मुलींनो – तुम्हाला मेकअप करायला आवडतं खरं, पण “ह्या” गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसायला आवडते. चांगले स्वच्छ कपडे, सुंदर चेहरा व नितळ त्वचा असलेली व्यक्ती समोरच्यावर चांगली छाप पाडू शकते. पण प्रत्येकालाच जन्मजात सौंदर्य मिळालेलं नाहीये. म्हणूनच अनेक लोक आपले असलेले रूप छान दिसण्यासाठी मेकअपचा पर्याय निवडतात.

मेकअप माफक प्रमाणात व योग्य प्रकारे केला तर त्याने व्यक्तिमत्व उठून दिसते. पण अतिभडक मेकअप किंवा न शोभणारा मेकअप केला तर व्यक्ती सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसू लागते.

मेकअप करण्याचीही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. मेकअप करताना काय करावे व काय करू नये ह्याचेही काही नियम आहेत. ते पाळले नाहीत तर तुमच्या रूपावर व त्वचेवर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतात.

मेकअपसाठी चांगल्या दर्जाची उत्पादने वापरणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

स्वस्त मिळतात म्हणून डुप्लिकेट किंवा निकृष्ट दर्जाची उत्पादने वापरली तर त्वचेला हमखास त्रास होतो. मेकअपची आवड असणाऱ्या अनेक मुली अश्याच काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात व आपली त्वचा खराब करून घेतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, मेकअप करताना कुठल्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे.

१. खूप जास्त प्रमाणात कन्सिलर वापरणे :

 

makeup mistakes-inmarathi09
osmopolitan.com

प्रत्येक मुलीला वाटतं की, आपली त्वचा सुंदर व नितळ दिसावी. म्हणून मेकअप करताना डाग किंवा चेहेऱ्यावरील खड्डे दिसू नये म्हणून खूप जास्त प्रमाणात कन्सिलरचा वापर करतात.

कन्सिलरची चुकीची शेड सिलेक्ट केली तर चेहेरा व मान ह्यात रंगाचा फरक पटकन दिसून येतो व ते दिसायला अतिशय विचित्र दिसते.

तसेच चेहेऱ्यावर कन्सिलरचा अतिशय जाड थर लावल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यासारखे दिसते व त्यामुळे तुमचे वय जास्त दिसते.

२. खालच्या पापण्यांवर जास्त प्रमाणात मस्कारा लावणे :

 

makeup mistakes-inmarathi08
simplysona.com

खालच्या पापण्यांना योग्य प्रमाणात मस्कारा लावल्याने डोळ्यांच्या कडा उठून दिसतात व डोळे सुंदर दिसतात.

पण खालच्या पापण्यांना खूप जास्त प्रमाणात मस्कारा लावल्यास चेहऱ्यावर त्याच ठिकाणी फोकस जातो व डोळ्याभोवतीच्या सुरकुत्या हायलाईट होतात.

ह्या सुरकुत्या कितीही बारीक असल्या तरी जास्त मस्कारामुळे त्या दिसून येतात.

३.लिपस्टिकची चुकीची शेड निवडणे :

 

makeup mistakes-inmarathi07
fanpage.gr

चांगल्या लिपस्टिकमुळे चेहेरा सुंदर दिसतो ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. रिच सॅच्युरिटेड रंगाच्या शेड्स ट्राय करायला काहीच हरकत नाही.

पण तुमचे ओठ जर बारीक व लहान आकाराचे असतील तर तुम्हाला डार्क शेडचे लिपस्टिक चांगले दिसणार नाही कारण डार्क रंगाच्या लिपस्टिक मुळे ओठ बारीक दिसतात.

तुमचे ओठ बारीक असतील तर लिपस्टिकच्या मदतीने तुम्ही ते सुंदर बनवू शकता. योग्य शेडचे लिपस्टिक व नॅचरल लीप लाईनच्या थोडी बाहेरून लीप लाईन काढली तर ओठ मोठे दिसू शकतात.

४. डार्क आयशॅडो चुकीच्या पद्धतीने लावणे :

 

makeup mistakes-inmarathi06
shape.com

आयशॅडो लावताना ती संपूर्ण पापणीला लावू नका. ह्याने तुमचे वय जास्त दिसू शकेल. पापणीच्या फक्त बाहेरच्या कडांना आयशॅडो लावावी ह्याने तुमचे डोळे उठून दिसतात.

५. खालच्या पापणीला जास्त प्रमाणात आयलायनर लावणे :

 

makeup mistakes-inmarathi05
loltvinc.blogspot.com

डार्क आयलायनर खालच्या पापणीला जास्त प्रमाणात लावल्याने डोळे बारीक दिसण्याची शक्यता असते. डोळे मोठे दिसण्यासाठी कमी प्रमाणात लाईट मेकअप पेन्सिल वापरावी असे मेकअप एक्स्पर्ट सांगतात.

६. गालांना rouge लावणे :

 

makeup mistakes-inmarathi04
blog.sibt.nsw.edu.au

डार्क शेडचे ब्लश आता आऊट ऑफ फॅशन आहेत. सध्या ट्रेंडमध्ये लाईट शेड्स आहेत. पेल पिंक किंवा पिच कलरच्या ब्लशची सध्या फॅशन आहे.

ब्लश लावताना गालाच्या वरच्या भागावर फोकस करा. ह्याने चेहेऱ्याचा आकार चांगला दिसतो. गालाच्या मध्यभागी ब्लश लावले तर चेहरा गोल व फुगीर दिसतो.

चीकबोन्स हायलाईट केल्याने चेहेरा मॅच्युअर्ड व प्रमाणबद्ध दिसतो. मेलो आणि नॅचरल टोन वापरल्याने तुम्ही यंग दिसता व तुमच्या चेहऱ्यावर एक रोमँटिक ग्लो येतो.

७. भुवया जास्त हायलाईट करणे :

 

makeup mistakes-inmarathi03
Youtube.com

डार्क रंगाने भुवया जास्त हायलाईट केल्याने चेहेरा विचित्र दिसू शकतो. तसेच वय सुद्धा जास्त दिसते. तुमच्या भुवयांच्या नैसर्गिक रंगापेक्षा एक शेड लाईट घ्या म्हणजे तुमचा चेहरा सुंदर दिसण्यात मदत होईल.

८. करेक्टर न वापरणे :

 

makeup mistakes-inmarathi02
besthealthmag.ca

डोळ्यांखाली डार्क सर्कल असणे ही बऱ्याच स्त्रियांची समस्या असते. वय वाढते तसे हे डार्क सर्कल किंवा चेहऱ्यावर काळे डाग येऊ लागतात. ह्यावर जर कन्सिलर लावले तर चेहरा आणखी वाईट दिसू शकतो.

परंतु चेहऱ्यावर काही डाग किंवा डार्क सर्कल असतील तर त्यावर करेक्टर लावल्याने ते लपतात व चेहरा नितळ सुंदर दिसतो.

९. लीप लाईन कव्हर करायला विसरणे :

 

makeup mistakes-inmarathi01
makeuptips.site

उत्तम मेकअप करण्यासाठी लीप लायनर पेन्सिल वापरणे आवश्यक आहे. ह्याने तुमचा चेहेरा प्रमाणबद्ध दिसतो. तुम्ही तुमचे बारीक ओठ मोठे दिसावे म्हणून लीप लायनर पेन्सिल वापरत असाल तर जिथे आऊटलाईन काढली आहे त्या ठिकाणी शेडिंग करणे विसरु नका. नाहीतर ती आउटलाईन मिशी सारखी दिसते.

१०. चेहऱ्यावर खूप जास्त पावडर लावणे :

 

makeup mistakes-inmarathi
bustle.com

चेहऱ्यावरचे डाग तसेच तेलकटपणा घालवण्यासाठी पावडर अतिशय उपयुक्त आहे पण ती योग्य प्रमाणात लावली तरच!

जास्त पावडर लावल्याने चेहरा ड्राय दिसतो. डोळ्यांभोवती पावडर लावणे टाळा कारण त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पावडर लावल्यास डोळ्यांभोवती सुरकुत्या दिसतात.

तसेच मेकअप करण्याआधी चेहेरा चांगला स्वच्छ धुवून घ्यायला हवा. मेकअप करताना आधी प्रायमरचा बेस लावून घेणे आवश्यक आहे. ह्याने मेकअप चेहेऱ्यावर चांगला बसतो. प्रायमर मॉइश्चरायझरचेही काम करतो. ज्यांची त्वचा तेलकट आहे ते लोक ऑइल फ्री प्रायमर वापरू शकतात.

मेकअप करताना लॉंग लास्टिंग व वॉटरप्रूफ उत्पादने वापरली तर तुमचा मेकअप दिवसभर चांगला टिकेल. वॉटरप्रूफ उत्पादने वापरली तर तुमचा आय मेकअप खराब होणार नाही.

तुमचा मेकअप पूर्ण झाल्यावर त्यावर सेटिंग स्प्रे मारला तर मेकअप चांगला टिकून राहतो. PVP (polyvinylpyrrolidone) असलेला स्प्रे मारणे जास्त हिताचे आहे कारण ह्याने मेकअपला एक जास्तीची प्रोटेक्शन लेयर मिळते.

मेकअपचे काम संपल्यावर तो काढणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. मेकअप चेहेऱ्यावर तसाच ठेवून रात्री झोपणे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ह्याने त्वचेवर वाईट परिणाम होतात. म्हणूनच रात्री कितीही उशीर झाला तरी चेहेरा धुवूनच किंवा क्लिंझिंग मिल्क किंवा तत्सम उत्पादने वापरून मेकअप काढून टाका. वेळच्या वेळी त्वचेची काळजी घेणे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे.

नियमितपणे त्वचेचे क्लिंझिंग, स्क्रबिंग, मॉइश्चरायझिंग आणि टोनिंग केले, तर तुमची त्वचा चांगली राहील आणि जास्त मेकअपची तुम्हाला गरजच पडणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?