पाकिस्तानातील मराठी शाळा- नारायण जगन्नाथ विद्यामंदिर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. जगात मराठी भाषिक कोटींच्या संख्येने आहेत. मराठी भाषेला लाभलेला इतिहास ही अगदी महान आहे, अश्या या मराठी भाषेचा आपल्याला सार्थ अभिमान आहे यात वादच नाही, पण कोठेतरी आपली ही भाषा मागे राहते आहे, तिला तिच्याच मातीत दुय्यम स्थान मिळत आहे हे देखील वास्तव आहे.

हे वास्तव काही आपोआप बदलणारे नाही, ते केवळ आपणच मराठी भाषिक बदलू शकतो.

आज आम्ही तुम्हाला आपल्या या महान भाषेबद्दल एक महत्त्वपूर्ण आणि मान उंचावणारी गोष्ट सांगणार आहोत, जी बहुसंख्य लोकांना माहित नसेल.

 

marathi-school-pakistan-marathipizza01
wikipedia.org

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आपल्या शेजारील पाकीस्तानामध्ये आहे मराठी शाळा आणि शाळेला नाव देखील आहे एका मराठी माणसाचे, आहे कि नाही जबरदस्त बातमी, चला तर जाणून घेऊया या परमुलुखातील पण आपल्या माणसांच्या शाळेबद्दल!


ही शाळा आहे पाकिस्तानच्या कराची प्रांतामध्ये!

 

marathi-scholl-pakistan-marathipizza02
flickr.com

स्वातंत्र्यपूर्व मुंबई (बॉम्बे) इलाख्यात सिंध प्रांतातील कराचीचा समावेश होता. मुंबईवरून अगदी सहजतेने समुद्रीमार्गे काही तासांत कराचीमध्‍ये जाता येत होते. त्‍यामुळे मुंबई, पुणे, कोकणातील अनेक मराठी माणसं कराची शहरामध्ये व्यापार-रोजगारानिमित्त स्थायिक झाली. तर कराचीतीलही अनेक जण मुंबईमध्‍ये स्‍थायिक झाले.

कराचीमध्‍ये आजही मोठ्या संख्‍येने मराठी भाषिक आहेत. येथील मराठी कुटुंबांची आडनावेही भोसले, गायकवाड, मराठे अशी मराठमोळी आहेत.

 

marathi-scholl-pakistan-marathipizza03
dnaindia.com

स्‍वातंत्र्यपूर्व काळापासूनच कराचीमध्‍ये मराठी भाषिकांची संख्‍या लक्षणीय राहिली आहे. पूर्वी कराची ही सिंध प्रांताची राजधानी होती. त्‍यावेळी तेथील मराठी भाषकांच्‍या पुढाकारातून कराचीमध्‍ये शाळा सुरू करण्‍यात आली. एवढेच नाही तर ही शाळा सिंध प्रांतातील पहिली शाळा होती. हे विशेष.

या शाळेत शिकवण्‍यासाठी मुंबईच्या नारायण जगन्नाथ वैद्य या मराठी माणसाला आंमत्रित करण्‍यात आले होते. तेव्‍हापासून आतापर्यंत तिथे ही शाळा सुरू आहे आणि शाळेला देखील त्यांचेच नाव देण्यात आले आहे- ‘नारायण जगन्नाथ विद्यामंदिर’ (एनजेव्‍ही)

 

marathi-scholl-pakistan-marathipizza04
dawn.com

केशव बापूजी बाळ हे या शाळेचे पहिले तर बालाजी विनायक गोखले हे दुसरे मुख्‍याध्‍यापक आहेत. फाळणी पूर्वी या शाळेत बहुतांश विद्यार्थी मराठी होते आहेत. येथे मराठी विषय शिकवलाही जात असे. कराचीमधील प्रमुख शाळांपैकी ही एक शाळा आहे.

 

marathi-scholl-pakistan-marathipizza05
dawn.com

माझ्या मराठीचे बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके !!!

हे देखील वाचा : धर्म बदलला, देश बदलला, तरी आजही मराठी बाण्यासह वावरतो आहे हा ‘बलुचिस्तानचा मराठा’!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “पाकिस्तानातील मराठी शाळा- नारायण जगन्नाथ विद्यामंदिर!

  • December 2, 2018 at 12:09 pm
    Permalink

    अजूनही येथे मराठी भाषिक वास्तव्यास आहेत का ?? आणि मराठी भाषा शिकवली जाते का ??

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *