फटाके तयार करण्यामागची (आणि फुटण्यामागची) “अमेझिंग” प्रक्रिया समजून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

दिवाळीला, लग्नात आणि कुठल्याही स्पेशल अश्या कार्यक्रमावेळी आपण फटाके फोडत असतो. जोरजोरात आवाज करणारे फटाके, आकाशात उंच जाऊन रंगाची उधळण करणारे फटाके, हे सर्व आपल्याला एकदम चमत्कारिक भासतं.

पण या चमत्कारामागे पण एक खूप मोठं विज्ञान दडलं आहे. ते विज्ञान काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

तज्ज्ञांचा मते फटाक्यांचा शोध चीन मध्ये हजार वर्षांपूर्वी लागला. आज चीन जगातला सर्वात मोठा फटाके उत्पादक देश आहे.

आपल्या पैकी बहुतांश लोकांना दोन साधारण प्रकारचे फटाके माहिती असतील. एक वाजणारे आणि न आवाज करता प्रकाशाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारे फटाके.

 

crackers-inmarathi
manado.tribunnews.com

आकाशी उडणारे फटाके एका ट्यूबमध्ये ब्लॅक पावडर अर्थात दारू भरून तयार केले जातात.

त्यात एक फ्लॅश पेपर आणि फ्यूज वापरला जातो ज्याला आपण वात म्हणतो जी पेटवल्यावर ती जळत जळत आत भरलेल्या दारू पर्यंत पोहचते आणि विस्फोट होतो व आकाशात विविध रंगी छटा उमटतात.

चमचमीत फटाके हे वेगळ्या प्रकारे तयार केलेले असतात. ते काही मिनिटांपुरते प्रकाशमान राहतात. त्यांचा स्फोट होत नसतो.

अश्या फटाक्यांना आपल्याकडे झाड, भुईचक्कर, सुसुंद्री म्हटले जाते.

यात जास्त मटेरियलचा वापर केला जातो. यात ऍल्युमिनियम, आयर्न, स्टील, झिंक आणि मॅग्नेशियम या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो.

आकाशात उंचावर जाऊन फुटणारे फटाके हे चार भागात तयार केले जातात. पास्टेड पेपरचा बनलेला कंटेनर, फ्यूज ज्याचा मदतीने अपेक्षित उंची गाठता येते. एक स्फोटक पदार्थ जो दारू पासून तयार केला जातो. स्पार्कल्स सारखे स्टार्स नावाचा वर्तुळाकार पदार्थ अंतर्गत भागात मिश्रित करून भरला जातो.

एका लहान पाईपच्या मदतीने शेल ज्यात सर्व दारुगोळा भरलेला असतो तो आकाशात उंच फेकण्यासाठी कामी येतो.

 

sivakasi-story_inmarathi
indiatoday.in

चिंगारी मुळे शेल जळते आणि उंच आकाशात उडते, जेव्हा आग शेलच्या आत असलेल्या दारुगोळा पर्यंत पोहचते तेव्हा स्फोट होऊन विविध रंगी प्रकाश बाहेर पडतो आणि एक नयनरम्य दृश्य तयार होते. स्टार्सच्या जळण्याने ते आजून खुलते.

“मल्टीब्रेक” प्रकारचे फटाके देखील असतात. जे उंच आकाशात जाऊन टप्याटप्याने फुटतात. त्यात एका पाठोपाठ एका आवरणाचा विस्फोट होत असतो.

सर्वच फटाके सारखे नसतात. काही वर्तुळाकार फुटतात, काही शॉवर स्पार्क्स सारखे फुटतात.

त्यांचात एक विशिष्ट प्रकारे फुटण्याचा पॅटर्न हा त्यांचातील स्टार्सच्या रचनेवर अवलंबून असतो. एक विशिष्ट पॅटर्न तयार करण्यासाठी निर्माते एक आऊटलाईन पॅटर्न तयार करत असतात आणि त्याचा भोवती स्पेशल चार्ज असतो जो त्यांना आवरणापासून वेगळं करतो.

त्यात स्रोमियम, लिथियम सॉल्टस आणि कार्बोनेट आयन्स असतात. जे लाल रंग त्या फटाक्यांना देत असतात. पिवळ्या रंगासाठी सोडियमचा वापर केला जातो. तर हिरव्या व निळ्या रंगासाठी प्रत्येकी बेरियम आणि कॉपर कंपाउंड वापरतात.

 

cracker-inmarathi
Livemint.com

अश्याप्रकारे फटाक्यांमागे खूप मोठं रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र आहे आणि त्यात कुठलीही जादू नसते. हो पण त्याचा अनुभव मात्र नक्कीच जादुई असतो.

फटाक्यांतील दारूमुळे हवेचं प्रदूषण होतं. अनेकदा पक्षांना इजा होते. रुग्णांना त्रास होतो त्यामुळे फटाक्यांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे. तसेच सध्या नवीन इको फ्रेंडली फटाक्यांना प्राधान्य दिलं पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “फटाके तयार करण्यामागची (आणि फुटण्यामागची) “अमेझिंग” प्रक्रिया समजून घ्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?