महाभारतातील एका थरारक प्रसंगाची साक्ष देत हे गाव आजही उभं आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपल्या इथे रामायण हे आदर्शवाद आणि महाभारत हा वास्तववाद मानला जातो, जस रामायणात राम मनुष्य जातील एक आदर्श उभा करून देतो तसेच महाभारतात आपल्याला स्वभावातले द्वेष, कपट,इर्षा असे वेगवेगळे पैलू समोर येतात!

महाभारतात विजय जरी पांडवांचाच झाला असला तरी कौरव पांडव यातले प्रत्येक पात्र हे खूप महत्वाचे आहेत तशाच महाभारतातल्या काही कथा किंवा दंतकथा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत, महाभारतातील याच एकूण एक कथा आपण निरनिराळ्या निमित्ताने, अगदी लहानपणापासून ऐकत आलोय!

या कथांतून आपल्याला शिकायला सुद्धा बरच काही मिळत पण काही काही कथा ज्या आहेत त्या आपल्या मनावर इतक्या स्पष्टपणे कोरल्या गेल्या आहेत कि ज्या विसरणं हे कधीच शक्य नाही कारण त्या कथाच इतक्या रंजक आहेत कि आपण आजही त्यात रममाण होऊ इच्छितो!

मग ती द्रौपदीच्या शील रक्षणाची असो…द्यूत खेळण्याची कथा असो

 

mahabharat-inmarathi
patrika.com

 

वा भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकटलेल्या भगवद्गीतेची…

 

mahabharat-inmarathi
makingindiaonline.in

 

त्यापैकीच एक कथा म्हणजे लाक्षागृहातून पांडवांची सुटका..!

कौरवांचा पांडवांबद्दल असणारा द्वेष तर जगजाहीर होताच.

त्यातच युधिष्ठिराला युवराज घोषित केल्याने दुर्योधनाचा अगदी तिळपापड झाला आणि म्हणूनच सर्व पांडवाचा एकाच ठिकाणी निकाल लावावा या हेतूने त्याने लाक्षागृहाची शक्कल लढवली.

त्याने पांडवांना आणि कुंतीला बळजबरीनेच वारणावताला जत्रा पाहण्यासाठी पाठवले आणि तेथे एका महालात त्यांची रहायची सोय केली. पण हा महाल साधासुधा नव्हता.

दुर्योधनाच्या सांगण्यावरून त्याचा मंत्री आणि शिल्पकार ‘पुरोचन’ याने ज्वलनशील पदार्थांपासून तो महाल बनवला होता.

पांडव जेव्हा या महालात रात्रीच्या समयी विश्राम करत असतील तेव्हा हा महाल पेटवून द्यायचा आणि महालाला आग लागल्याने त्यात पांडव आणि माता कुंती बळी पडली असा कांगावा सगळीकडे करायचा असा दुर्योधनाचा डाव होता. हा सगळा डाव अमावास्येच्या रात्री रचायचा असा दुर्योधनाचा विचार होता

पण सुदैवाने दुर्योधनाच्या या कपटी योजनेची खबर विदुराला मिळाली आणि त्याने त्वरित लाक्षागृहातून बाहेर पडण्याचा संदेश युधिष्ठीराकडे धाडला. सोबतच एक माणूसही पाठवला ज्याने त्या लाक्षागृहातून बाहेर पडणारा एक भुयारी मार्ग बनवला आणि पांडव मृत्यूचा दाढेतून बाहेर पडले.

बाहेर पडण्यापूर्वी पांडवांनी स्वत:च त्या महालाला आग लावली. त्या आगीत पुरोचन आणि त्याचे साथी जळून खाक झाले.

पण इकडे सर्वांनाच असे वाटले की पांडव त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या पुढची कथा आपण देखील जाणताच!

 

lakhamandal-village-marathipizza01

स्रोत

पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की महाभारतातील हे लाक्षागृह ज्या ठिकाणी बनवण्यात आले होते ती जागा उत्तराखंड राज्यात आजही अस्तित्वात आहे.

उत्तराखंड राज्यात निसर्गसौंदर्याने नटलेले ‘लाखामंडल’ नावाचे एक गाव आहे.

 

lakhamandal-village-marathipizza02

स्रोत

येथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महाभारतातील लाक्षागृह पुरोचनाने दुर्योधनाच्या आदेशावरून येथेच उभारले होते, म्हणूनच या गावाला ‘लाखामंडल’ हे नाव पडले. कित्येक कोरीव शिल्पांमुळे हे गाव आकर्षणाचं ठिकाण झालय!

महाभारतातील कथेनुसार पांडवांनी एका भुयारी मार्गाच्या सहाय्याने लाक्षागृहातून स्वत:ची सुटका करून घेतली होती. येथील गावकरी म्हणतात की तोच भुयारी मार्ग  येथील एका प्राचीन गुहेशी जोडला गेला आहे.

 

lakhamandal-village-marathipizza03

स्रोत

येथे एक पुरातन शिवमंदिर देखील पाहायला मिळते. येथील शिवलिंग ग्रेफाईटपासून बनलेले आहे हे विशेष! जाणकारांच्या नुसार अज्ञातवासात असताना या शिवलिंगाची स्थापना युधिष्ठिराने केली होती.

या शिवलिंगाचे मुख्य आकर्षण हे आहे की जेव्हा यावर जलाभिषेक केला जातो तेव्हा हे शिवलिंग चमकते आणि जलाभिषेक करणाऱ्या व्यक्तीचे प्रतिबिंब या शिवलिंगावर दिसते.

 

lakhamandal-village-marathipizza04

स्रोत

शिवमंदिराच्या बाजूला दोन मुर्त्या आढळतात. या मुर्त्या भीम आणी अर्जुनाच्या आहेत असे येथील गावकरी सांगतात.

 

lakhamandal-village-marathipizza05

स्रोत

lakhamandal-village-marathipizza06

स्रोत

नक्की हे ठिकाण महाभारतातील घटनेचे आहे या बद्दल ठोस दावा अजूनही कोणाला करता आला नाही.

पण महाभारतातल्या या संदर्भामुळे किंवा नंतर त्या लाखामंडल इथे खोदकाम करत असताना सापडलेल्या आणि प्राचीन महत्व असेल्या शिवलिंगांमुळे ‘लाखामंडल’ या गावाला देवस्थानाचे स्वरूप मात्र लाभले आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?