३०० एकर बरड जमिनीचं भारतातल्या पहिल्या कृत्रिम अभयारण्यात रुपांतर: एका जोडप्याची कमाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

पर्यावरण, वन्यजीव संवर्धन, वृक्ष लागवड, जंगल संवर्धन – ह्या विषयावरील चर्चा आपल्यासाठी नव्या नाहीत. प्रोब्लम हा आहे की “चर्चा” करणारे शेकडो आहेत, result दाखवणारे खूपच कमी. एका जोडप्याने मात्र भलामोठा result दाखवलाय.

अनिवासी भारतीय असलेल्या मल्होत्रा कुटुंबाने कर्नाटकात ३०० एकर बरड जमीन विकत घेऊन, तिथे घनदाट जंगल निर्माण केलंय.

 

malhotra_couple_featured_marathipizza 00

स्त्रोत

अनिल आणि पामेला मल्होत्रा या एका अनिवासी भारतीय जोडप्याने गेल्या २५ वर्षापासून कर्नाटकच्या कोडागु जिल्ह्यातील थोडी थोडी बरड जमीन क्रमश: विकत घेऊन ती, हत्ती, चित्ता, विवीध पक्षी, साप, हरीण ह्यांच्यासाठी लागणाऱ्या पर्जन्य वनात विकसित करायचं सत्र सुरु ठेवलं आहे. अनिल आणि पामेला Save Animal Initiative (SAI) ही संस्था चालवतात. त्यांच्या प्रयत्नातून त्यांना भारतातील पहिलं कृत्रिम वन्य प्राणी अभयारण्य साकारणं शक्य झालंय.


malhotra_couple_marathipizza 02

स्त्रोत

अनिल हे भारतातील डून स्कूलचे विद्यार्थी आहेत. अनिल भारतात येण्याअगोदर अमेरिकेत बांधकाम आणि restaurant व्यावसायिक होते. त्यांची आणि पामेला यांची न्यू जर्सी येथे भेट झाली आणि त्यांच प्रेम जुळून लग्नात रुपांतर झालं. अनिल आणि पामेला हनिमूनसाठी अमेरीकेतील हवाई येथे गेले असता, तेथील निसर्गाच्या ते प्रेमात पडले आणि त्यांनी तेथेच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला.

दोघांनाही निसर्गाविषयी मनापासून प्रेम आहे.

१९८६ साली हे दोघं, अनिल ह्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला हरिद्वारला आले, तेव्हा तेथील पर्यावरणाची विदारक स्थिती बघून त्यांचं मन दु:खी झालं. त्यांनी भारतातील निसर्गासाठी काहीतरी करायचं ठरवलं. उत्तर भारतात जागा घेण्याचा प्रयत्न असफल झाला. शेवटी त्यांच्या एका मित्राकरवी त्यांना कर्नाटकातील एका शेतकऱ्याची बरड जमीन मिळाली. तिथून सुरुवात करून, गेल्या २५ वर्षात, त्यांनी हळूहळू कर्नाटकातील ब्रह्मगिरी भागात तब्बल ३०० एकर जमीन खरेदी केली. आणि तिथे घनदाट जंगल विकसित केलं.

malhotra_couple_marathipizza 01

स्त्रोत

अर्थात हे सगळं करताना त्यांना अनेक अडचणी देखील आल्या. प्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांशी प्रसंगी स्वतःला भिडावं लागलं. जमीन खरेदी करताना किचकट शासकीय नियम, शेतकऱ्यांवर असलेलं कर्ज, अश्या अनेक समस्या आल्या. पण त्यांनी जोमाने आपलं काम चालू ठेवून सर्व समस्यांवर मात केली.

पुढील काळात Corporate Social Responsibility अंतर्गत मोठ्या कंपन्यांना ह्या कार्यात सामील करून घ्यायचा त्यांचा मानस आहे.

चहूकडे पर्यावरण विनाश होत असताना मल्होत्रा जोडप्यांसारखे काही मोजकेच लोक जे काम करत आहेत, ते अत्यंत महत्वाचं आहे.

मल्होत्रा कुटुंबाला सलाम…!

: गौरव जोशी

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *