कौरवांनी याच ठिकाणी पांडवाना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता?!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

महाभारतातील कथा आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय. त्यापैकीच एक कथा म्हणजे लाक्षागृहातून पांडवांची सुटका..!

कौरवांचा पांडवांबद्दल असणारा द्वेष तर जगजाहीर होताचं. त्यातच युधिष्ठिराला युवराज घोषित केल्याने दुर्योधनाचा अगदी तिळपापड झाला  आणि म्हणूनच सर्व पांडवाचा एकाच ठिकाणी निकाल लावावा या हेतूने त्याने लाक्षागृहाची शक्कल लढवली. त्याने पांडवांना आणि कुंतीला बळजबरीनेच वारणावताला जत्रा पाहण्यासाठी पाठवले आणि तेथे एका महालात त्यांची रहायची सोय केली. पण हा महाल साधासुधा नव्हता. दुर्योधनाच्या सांगण्यावरून त्याचा मंत्री आणि शिल्पकार ‘पुरोचन’ याने ज्वलनशील पदार्थांपासून तो महाल बनवला होता.

पांडव जेव्हा या महालात रात्रीच्या समयी विश्राम करत असतील तेव्हा हा महाल पेटवून द्यायचा आणि महालाला आग लागल्याने त्यात पांडव आणि माता कुंती बळी पडली असा कांगावा सगळीकडे करायचा असा दुर्योधनाचा डाव होता. पण सुदैवाने दुर्योधनाच्या या कपटी योजनेची खबर विदुराला मिळाली आणि त्याने त्वरित लाक्षागृहातून बाहेर पडण्याचा संदेश युधिष्ठीराकडे धाडला. सोबतच एक माणूसही पाठवला ज्याने त्या लाक्षागृहातून बाहेर पडणारा एक भुयारी मार्ग बनवला आणि पांडव मृत्यूचा दाढेतून बाहेर पडले.

बाहेर पडण्यापूर्वी पांडवांनी स्वत:च त्या महालाला आग लावली. त्या आगीत पुरोचन आणि त्याचे साथी जळून खाक झाले. पण इकडे सर्वांनाच असे वाटले की पांडव त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या पुढची कथा आपण देखील जाणताच !

lakhamandal-village-marathipizza01

स्रोत


पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की महाभारतातील हे लाक्षागृह ज्या ठिकाणी बनवण्यात आले होते ती जागा उत्तराखंड राज्यात आजही अस्तित्वात आहे. उत्तराखंड राज्यात निसर्गसौंदर्याने नटलेले ‘लाखामंडल’ नावाचे एक गाव आहे.

lakhamandal-village-marathipizza02

स्रोत

येथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महाभारतातील लाक्षागृह पुरोचनाने दुर्योधनाच्या आदेशावरून येथेच उभारले होते, म्हणूनच या गावाला ‘लाखामंडल’ हे नाव पडले. महाभारतातील कथेनुसार पांडवांनी एका भुयारी मार्गाच्या सहाय्याने लाक्षागृहातून स्वत:ची सुटका करून घेतली होती. येथील गावकरी म्हणतात की तोच भुयारी मार्ग  येथील एका प्राचीन गुहेशी जोडला गेला आहे.

lakhamandal-village-marathipizza03

स्रोत

येथे एक पुरातन शिवमंदिर देखील पाहायला मिळते. येथील शिवलिंग ग्रेफाईटपासून बनलेले आहे हे विशेष! जाणकारांच्या नुसार अज्ञातवासात असताना या शिवलिंगाची स्थापना युधिष्ठिराने केली होती. या शिवलिंगाचे मुख्य आकर्षण हे आहे की जेव्हा यावर जलाभिषेक केला जातो तेव्हा हे शिवलिंग चमकते आणि जलाभिषेक करणाऱ्या व्यक्तीचे प्रतिबिंब या शिवलिंगावर दिसते.

lakhamandal-village-marathipizza04

स्रोत

शिवमंदिराच्या बाजूला दोन मुर्त्या आढळतात. या मुर्त्या भीम आणी अर्जुनाच्या आहेत असे येथील गावकरी सांगतात.

lakhamandal-village-marathipizza05

स्रोत

lakhamandal-village-marathipizza06

स्रोत

नक्की हे ठिकाण महाभारतील घटनेचे आहे या बद्दल ठोस दावा अजूनही कोणाला करता आला नाही. परंतु ‘लाखामंडल’ गाव हे महाभारताशी जोडले गेल्याने या गावाला देवस्थानाचे स्वरूप मात्र लाभले आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

One thought on “कौरवांनी याच ठिकाणी पांडवाना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता?!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *