प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या, अतिश्रीमंत लोकांच्या “आवडत्या” महागड्या कॉफी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

चहा आणि कॉफी हे आपल्या जीवनातील एक भागच असतो. यांच्याशिवाय बहुतेकांचा जणू दिवसच पूर्ण होत नाही. दिवस कसा ही असो, बहुतेक लोकांना चहा आणि कॉफी हा लागतोच. आता ही बाहेर एवढे ऊन लागत आहे, तरीदेखील माणसे काही चहा आणि कॉफी पिण्याचे सोडत नाही.

ठिकठिकाणी टपरीवर आपल्याला चहा आणि कॉफी लवर्स नेहमीच दिसतील.

 

coffee uses01-marathipizza
healthline.com

कॉफी पिऊन आपल्याला ताजेतवाने वाटते. ज्या कॉफींची गुणवत्ता जेवढी जास्त, तेवढीच या कॉफींची किंमत जास्त असते.


पण तुम्हाला हे माहीत आहे का ? जगातील सर्वात महागडी कॉफी ही प्राण्यांच्या लीदपासून म्हणजेच विष्ठेपासून बनते.

इंडोनेशियाची कॉफी लुवाक किंवा चिविट कॉफी ही सर्वात महागडी कॉफी मानली जाते. या प्रकारची एक कप कॉफी जवळपास ८० डॉलरपर्यंत असू शकते.

चला तर मग जाणून घेऊया, या जगातील सर्वात महागड्या कॉफीबद्दल काही विशेष माहिती.

ब्लॅक आयव्हरी ब्लँड कॉफी

उत्तर थायलंडमध्ये बनवण्यात येणारी ब्लॅक आयव्हरी ब्लँड कॉफी हत्तीच्या विष्ठेमध्ये असलेल्या बियांपासून बनवली जाते. ही कॉफी जगातील सर्वात महागड्या कॉफी ब्रॅन्डस् मधीलच एक आहे. याच्या एक किलो कॉफीची किंमत ११०० डॉलर म्हणजेच ६७१०० रुपये आहे.

 

How the worlds most expensive coffee is made.Inmarathi
dailymail.co.uk

या कॉफीला बनवण्यासाठी हत्तींना कॉफीचे बीज खाण्यास दिले जातात.

हत्ती हे कच्चे लेगम्स म्हणजेच शेंगा खातात आणि त्याला पचवतात आणि लीद म्हणजेच विष्ठा बाहेर फेकतात. त्यानंतर त्याच विष्ठेमधून कॉफीचे बीज काढले जाते.

एक किलो कॉफी मिळवण्यासाठी एका हत्तीला जवळपास ३३ किलो कॉफीचे कच्ची फळे खायला दिले जातात. हत्तीच्या विष्ठेमधून बीज काढण्याचे काम हत्तींचे प्रशिक्षित ट्रेनर करतात.

हे बीज काढल्यानंतर त्यांना उन्हामध्ये सुकवले जाते. याप्रकारे जगातील सर्वात महागडी कॉफी ब्लॅक आयव्हरी ब्लँड ही तयार करण्यात येते.

 

How the worlds most expensive coffee is made.Inmarathi1
gannett-cdn.com

याची खास गोष्ट ही आहे की, या कॉफीमध्ये कडूपणा जराही नसतो. पचन क्रियेच्या दरम्यान हत्तीचे एन्जाइम कॉफीच्या प्रोटीनला तोडून टाकते.

प्रोटीन तुटल्याबरोबरच कॉफीचा कडूपणा जवळपास संपतोच आणि याप्रकारे जगातील सर्वात महागडी कॉफीमध्ये गणली जाणारी ही एक कॉफी तयार केली जाते.

कोपी लुवाक

जगातील सर्वात महागड्या कॉफींमधील एक ‘कोपी लुवाक’ ही आहे. ही कॉफी पिण्यासाठी खूपच मस्त लागते. पण या कॉफीला बनवण्याची प्रक्रिया खूपच चकित करणारी आहे. कॉफी कोपी लुवाक जिची चव घेण्यासाठी लोक जगभरातून इंडोनेशियामध्ये येतात.

लोकांच्या म्हणण्यानुसार, या कॉफीची जो एकदा चव घेईल, त्यानंतर त्याला दुसरी कोणतीही कॉफी आवडणार नाही.

 

How the worlds most expensive coffee is made.Inmarathi2
amazon.com

इंडोनेशियामधील पाम सिवेट नावाच्या एका मांजरीच्या प्रजातीच्या मदतीने ही जगातील सर्वात महागड्या कॉफींपैकी एक कॉफी तयार केली जाते.

हा प्राणी बेरी खातो, पण बेरीच्या बिया पचवू शकत नाही आणि या बियांना आपल्या विष्ठेद्वारे बाहेर फेकून देतो. याच बियांना सुकवून ‘कोपी लुवाक’ नावाची ही महागडी कॉफी तयार केली जाते.

ही कॉफी खूप दुर्मिळ असते, त्यामुळे या कॉफीची किंमत खूप जास्त असते. या कॉफीची किंमत जवळपास ७०० अमेरिकन डॉलर प्रति किलो म्हणजेच जवळपास ४५,५३१ रुपये प्रति किलो एवढी आहे.

महागड्या कॉफीचे व्यापारी पाम सिवेट पाळतात

‘पाम सिवेट’ कोपी लुवाकला मिळणाऱ्या मोठ्या किंमतीमुळे इंडोनेशियामध्ये पाळला देखील जातो. पाम सिवेटला पिंजऱ्यामध्ये ठेऊन खूप कॉफी बीन्स खायला दिल्या जातात. पोट भरून खाणे खाल्ल्यानंतर काही तासांनी पाम सिमेट आपली विष्ठा बाहेर टाकून देतो.

त्यानंतर त्याला पाळणारे शेतकरी पाम सिवेटच्या विष्ठेला जमा करतात.

 

How the worlds most expensive coffee is made.Inmarathi3
longandshort.london

यानंतर या विष्ठेमध्ये असलेले कॉफीचे बीज वेगळे केले जातात. या विष्ठेमधून वेगळी करण्यात आलेली कॉफी बीन्सला भाजले जाते. भाजल्यानंतर ही कॉफी बाजारामध्ये नेली जाते, युरोप आणि अमेरिकेच्या बाजारामध्ये जाईपर्यंत ही कॉफी खूप महाग होते.

अशाप्रकारे प्राण्यांच्या विष्ठेमधील पदार्थांपासून जागातील या सर्वात महागड्या कॉफी बनवल्या जातात. या कॉफींची मागणी देखील बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे त्यांची किंमत अजूनच वाढते.

मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी! 😉

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *