‘ह्या’ गोंडस मुलाचं वय किती असेल याचा आपण अंदाजही लाऊ शकत नाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लहान मुले ही देवाघरची फुले असतात, असे आपण मानतो, कारण त्यांच्या सारखा निरागसपणा आपल्याला दुसऱ्या कोणाच्याही चेहऱ्यावर दिसून येत नाही. आपण एखाद्याचे वय त्याच्या दिसण्यावरून ओळखू शकतो, लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येऊ शकतो. पण सर्वांच्या बाबतीमध्ये असे नसते.

 

Hyomyung Shin.Inmarathi
intoday.in

काही लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. पण तरीही आपण लावलेल्या अंदाजाच्या आणि त्या माणसाच्या वयामध्ये २ ते ३ वर्षाच्या जास्तीत जास्त ६ ते ८ वर्ष फरक असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या वयाचा अंदाज लावणारा प्रत्येकवेळी चुकतो. या माणसाचे खरे वय २८ वर्ष आहे, पण तरीही तो १० वर्षाच्या मुलासारखा दिसतो.

दक्षिण कोरियाचा रहिवासी ह्युम्युंग शिन याचा चेहरा १० वर्षांच्या मुलासारखा दिसतो. त्याचा आवाजही लहान मुलासारखाच आहे. असे असले तरी त्याचे खरे वय २८ वर्षे आहे. शिन हा एका दुर्धर आजाराने ग्रासला आहे. या आजाराला हायलँडर सिंड्रोम नावाने ओळखले जाते. अशा रुग्णाचा शारीरिक विकास आणि वयाची वाढ जवळपास थांबते.

 

Hyomyung Shin.Inmarathi1
lifestyler.co.kr

कोरियाच्या पीटर पॅन नावाने प्रसिद्ध गाण्यामधील शिनच्या कोमल आवाजामुळे लोक त्याला लहान मूलच समजतात. त्यामुळे बर्याेचदा त्याला ओळखपत्र जवळ बाळगावे लागते. विशेष म्हणजे शिन बिअर पितो आणि डेटिंगवरही जातो. त्याने आपल्या खोलीत हॉलीवूड अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सनचे पोस्टर लावले आहे. एक दिवस सुंदर तरुणीला भेटण्याची इच्छा असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याचे लहानपणीचे छायाचित्र पाहिल्यास तो बालरूपात सामान्य पद्धतीने वाढत असल्याचे दिसत होते. मात्र, किशोरावस्था येईपर्यंत त्याचा शारीरिक विकास थांबला.

त्याने एका स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीवरील एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यात शिन नाचगाणे करत असल्याचे दिसला. आपला कोमल आवाज आणि गोंडस चेहऱ्यामुळे तो सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. १६३ सेंटिमीटर उंच शिन एका महिलेसोबत डेटवर जातो. मात्र, ज्या वेळी तो आपले खरे वय सांगतो, तेव्हा तिला धक्काच बसल्याचे कार्यक्रमात दाखवण्यात आले.

 

Hyomyung Shin.Inmarathi2
dailymail.co.uk

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याची प्रकृती निरोगी आहे. शिन अन्य मुलांप्रमाणे आपले आयुष्य फॅशनेबल पद्धतीने जगत आहे. लाल जॅकेट आणि बेसबॉल कॅपमध्ये तर तो आणखी खुलून दिसतो. मोठे दिसावे यासाठी त्याने पोशाखात बदल करून पाहिला, मात्र तरीही तो लहान मुलासारखा वाटतो.

असा हा ह्युम्युंग शिन सर्वात वेगळा आहे, पण तरीही तो त्याच्या आवाजामुळे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्या दिसण्यामुळे लोक कधीही त्यांच्याशी मोठ्या लोकांसारखे वागत नाहीत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?