' कोरोनाला हरवण्यासाठी अमेरिकेत शिजतेय वेगळीच योजना, अख्ख्या जगावर होऊ शकेल परिणाम – InMarathi

कोरोनाला हरवण्यासाठी अमेरिकेत शिजतेय वेगळीच योजना, अख्ख्या जगावर होऊ शकेल परिणाम

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोनाव्हायरस covid-19 हा विषाणू डोळ्याला तर दिसत नाही, परंतु याने आता जगात थैमान घातलेले आहे. अनेक लोकांना त्याची लागण झाली असून जगभरात त्याच्यामुळे होणार्‍या मृत्यूची संख्यादेखील आता लाखांवर गेली आहे.

मनुष्यजातीची अपरिमित हानी या अदृश्य विषाणूने केली आहे. जगातले अनेक व्यवहार सध्या बंद आहेत. लोक घरामध्ये बंद आहेत. हाहाकार माजणे म्हणजे काय हे सध्याच्या परिस्थितीवरून लक्षात येते.

याचा युरोप आणि अमेरिकेला सगळ्यात जास्त फटका बसला आहे. सध्या तरी अमेरिकेत दररोज सरासरी दोन हजार कोरोना चे बळी जात आहेत. त्यामुळे आता ट्रम्प गव्हर्मेंट चांगलीच अडचणीत सापडली आहे.

 

trump inmarathi

 

चीनवर आणि जागतिक आरोग्य संघटने वर सध्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून आरोप करण्यात येत आहेत. चीन कडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

या राजकीय घडामोडी असल्या तरी कोरोनावर रामबाण उपाय मिळण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनाव्हायरस यावरती औषध शोधण्यासाठी आता तिथे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आता व्हायरस वरती रामबाण इलाज म्हणजे लस. पण हा आजार नवीन असल्यामुळे यावरची लस मिळायला वेळ लगेल.

पण तोपर्यंत ही अशीच परिस्थिती चालू ठेवायची का? म्हणजे जगभर लॉकडाऊन, सगळे व्यवहार बंद. सगळी वाहतूक सेवा बंद. सगळा व्यापार बंद.

 

curfew inmarathi 6
livemint

 

जर एक वर्षभर हीच परिस्थिती राहिली तर अनेक लोक बेरोजगार होतील. खाण्यासाठी अन्न मिळणे मुश्कील होईल. कुटुंब आणि देश उद्वस्त होतील. त्यासाठीच आता काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे हा विचार आता इतर देश देखील करीत आहेत.

आता हे तर निश्चितच आहे की येणारे काही दिवस आपल्याला कोरोना सोबतच राहावे लागणार आहे. फक्त स्वतःची काळजी घेतच त्यावर कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतील हे पाहिलं जात आहे.

अशीच एक योजना आता अमेरिकेत राबवली जात आहे. ज्याला “मॅनहटन प्रोजेक्ट” असं नाव देण्यात आलं आहे. ज्यामध्ये अनेक सायंटिस्ट आणि अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे.

या योजनेचे एकूण चार भाग करण्यात आले आहेत.

1) एप्रिल-मे २०२०

 

corona israel scientist inmarathi 2
the times of israel

 

या पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्णांवर सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्या औषधांचा उपयोग होईल हे पाहण्यात येईल.

उदाहरणार्थ रेमीडीसीवर, क्लोरोक्वीन, हैड्रॉक्सी क्लोरोक्वीन यापैकी कुठली औषध जास्त उपयुक्त आहेत हे पाहिलं जाईल.

त्याशिवाय इतर कोणत्या थेरपीचा उपयोग होतोय ते हेदेखील पाहिलं जाईल. उदा. प्लास्मा थेरपी.

 

2) जून ऑगस्ट २०२०

 

corona israel scientist inmarathi
new york post

 

दुसऱ्या टप्प्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत जास्तीत जास्त प्रतिजैविकांचा वापर करून कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवणे.

 

3) मार्च २०२० ते २०२१ 

 

corona vaccine inmarathi 5
abc news

 

तिसऱ्या टप्प्यात मार्च २०२१  मध्ये कोरोनावरची लसिवरच संशोधन पूर्ण करून ती लस बाजारात उपलब्ध करून देणे. आणि कोरोनावर कायमचा विजय मिळवणे.

 

4) मे जून २०२०

 

corona public inmarathi
Al jazeera

 

या चौथ्या टप्प्यात जून २०२० पर्यंत संपूर्ण जगातील सगळे बिझनेसेस, शाळा नेहमीसारखी चालू करणे. आणि जगातली परिस्थिती पूर्ववत आणणे.

हे असे एकूण चार टप्पे आहेत. वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये या योजनेचे चार टप्पे कसे असतील आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल याची संपूर्ण अहवाल देण्यात अाला आहे.

हा संपूर्ण अहवाल सतरा पानी आहे.

३३ वर्षीय ‘थॉमस काहील’ या शास्त्रज्ञाने या लोकांची टीम बनवली आहे. ज्यात बारा सायंटिस्ट असून या प्रोजेक्टसाठी लागणारा खर्च करणारे काही अतिश्रीमंत व्यक्तीदेखील या टीमचा भाग आहेत.

यामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे डॉक्टर मायकेल रोशबाश, न्यूक्लियर शास्त्रज्ञ डॉ स्कॉट केम्प यांचादेखील समावेश आहे.

या सगळ्यांचा प्रयत्न हाच असणार आहे की कोरोनाव्हायरस वर लवकरात लवकर मात करता यावी.

ट्रम्प सरकारनेदेखील या प्रोजेक्टला मान्यता दिली असून सध्या त्यानुसार तिथे रेमीडीसीवर या औषधाचे उत्पादन करण्याचा विचार होत आहे.

 

corona virus kit inmarathi
loksatta

 

आता रेमीडीसीवरला अमेरिकन एफडीएने कोरोना रुग्णांना इलाज करण्यासाठी मान्यता दिली आहे. रेमीडीसीवर हे औषध दिल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण आता अकरा दिवसातच ठीक होत आहेत असे अहवाल येत आहेत.

आधी कोरोनाग्रस्त रुग्ण हे पंधरा ते सोळा दिवसांमध्ये बरे व्हायचे. त्या सोबतच काही काही देशांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हेदेखील औषध उपयोगी पडत आहे.

अशा अनेक औषधांचे उत्पादन करण्यासाठी खाजगी फार्मासिटिकल कंपन्यांबरोबर देखील करार करण्यात येत असून त्यांना देखील या कार्यक्रमात सहभागी करण्यात येणार आहे.

त्यासाठीच अतिश्रीमंत व्यक्तींना यामध्ये घेण्यात आल आहे यासाठी लागणारा पैसा हा त्या व्यक्तींकडून घेण्यात येईल.

कोरोनावरची लस आठ महिन्यातच बाजारात आणण्याचा त्यांचा विचार आहे. म्हणून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.

सध्या जगभरात कोरोनावरच्या लसीवर संशोधन सुरू असून, कुठली लस यावर उपयोगी पडेल हे सध्या सांगता येत नाही. त्यासाठीच जिथे संशोधन सुरू आहे.

 

corona test inmarathi
quartz

 

त्या ही लोकांना या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेण्याचा विचार आहे. कारण एखादी लस चुकीची असेल तर त्यावर पुढे संशोधन न करता ज्या लस अचूक रिझल्ट देत आहेत त्यांच्यावर अधिक प्रयोग करता येईल.

आणि कोरोनाव्हायरस वर लवकर लस आणता येईल हा त्यामागचा विचार आहे. जानेवारी २०२१ पर्यंत ३०० दशलक्ष लसींचा डोस तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

या योजनेचे सदस्य असलेले अब्जाधीश फिलांथ्रोपिस्ट मायकल मिल्किन म्हणतात की, गेली पन्नास वर्ष मी अनेक योजना सोबत काम केले आहे पण जगभराच्या विचार करून केली जाणारी ही पहिलीच योजना आहे.

या टीममध्ये इमीन्यूबायोलॉजी न्यूरोबायोलॉजिस्ट क्रोनोबायोलॉजिस्ट, ओन्कॉबायोलोजिस्ट असे असे वेगवेगळे तज्ञ आहेत.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील या योजनेला संमती दर्शवली आहे त्याचबरोबर वेळेचं बंधन न घेता तुमचं काम चालू ठेवा असा सल्ला देखील त्यांनी या टीम ला दिला आहे.

जर या योजनेप्रमाणे खरोखरच काम झालं तर त्याचा नक्कीच फायदा हा संपूर्ण जगाला देखील होईल.

कारण कोरोनावरती उपचार करण्यासाठी एक दिशा तर मिळेलच पण कोरोनाच संक्रमण थांबून आधी सारखेच व्यवहार सुरू झाले तर जी बेरोजगारीची आणि आर्थिक संकटाची चाहूल येऊ घातली आहे त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?