महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने हे वाचून कंबर कसून तयारीला लागलं पाहिजे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===


सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले जात आहेत. मागील महिन्यात भारतीय क्रिकेट टीम जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन ह्या ठिकाणी पोहोचली तेव्हा त्यांना तेथे एका विशिष्ट नियमाचे पालन करायला सांगितले गेले. तो नियम म्हणजे, कुठलाही खेळाडू २ मिनिटांपेक्षा जास्त वेळ अंघोळ करणार नाही…

त्यानंतर अनेक भारतीयांनी ह्या नियमाची खिल्ली देखील उडविली. पण जरा विचार करा, की कुठल्या देशावर अशी परिस्थिती येण्याचे कारण काय असावे जेणेकरून त्यांना अंघोळी संबंधी देखील कायदे बनवावे लागत आहेत.

 

capetown-inmarathi01
googleusercontent.com

पाणी हेच जीवन आहे… हे आपल्याला लहानपणीपासून शिकवले जात आहे. पण तरीही आपण अजूनही यातून काहीही शिकलो आहे असं वाटत नाही. कारण आपण आजही तेवढेच पाणी खर्च करतो, विनाकारण नळ सुरु ठेवतो. पाण्यचे महत्व हे अजूनही आपल्याला कळले हे दिसत नाही…

पण कदाचित हा लेख वाचून तरी आपले डोळे उघडतील आणि पाणी किती मौल्यवान आहे हे आपल्याला कळेल.

 

capetown-inmarathi04
capetownetc.com

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन येथे भीषण कोरडा दुष्काळ पडायची वेळ आली आहे. त्यांच्याकडे पाण्याची एवढी कमतरता झाली आहे की, अंघोळ आणि शौचालयात फ्लश करण्यासाठी देखील तिथल्या सरकारला कायदे बनवावे लागत आहेत.


खाली दिलेल्या फोटोज वरून तुम्हाला तिथे सध्या काय परिस्थिती आहे याची जाणीव नक्की होईल.

 

capetown-inmarathi03jpg
pulseheadlines.com

केपटाऊन येथे सध्याच्या परिस्थितीत पाणी संपण्याचे संकेत दिसू लागले आहेत. तेतेह जलवायू परिवर्तनमुळे तीन वर्षांपासून दुष्काळ पडला आहे. त्यामुळे तिथे पाण्याची खूप कमतरता भासू लागली आहे. आता येथे एका दिवसाकरिता ४५० मिलियन एवढच पाणी वापरता येईल असे नियम आखण्यात आले आहेत. आणि जर का ही मर्यादा पार झाली तर ‘डे झीरो’ लागू करण्यात येणार आहे.

 

capetown-inmarathi
capetownetc.com

‘डे झीरो’… ही पाणी वाचविण्याची एक पद्धती आहे. ज्यात पाणी वाचविण्याच्या अनुषंगाने जवळपास ७५ % घरांच्या पाण्याची सप्लाय बंद करण्यात येईल. ज्यामुळे जवळजवळ १० लाखहून अधिक घरांना पाणी मिळणार नाही. ‘डे झीरो’ मध्ये हॉस्पिटल आणि शाळांना सुट देण्यात आली आहे.

 

capetown-inmarathi0102
timeslive.co.za

या दरम्यान शहरात २०० वॉटर कनेक्शन पॉइंट बनविण्यात येईल. जिथून प्रत्येक व्यक्ती केवळ २५ लिटर पाणी भरू शकतो. कनेक्शन वर पाण्यासाठी मारामारी होऊ नये म्हणून तिथे पोलीस आणि सेनेचे जवान देखील राहणार आहेत.

 

capetown-inmarathi05
timeslive.co.za

पाणी वाचविण्याच्या अनुषंगाने येथे फेब्रुवारी महिन्यात प्रती व्यक्ती पाणी खर्च करण्याची देखील एक सीमा आखण्यात आली आहे. ज्यानुसार एक व्यक्ती एका दिवसाला ८७ ते ५० लिटर पाणी खर्च करू शकतो.

 


capetown-inmarathi07
cbc.ca

तसेच येथे लोकांना असाही सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी टॉयलेटमध्ये फ्लश करण्यासाठी टाकी चा वापर करू नये, कमीत कमी पाणी सोडावे. तसेच एका आठवड्यात दोनपेक्षा जास्त वेळ अंघोळ न करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

१९७७ सालानंतर केप टाऊन येथे दरवर्षी ५०८ मिलीमीटर एवढ्याच पावसाची नोंद करण्यात आली आहे. पण मागील तीन वर्षांत येथे केवळ १५३ मिमी, २२१ मिमी, ३२७ मिमी पाऊस झाला आहे. जे अतिशय चिंताजनक आहे.

 

capetown-inmarathi06
enca.com

पाऊस कमी झाल्याने मागील पाच वर्षात येथील शेतीवर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे. येथे पाण्याची एवढी कमतरता झाली आहे की, सध्या येथे समुद्राचं पाणी फिल्टर करून वापरण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एवढच नाही तर त्यांचा नाल्यातील पाणी देखील साफ करून वापरण्याचा विचार आहे.

आज केपटाऊन ची अशी परिस्थिती आहे. ती आपल्यावर ओढ्विण्यापर्यंत आपण वाट बघणार आहोत का? आताही वेळ गेलेली नाही, जर आपलं केप टाऊन होण्यापासून वाचवायचं असेल तर पाण्याची बचत आणि पुनर्वापर करायला शिका.

पाणी आहे म्हणून जीवन आहे आणि जीवन आहे म्हणून आपण आहोत… हे विसरता कामा नये…


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.




One thought on “महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने हे वाचून कंबर कसून तयारीला लागलं पाहिजे

  • March 20, 2018 at 6:10 pm
    Permalink
    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?