भारतात गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी केवळ हा ‘मनिला दोर’च का वापरला जातो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतातली लोकशाही आणि न्यायव्यवस्था ही एक अत्यंत प्रगल्भ व्यवस्था आहे. युरोपमधील अनेक देशांनी देहदंड हादेखील नाकारला आहे परंतु आपण आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये देह दंडाची तरतूद केलेली आहे.
जगभरात देहदंड देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. इलेक्ट्रीक चेअर, लिथल इंजेक्शन किंवा फाशी.

भारतात मात्र इलेक्ट्रीक चेअर अथवा लिथल इंजेक्शन यासारख्या गोष्टींचा वापर केला जात नाही. काही दशकांपूर्वी देहदंड देताना देखील कमी क्रौर्य असलेली पद्धती अवलंबावी यासाठी एक कमिशन बसवण्यात आलं होतं. आणि यातूनच फाशी ही, गुन्हेगाराला देखील कमीत कमी त्रासदायक असलेली देहदंडाची पद्धत आहे असा निर्वाळा या कमिशनने दिला होता.

elcric chair InMarathi

भारतातील सर्वात मोठ्या फाशीच्या शिक्षेबद्दल आजही लोकांच्या मनात मोठे कुतुहूल आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सरार्स कोणत्याही गुन्हेगाराला फाशी दिली जात नाही म्हणा, जर त्याने अक्षम्य गुन्हा केला असेल तरच त्याला न्यायालय फाशीची शिक्षा सुनावते.

१९९१ सालापासून भारतात केवळ २६ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि त्या शिक्षांची अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे. अश्याच या दुर्मिळ शिक्षेबद्दल आज आम्ही तुम्हाला एक रंजक गोष्ट सांगणार आहोत.

तुम्हाला तर माहित असेलच की फाशी देण्यासाठी अतिशय जाड दोर वापरण्यात येतो, जेणेकरून फास तुटू नये आणि तो आवळला जाताच गुन्हेगार त्वरित गतप्राण व्हावा. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की फाशीची शिक्षा देण्यासाठी वापरण्यात येणारा दोर हा केवळ एकाच ठिकाणावरून येतो.

हो खरंच आपल्या देशात फाशी देण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचा दोर वापरला जातो आणि हा दोर तयार होतो फक्त बिहार राज्यातील बक्सरच्या तुरुंगात!

 

manila-rope-marathipizza01
topyaps.com

या दोराला म्हणतात ‘मनिला दोर’! आणि हा दोर केवळ बक्सरच्या तुरुंगातील कैद्यांमार्फतच बनवला जातो. जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होते तेव्हा सरकार बक्सर तुरुंग प्रशासनाकडे या दोराची मागणी करते आणि मग तुरुंग प्रशासन कैद्यांकडून हा स्पेशल मनिला दोर बनवून घेते. ज्याचाच फास काही दिवसांनी गुन्हेगाराच्या गळ्याभोवती आवळला जातो.

या दोराला मनिला हे नाव फिलीपीन्स देशामध्ये मिळाले, कारण हा दोर ज्या फायबर पासून बनवला जायचा ते फायबर फिलिपिन्स देशातील अॅबेका झाडाच्या पानांपासून तयार होते. त्या फायबरला फिलिपिन्स देशामध्ये मनिला हेम्प म्हटले जाते. म्हणून या दोराला मनिला दोर असे नाव पडले.

पण बक्सरच्या तुरुंगामध्ये तयार होणारे मनिला दोर आता मात्र मनिला हेम्प फायबर पासून बनवले जात नाहीत. ते बनवले जातात J-34 कॉटन पासून!

हा दोर केवळ फाशी देण्यासाठीच वापरला जातो असं नव्हे तर जहाजावर आणि मासे पकडायच्या जाळ्यांमध्ये सुद्धा या दोराचा वापर होतो. त्याचे कारण म्हणजे खाऱ्या पाण्यात त्याची टिकाव धरण्याची क्षमता होय.

 

manila-rope-marathipizza03
vattuthietbidelta.com

पण केवळ बक्सरच्या तुरुंगामध्येच हा दोर का तयार केला जातो?

यामागे काही अंशी भौगोलिक कारण आहे. हा तुरुंग गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसला आहे, त्यामुळे सामान्य दिवशी देखील येथील तापमान हे दमट असते. मनिला दोर बनवण्यासाठी दमट वातावरण अतिशय गरजेचे आहे. दमट वातावरणात दोर गुळगुळीत आणि अधिक घट्ट होतात.

गुन्हेगाराचे शरीराचा संपूर्ण भार काही सेकंद थोपवून धरण्यासाठी ज्या दोराने फाशी द्यायची आहे तो दोर गुळगुळीत आणि अधिक घट्ट असणे अत्यावश्यक असते.

बक्सर तुरुंगातील कैदी अतिशय दमट तपमानामध्ये बसून आपल्या खुबीने हा दोर अधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम बनवतात.

दोर बनवण्यापूर्वी ज्या गुन्हेगाराला फाशी देण्यात येणार आहे त्याच्या शरीराचा सर्व तपशील (वजन, उंची वगैरे) तुरुंग प्रशासन मागवून घेते आणि त्यानुसारच दोर बनवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते.

ज्या गुन्हेगाराला फाशी देण्यात येणार आहे त्याच्या उंचीच्या १.६ पट लांबीचा दोर तयार केला जातो आणि इतका जाड बनवला जातो जेणेकरून दोराला गुन्हेगाराचे वजन सहज पेलवेल.

 

manila-rope-marathipizza04
blackpigfenders.co.uk

१९३० सालापासून बक्सर तुरुंगातील कैदी मनिला दोर तयार करत आहेत, म्हणजेच ब्रिटीश राजवटपासून या दोराचा वापर फाशी साठी केला जात आहे.

क्रूरकर्मा अजमल कसाब आणि अफजल गुरु या दोघांच्या गळ्याभोवती देखील याच मनिला दोराने फास आवळला गेला होता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?