२०२२ साली भारतीय माणूस थेट अंतराळात जाणार – या भारतीय महिलेच्या जोरावर…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
पृथ्वी ही चपटी नसून गोलाकार आहे आणि चंद्र हा पृथ्वीचा गुलाम नसून स्वतंत्र तारा आहे, हे मनुष्य प्राण्याला समजायला १९ वे शतक उजाडायची गरज पडली. इतकचं काय तर, चंद्रावर माणसालाही यानातून उतरवले गेले. चंद्र, तारे, ग्रह आणि संपूर्ण आकाशगंगेचा अभ्यास सुरू झाला.
अमेरीकेपाठोपाठ सगळे देश सरसावले. कित्येकांनी अंतरिक्षात आपापली याने पाठवण्यास सुरुवात केली. त्यातून खगोल शास्त्राचा खोलवर अभ्यास होण्यास मदत होऊ लागली.
इतकेच नव्हे तर मंगळावर देखील यान पाठवले गेले. काहींचे थोड्या प्रयत्नांत तर, काहींचे अथक परीश्रमांनंतर मंगळावर यान पोहोचले. काही राष्ट्रे अद्यापही मंगळावर यान पाठवण्यात यशस्वी झालेली नाहीत.भारताला मात्र यात चांगलेच यश मिळालेले आहे.
पहिल्याच प्रयत्नात ‘मंगलयान’ या मंगळावर जाणाऱ्या यानाचे प्रक्षेपण झाले. भारतीय विज्ञानसंस्था ISRO ने कोणत्याही देशाच्या सहाय्याविना हे अद्भुत काम करून दाखवले..!

एक चांद्रयान वगळता अंतरिक्षात दूर-दूरच्या ग्रहांवर मानवासहित यान पाठवण्याचा विक्रम कोणत्याच देशाचा नाही. काही याने मानवाला अंतराळात काही अंतरावर घेऊन जाण्यात यशस्वी झाली आहेत. पण मानवांना अंतरिक्षात लांबच्या ग्रहांवर पाठवण्यासाठी सगळ्याच मोठमोठ्या देशांमध्ये संशोधन अजूनही चालू आहे.
अशात मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनू पाहणाऱ्या भारतानेदेखील अंतराळात मानवयान पाठवण्याचा विडा उचललेला आहे.
–
- अंतराळात जाताना अंतराळवीर पांढऱ्या आणि नारंगी रंगाचेच सूट्स का घालतात? जाणून घ्या..
- अंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल?
–
२००७ मध्ये इस्रोचे वैज्ञानिक जी. माधवन नायर यांनी मानवासाहित अंतराळ यान पाठवण्याची वाच्यता केली होती. त्यांचे म्हणणे असे होते की, भारत स्वतःहून असे यान बनवेल आणि त्याचे यशस्वी प्रक्षेपण करेल. भारतीय अॅस्ट्रोनट्स नक्कीच अंतराळात पोचतील.
इस्रोने मानवी कॅप्सूल बनवण्यास सुरुवातही केलेली आहे. ही कॅप्सूल अॅस्ट्रोनट्सना राहण्यासाठी आणि यान कंट्रोल करण्यासाठी असते.

यान बनवण्यास खूप वर्षे लागतात. त्यात खूप प्रयोगही करावे लागतात.
अंतराळवीरांना सुरक्षित पणे अंतराळात नेणे आणि तसेच काही कालांतराने परत आणणे ही मोठी जबाबदारी असते. कल्पना चावलाजींचे उदाहरण आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे इस्रो अत्यंत सावधानपूर्वक हे यान बनवण्याच्या कामी जुंपले आहे.
मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषणात याबाबत भारतीयांना संदेश दिलेला होता. भारताचे पुढचे अंतराळ मिशन हे मानवासहित असेल. २०२२ पर्यंतचे लक्ष ह्या मिशनसाठी ठरवण्यात आले आहे. ह्याला १०,००० करोड रुपयांचा खर्च येणार आहे.
२०२२ साली हे मानवासहित यान अंतराळात पाठवण्याची जबाबदारी मोदींनी एका महिलेला दिलेली आहे. डॉक्टर व्ही. आर. ललितांबिका असे त्यांचे नाव आहे.

ज्याप्रमाणे मंगलयानाच्या यशस्वी उड्डाणामागील शास्त्रज्ञांबद्दल कोणास फारशी माहिती नव्हती. त्याचप्रमाणे ललितांबिका हे नावदेखील कोणालाच माहीत नाहीये.
ISRO मध्ये खूप वर्षे अनेक मिशन मध्ये सामील झालेल्या ह्या ललितांबिका यांना मंगलयानाच्या प्रक्षेपणाचा देखील अनुभव आहे. अशा प्रगल्भ अनुभवातून आलेल्या एका भारतीय स्त्रीला आता अंतराळात मानवासाहित यान पाठवण्याची धुरा सांभाळायची आहे.
इस्रोत अनेक महिला वैज्ञानिक आहेत, त्यांनी वेगवेगळ्या मोहिमांत काम केले असले तरी संपूर्ण मोहिमचे नेतृत्व प्रथमच महिला वैज्ञानिकाला मिळाले आहे.
चला तर जाणून घेऊया कोण आहेत हया डॉक्टर ललितांबिका.
१९८८ साली तिरुवनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये त्या कार्यरत होत्या. रॉकेट च्या बांधणीपासून त्याच्या प्रक्षेपणापर्यंत सगळ्या कार्यात त्यांचे नेतृत्व होते. वैज्ञानिक भाषेत रॉकेट चे ‘कंट्रोल, गाईडन्स आणि सिम्युलेशन’ हे सगळे त्यांच्या अखत्यारीत होते.

ललितांबिका आता ISRO म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन सोबत काम करत आहेत.
त्यांनी खालील काही मुख्य कामांमध्ये आपले बहुमूल्य योगदान दिलेले आहे.
१. इस्रोच्या रॉकेट्सना ‘ऑटो पायलट मोड’ मध्ये वापरण्याची टेक्नॉलॉजी.
२. जिओसिंक्रोनस सॅटेलाईटच्या प्रक्षेपण सहाय्यक यंत्राच्या (लॉचिंग वेहीकल MK-3 ची) बांधणी आणि मांडणी करणाऱ्या चमूचे नेतृत्व.
३. विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर च्या डेप्युटी डायरेक्टरच्या पदावर राहून सगळे प्रोजेक्ट पार पडले आहेत.
४.यापूर्वी इस्रोने एकाच वेळी १०४ उपग्रह सोडले, त्यातही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती.
ललितांबिका यांना प्रक्षेपण सहाय्यक यंत्राच्या (लॉंच वेहीकल टेक्नॉलॉजी) उत्तम योगदानासाठी अस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ‘एक्सलन्स अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आलेले आहे.
याच ललितांबिकाजींनी या मानव यान अभियानाची जोमाने सुरुवात केलेली आहे. या यानाला गगनयान असे नाव देण्यात आले आहे. या यानाचे वेगवेगळे पार्टस, कॅप्सूल्स सध्या बनवले जात आहेत.
डॉक्टर ललितांबिकांच्या एक्सपर्टीज असलेल्या रॉकेट पार्ट्सचे त्यांच्याच देखरेखीत काम चालू आहे. गगनयानाची बांधणी उत्तम झाल्यास त्यातून अॅस्ट्रोनट्स सुरक्षितरित्या अंतराळ वारी करु शकतील.
डॉक्टर ललितांबिकांच्या आतापर्यंतच्या अनुभवाचा खुप फायदा त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना मिळणार आहे. त्या २०२२ चे भारताचे अंतराळ यानाचे स्वप्न नक्कीच पूर्ण करतील अशी सगळ्यांना आशा आहे.
देशाची काही महत्वाची खाती सांभाळण्यासाठी, देशाच्या रक्षामंत्री पदावर आणि आता अंतराळात जाण्याच्या मिशनच्या प्रमुख पदावर देखील एक स्त्रीच आहे. चूल व मूल इतपतच स्त्रीचे आयुष्य मर्यादित करणाऱ्या समाजातून स्त्रिया इतक्या मोठ्या पदावर जात आहेत. आपणा सर्वांना गर्व वाटावा अशीच ही बातमी आहे.
अशा या कर्तुत्त्वसंपन्न डॉक्टर वी. आर. ललितांबिका यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!
–
- अंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत!
- इस्रो मध्ये इंटर्नशिपसाठी कसं अप्प्लाय करावं?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Pingback: संपर्क तुटलेल्या सॅटेलाईटशी तब्बल २ वर्षांनंतर संपर्क जोडला गेला होता...!