मराठा क्रांती मोर्चाचा इफेक्ट – सरकारतर्फे मराठा तरुणांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

यंदाच्या वर्षातील सर्वात वादळी गोष्ट कोणती होती तर ती होती – मराठा क्रांती मूक मोर्चा. सकळ मराठा समाजातील पेटून उठलेल्या बांधवांनी आपल्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी रस्त्यावर पाउल ठेवले आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. जिल्ह्या-जिल्ह्यातून तालुका-तालुक्यातून ‘एक मराठा लाख मराठाच्या घोषणा निनादू लागल्या आणि ह्या निव्वळ पोकळ घोषणा नव्हत्या, तर खरंच लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मराठा समाजाने गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपल्या वर झालेल्या अन्यायाचा जाब सरकारला विचारण्यास सुरुवात केली. अपेक्षे प्रमाणे मराठा समाजाच्या गर्जनेने सरकारही हादरले आणि शक्य तितक्या लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मराठा मोर्चाच्या झंझावातात अॅट्रोसीटी कायद्याचा मुद्दा भलताच चिघळला होता. हा कायदा नेमका काय आहे ते जाणून घेण्यासाठी पुढील लेख नक्की वाचा : अॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय रे भाऊ?

maratha-morcha-inmarathi01
firstpost.in

मुंबईमध्ये झालेल्या शेवटच्या मराठा क्रांती मूक मोर्चा नंतर काही महिने उलटले, सरकारकडून काहीही हालचाल दिसत नव्हती. मराठा समाजाने सरकारला तंबीच दिली होती की, “निव्वळ आश्वासनात आम्हाला गुंडाळण्याचा प्रयतन करू नका… अन्यथा येणारा काळ तुमच्या साठी चांगला नसेल” आणि जणू हाच इशारा सरकारने गांभीर्याने घेतलेला दिसतोय. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस सरकारने आर्थिकदृष्ट्या धडपडणाऱ्या मराठा उद्योजकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.


२४ ऑक्टोंबर २०१७ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. ह्या निर्णयांतर्गत मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारांसाठी शून्य व्याजदरावर कर्ज उपलब्द्ध करून दिले जाणार आहे.

 

Devendra-Fadnavis-marathipizza
mid-day.com

म्हणजे –

एखाद्या मराठा तरुणाने दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत फेडण्यात येईल, तसेच कर्जाची मर्यादा ५० लाखापर्यंत ठेवण्यात आली आहे.

मराठा समाजासाठी राज्य सरकारने घेतलेल्या ह्या ऐतिहासिक निर्णयामुळे तळागाळातील खस्ता खाणाऱ्या पण मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असणाऱ्या मराठा तरुणांना मोठे सहाय्य होणार आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *