कि फेसबुकच तयार नसते झाले तर wirehog कसे आले असते?

अश्या परिस्थितीत – इतर हार्वर्ड ग्रॅज्युएट्स प्रमाणे मार्कसुद्धा गुगल, लिंक्ड-इन किंवा अँपल मध्ये जॉईन झाला असता. तो गुगलला जॉईन झाला असता तर त्याने गुगल प्लस सारखे काहीतरी अँप्लिकेशन काढून गुगलचा भरपूर फायदा करून दिला असता किंवा लिंक्ड-इन मध्ये जॉईन झाला असता तर प्रोफेशनल लोकांसाठी एक सिंगल प्लॅटफॉर्म तयार करून त्याने प्रोफेशनल लोकांचा फायदा करून दिला असता.

थोडक्यात काय तर तो जिकडे गेला असता तिकडे त्याने काहीतरी वेगळे आणि चांगले नक्कीच केले असते.

पण त्याने फेसबुक तयार नसते केले तर आपण काय केले असते, कुठे आपला वेळ घालवला असता, जुने मित्र मैत्रिणी आणि नवीन मित्र मैत्रिणी कुठे शोधले असते, आपण कुठे जातो, काय करतो, काय खातो, काय बघतो , काय वाचतो, काय लिहितो हे लोकांना कसे कळले असते हे प्रश्न मात्र डोक्यात फेर घालून पिंगा घालतात.

सो मार्कभाऊ झुकेरबर्ग…आजची पिढी हि तुमची शतशः आभारी आहे…! कारण तुम्ही आमच्यासाठी फेसबुक आणलंत…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?