किचनमधल्या बहुपयोगी “इप्सम सॉल्ट”च्या अशा वापराची तुम्ही कल्पनाही केली नसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===  

आपण आत्तापर्यंत इप्सम सॉल्ट फक्त किचनमध्येच वापरत होतो. पण आता ते घरातल्या बागेत, घराजवळच्या शेतात, चांगल्या शेती उत्पादनासाठी वापरू शकतो आणि चांगले रिझल्ट्स मिळवू शकतो.

आजकाल अनेक रसायने वापरून शेती फवारणीची औषधे बनवली जातात. त्याचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे की, त्या घातक रसायनांमुळे अनेक मोठे रोग आपल्याला होण्याची भीती निर्माण झाली आहे.

अनेक नामवंत मंडळी कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाचा सामना करत असल्याच्या बातम्या आपण वाचतो आहोत. मग रासायनिक औषध फावरणीला दुसरा काही पर्याय नाही का? तर आता ह्याला पर्याय म्हणून संशोधन चालू आहेच आणि काही पर्याय सुद्धा तयार आहेत.

त्यातलाच एक महत्वाचा पर्याय म्हणजे “इप्सम सॉल्ट”. जे आजपर्यंत आपण फक्त किचनमध्येच वापरायचो. आता त्याचे आश्चर्यकारक फायदे जर आपण पहाल तर चकित व्हाल.

 

epsom solt InMarathi

आधी आपण बागेमध्ये त्याचा कसा फायदा आहे ते बघू. आपण टेरेसवर, घराच्या अंगणात किंवा परस बागेत मोठ्या प्रमाणात फुलझाडे, शोभेची झाडे, फळझाडे, बोगन वेल, तसेच काही प्रमाणात भाजीपलाही लावतो. त्यात आपल्याला अनेक अडचणीही येतात.

लावलेले झाड नीट उगवत नाही किंवा त्याची पाने जळून जातात, अचानक पिवळी पडतात. बारीक न दिसणाऱ्या किडीचा हल्ला होतो आणि झाड मरून जातं. झाडाची वाढ कधी कधी चांगली होत नाही. पानं गळून जातात.

चांगली फळं लागत नाहीत, फळांवर रोग पडतो. पानांवर अळ्या दिसायला लागतात, त्या सगळी पानं खाऊन टाकतात आणि झाडं जळून जातात.अशा अनेक अडचणी समोर येऊन उभ्या राहतात. त्यामुळे केलेली सगळी मेहनत वाया जाते.

मग जर सहज साधा उपाय ह्या अडचणींवर करता आला तर किती बरं होईल ना? मग वाचा पुढे अगदी साधा सोपा “इप्सम सॉल्टचा” उपाय.

ह्या इप्सम सॉल्टमुळे काय फायदा होतो हे तुम्हाला कळेल आणि गार्डनिंग करणं सोपं आणि आनंद देणारं ठरेल.

तुमच्या बागेतले गुलाब छान टवटवीत ताजे तवाने होतील.

इप्सम सॉल्टच्या वापराने तुमच्या बागेतील गुलाब चांगल्या रंगाने खुलून येतील. गुलाबाची रोपे ह्या इप्सम सॉल्टच्या वापराने बहरतात आणि फटाफट वाढ होते. ही रोपे सशक्त होतात. रोपांमधल्या सल्फर, नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण चांगले वाढते.

आपण ज्यावेळी गुलाबाचे रोप लावतो त्यापूर्वी अर्धा कप इप्सम सॉल्ट साधारण  ४ लिटर पाण्यात विरघळून त्यात थोड्यावेळ ते रोप ठेऊन नंतर ते रोप लावावे. त्यानंतर रोप लावून झाल्यावर रोपाच्या बाजूला एक छोटा खड्डा करून त्यात एक चमचा इप्सम सॉल्ट टाकून त्यावर हलकेच माती टाकून खड्डा बुजवावा. नंतर झाडाला पाणी द्यावे.

त्यानंतर रोप वाढत असताना महिन्यातून एकदा जमिनी पासून वरती एक फुटापर्यंत इप्सम सॉल्ट एक चमचा, पाण्यात मिसळून रोपावर स्प्रे करावे. झाड जोमाने वाढते.

चांगले रसरशीत टोमॅटो किंवा काळी मिरी पिकवा आपल्या परसबागेत

ह्या दोन्ही झाडांना मॅग्नेशिअम ची आवश्यकता असते. ही दोन्ही झाडे लावताना सगळ्यात स्वस्त मॅग्नेशिअम देणारे खत म्हणजे इप्सम सॉल्ट. ह्या इप्सम सॉल्टमुळे ही झाडे मजबूत बनतात आणि जास्त फळे देतात. चांगल्या गडद रंगाची फळे तयार होतात.

 

epsom-salt-inmarathi01
naturallivingideas.com

ह्यासाठी झाडाच्या बाजूला एक छोटा खड्डा करून त्यात एक चमचा इप्सम सॉल्ट घालून हलकेच तो खड्डा मातीने बुजवा आणि पाणी द्या. तसेच रोप वाढत असताना त्यावर एक चमचा इप्सम सॉल्ट साधारण ४ लिटर पाण्यात विरघळून त्याची फवारणी दोन आठवड्यातून एकदा करावी. थोड्या कोमट पाण्यात इप्सम सॉल्ट त्वरीत विरघळते.

वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडेही अशा पद्धतीने वाढविल्यास ती ताकदवान होतात, चांगली बहरतात आणि भरपूर फुले देतात.

नैसर्गिक रीतीने गुच्छेदार फुले देणाऱ्या झाडांना हे इप्सम सॉल्ट फार उपयोगी पडते, पाने पिवळी पडणे हे इप्सम सॉल्ट मुळे होत नाही. पाने सतत हिरवीगार आणि टवटवीत राहतात.

आपल्या घराच्या आसपास जर हिरवे गवत (Lawn) लावले असेल तर त्यावर सुद्धा इप्सम सॉल्ट फावरल्यास ते गवत हिरवे, ताजे तवाने दिसते. त्यावर कीड लागत नाही.

फळझाडे अतिशय जोमाने वाढतात आणि बहरतात. झाडाच्या जवळ जमिनीवर खड्डा करून एक चमचा इप्सम सॉल्ट टाकून खड्डा बुजवायचा आणि नंतर पाणी द्यायचे. चवदार, चांगल्या रंगाची तजेलदार फळे ही झाडे देतात. किडीपासून झाडांचे रक्षण होते आणि झाडे ताकदवान होतात.

 

epsom-salt-inmarathi04
gardeningchannel.com

पाम ट्री ची बहारदार वाढ इप्सम सॉल्टमुळे होते. पाम ट्री च्या चमकदार झावळ्या हिरव्यागार आणि तजेलदार दिसतात.

ह्या झावळ्या पिवळ्या पडत नाहीत. ह्यासाठी तीच पद्धत, जमिनीवर झाडाजवळ खड्डा करून एक चमचा इप्सम सॉल्ट घालून खड्डा बुजवून पाणी देणे आणि ४ लिटर पाण्यात १ चमचा इप्सम सॉल्ट विरघळून त्याची फवारणी झावळ्यांवर करावी.

काही झाडांची पाने आपोआप गुंडाळली जातात (curly) तशी पाने शोभा देत नाहीत म्हणून इप्सम सॉल्ट फवारणीने ही पाने गुंडाळली जात नाहीत, सरळ राहतात, ताजी तवानी दिसतात.

बोगन वेली सारख्या वेलींची पाने किंवा फुले पिवळी पडतात, ती पिवळी पडू नयेत म्हणून जर आपण इप्सम सॉल्टची फवारणी केली तर सतत भरलेली राहतात आणि ताजी राहतात.

मॅग्नेशिमच्या कमतरतेमुळे काही झाडांच्या पानांच्या कडा पिवळ्या पडतात, त्या पिवळ्या पडू नयेत म्हणून सुद्धा तुम्ही ह्या फवारणीची पद्धत वापरू शकता.

इप्सम सॉल्टचे टेक्निकल नाव आहे ‘मॅग्नेशियम सल्फेट’. ज्यामुळे पिवळेपणाचा हा प्रश्न कायमचा जातो आणि झाड चांगले वाढीला लागते. सरळ पानांवर फवारणी करावी.

जर काही कारणामुळे आपण एखादे रोप दुसरीकडे किंवा दुसऱ्या कुंडीत लावतो त्यावेळी झाडाला, मुळांना धक्का लागतो, झटका बसतो. अशा धक्क्यापासून झाडांना सावरण्याचे महत्वाचे काम इप्सम सॉल्ट करते.

म्हणजे झाड मजबूत बनवण्याचे मोठे काम इप्सम सॉल्टमुळे होते. जर इकडून तिकडे किंवा एका हवामानातून दुसऱ्या वेगळ्या हवामानात नेले तरी झाडाला काहीही त्रास होत नाही.

इप्सम सॉल्टमुळे जमिनीतल्या किड्यांचा प्रादुर्भाव झाडांवर होत नाही. किडीपासून संरक्षण होते आणि ह्या इप्सम सॉल्टमध्ये काही विषारी औषधी घटक नसल्याने लहान मुलांना त्यापासून काही त्रास होत नाही. म्हणजे सुरक्षित आहे.

 

epsom-salt-use-inmarathi
youtube.com

उत्कृष्ट तण नाशक म्हणून ह्याचा उपयोग होतो. जमिनीवरचा भाजीपाला, इतर लागवड केल्यावर अनावश्यक गवत, तण हे उगवते आणि त्यामुळे रोपाच्या वाढीला आडकाठी निर्माण होते, म्हणजे जमिनीतील अन्नरस हे तण जलद गतीने शोषून घेतात आणि आपण लावलेल्या रोपांची चांगली वाढ होत नाही.

ह्या अनावश्यक तणांची वाढ इप्सम सॉल्टमुळे रोखली जाते आणि आपल्याला चांगले उत्पादन मिळते.

असे हे बहुगुणी आणि स्वस्त “इप्सम सॉल्ट” हे आजच्या रासायनिक परिणामांपासून आपल्याला निश्चितच फायदा देईल आणि चांगले उत्पादन मिळवून देईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?