कार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गाड्यांची हौस तर सगळ्यांनाच असते. महागडी का होईना पण एखादी छोटी कार तरी असावी म्हणजे प्रवासाचा प्रश्न मिटेल असं आपण मानतो. पण नवीन कार खरेदी करायची तर चांगले ५-१० लाख खर्च करावे लागतात. ज्यांना परवडतं ते जास्त विचार न करता कार घेऊनही टाकतात, तर काहींकडे पैसे नसतात पण तरीही कारची हौस काही केल्या कमी होत नाही. मग अशी लोक शक्कल लढवायला लागतात आणि अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात.

अशीच काहीशी कामगिरी करून दाखवली आहे ड्रीटन सेलमानी यांनी ! पूर्वी कोसावा येथे राहणाऱ्या ड्रीटन सेलमानी यांना गाड्यांची भयंकर आवड आहे. त्यातल्या त्यात Lamborghini तर त्यांची ड्रीम कार..! परंतु ही कार घेण्यासाठी  त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पण परिस्थिती नाही म्हणून ते शांत बसले नाहीत. त्यांनी स्वत:च स्वत:च्या हाताने Lamborghini कार बनवण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्ण करूनही दाखवला. आता त्यांच्याकडे स्वत:ची Lamborghini कार आहे.

second-hand-car-lamborghini-marathipizza01

स्रोत

स्वत:ची Lamborghini कार बनवण्यासाठी सेलमानी यांनी Mitsubishi Eclipse या सेकंड हॅण्ड कारचा आणि Mitsubishi Galant कारच्या इंजिनचा आणि इतर भागांचा अतिशय योग्य वापर केला.

second-hand-car-lamborghini-marathipizza02

स्रोत

हीच ती Mitsubishi Eclipse कार, जी सेलमानी यांनी २०१५ साली सेकंड हॅण्डमध्ये खरेदी केली होती आणि आता याच गाडीचे रूप पालटून तिचे रुपांतर Lamborghini कार मध्ये झाले आहे.

second-hand-car-lamborghini-marathipizza03

स्रोत

हे काम पूर्ण करण्यासाठी सेलमानी यांना पूर्ण १ वर्षाचा कालावधी लागला. तेव्हा कुठे एक दिमाखदार Lamborghini कारचे ते मालक झाले. या Lamborghini कारमध्ये काळ्या आणि लाल रंगाच्या स्ट्रिप्स लावल्या आहेत, ज्या अल्बानिया देशाच्या झेंड्याचे प्रतिकात्मक रूप आहेत.

second-hand-car-lamborghini-marathipizza04

स्रोत

स्वत:च्या हाताने बनवलेल्या या Lamborghini कारमुळे सेलमानी यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. जेव्हा ते कार घेऊन बाहेर पडतात तेव्हा लोकांच्या वारंवार वळून पाहणाऱ्या नजरा त्यांचे डोळे भरून कौतुक करत असतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “कार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?