या भारतीयाच्या नावावरून एका धूमकेतूला आणि लघुग्रहाला नाव पडले आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

तुम्हाला पुरब और पश्चिम सिनेमातले ते गाणे आठवते का ? “जब झीरो दिया मेरे भारत ने, दुनिया को तब गिनती आयी, तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई” आपल्या अचिव्ह्मेट्स ह्या गाण्यात गीतकाराने अगदी योग्य मांडल्या आहेत.

आजच्या लेखात आम्ही तुम्हाला आपल्या भारतीय बांधवाच्या अशाच एका अचिव्हमेंट ची माहिती सांगणार आहोत जी वाचून तुमची मान अभिमानाने उंचावेल.

धूमकेतू” हयाबद्दल आपण शाळेत शिकलो आहोतच, धूमकेतू हा दगड, माती, बर्फ आणि वायुपासून तयार होतो आणि सौरमंडळाची परिक्रमा करतो.

ही एक परिक्रमा करण्यासाठी त्याला हजारो वर्षे लागतात त्यामुळे हे धूमकेतू  आपल्याला एकदाच दिसतात.

 

Comet
Irish Times

जगभरातील अनेक शास्त्रज्ञ ह्या धूमकेतुंचा सतत अभ्यास करत असतात. अशाच अभ्यासातून एका भारतीयाने एका धूमकेतुच शोध लावला आणि त्या धूमकेतुला त्या भारतीय शास्त्रज्ञाचे नाव देण्यात आले कोण होते हे शास्त्रज्ञ? बघूया आजच्या ह्या लेखात.

“एम के वेणु बापू” जगातील महान खगोलशास्त्रज्ञापैकी एक, ज्यांच्या नावावरून एका धूमकेतुला आणि लघुग्रहाला नाव देण्यात आले.

ह्यांनी स्वतंत्र भारतात ऑप्टिकल खगोलशास्त्राच्या पुनरुज्जीवनासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. त्यांना आधुनिक खगोलशास्त्राचे जनक म्हंटले जाते.

एम के वेणु बापू ह्यांचा जन्म १९२७ साली मनाली येथे झाला. ते नेहमी म्हणत की, “ खगोलशास्त्र शिकण्याची त्यांची सुरुवात त्यांच्या बाबांच्या कुशीतच झालेले होती.

वेध शाळेतील दुर्बिणी इतर उपकरणांच्या इन्स आणि आऊट्स बद्दल ते  वडिलांच्या साथीनेच लवकरच शिकले.

 

Vbappu
Wikipedia

त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट एनि कान्वेंट आणि इस्लामी हायस्कूल येथे झाले. १९४६ साली त्यांनी विज्ञान शाखेत पदवी मिळविली आणि १९४९ साली हैदराबाद येथी निजाम कॉलेज मधून मास्टर इन फिजिक्स ची पदवी मिळविली.

१९४६ साली त्यांनी चल तार्‍यांबद्दल आपला पहिला पेपर प्रकाशित केला.

एमएससी पूर्ण केल्यानंनातर त्यांना आपले शिक्षण पुढेही सुरूच ठेवायचे होते. मात्र भारतात अशा शिक्षण संस्था उपलब्ध नव्हत्या. योगायोगाने त्यांची ओळख प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि हार्वर्ड विश्वविद्यालयाचे प्रोफेसर हर्लो ह्यांच्याशी झाली.

वेणु बापू ह्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन त्यांच्यासाठी हार्वर्ड विश्वविद्यालयात शब्द टाकण्याचे ठरविले आणि त्यानंतर लवकरच वेणु बापू ह्यांनी आपले पुढचे शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून प्रतिष्ठित हार्वर्ड विश्वविद्यालयात पूर्ण केले.

याच काळात त्यांनी त्या धूकेतूचा शोध लावला ज्याला नंतर वेणु बापू ह्यांचे नाव देण्यात आले.

झाले असे की, २ जुलै १९४९ रोजी जेव्हा ते रात्री आकाशाचे फोटो काढण्यासाठी गेले तेव्हा तिथे त्यांना एक चकाकता चल तारा दिसला.

 

venu-bappu. Comet
Manorama Online

हयाबद्दल त्यांनी आपले प्रोफेसर बार्ट बोक आणि आपला सहयोगी गोर्डन न्यूकिर्कला सांगितले. त्यांनी नव्या धूमकेतूचा शोध लावलेला आहे ह्याची खात्री केली.

त्यानंतर त्यांनी त्या धूमकेतूच्या परिक्रमेच्या कक्षेचा अभ्यास केला असता त्यांना असे लक्षात आले की, आता हा धूमकेतू थेट ६०,०००  वर्षांनीच पुन्हा पाहायला मिळेल.

त्यानंतर इंटरनॅशनल एस्ट्रोंनोमिकल यूनियनने अधिकृतरीत्या ह्या धूमकेतुला बापू-बोक-न्यूकिर्क धूमकेतू (सी/१९४९ एन १) असे नाव दिले.

ह्यासाठी वेणु बापू ह्यांना एस्ट्रोंनोमिकल सोसायटी ऑफ द पॅसिफिक ह्यांचे कडून धूमकेतू पदक सुद्धा देण्यात आले.

हार्वर्ड विश्व विद्यालयात बापू आपली पी एच डी पूर्ण करायला गेले होते. आपल्या थीसिस चाच एक भाग म्हणून त्यांनी वुल्फ रेएट नावाने ओळखल्या जाणार्‍या तार्‍यांच्या समुहाचा अभ्यास केला.

ह्यामुळे त्यांना कार्नेगी फेलोशिप मिळाली आणि त्याकाळच्या माऊंट पामर येथील सर्वात मोठ्या २०० इंचाच्या टेलिस्कोपवर काम करण्याची संधी मिळाली.

 

mk bapu nmarathi
india.com

येथे त्यांनी ओलीन विल्सन सोबत काम केले. दोघांनीही वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारे चकाकणार्‍या तार्‍यांचे एक स्पेक्ट्रोस्कोपीक विश्लेषण केले. आणि त्या तार्‍यांची चमक आणि त्याची उत्सर्जन किरणे ह्याच्या  गुणोत्तरचा वापर त्यांनी लांबच्या तार्‍यांमधील अंतर मोजण्यासाठी उपकरणासारखा केला.

त्यांनी १९५७ साली एस्ट्रोफिजिकल जर्नल ऑफ द अमेरिकन एस्ट्रोनोमिकल सोसायटी येथे पेपर प्रकाशित केला. त्यांच्या ह्या शोधाला ‘”बापू विल्सन” प्रभाव म्हणून ओळखले जाते

१९५३  साली ते परत आले आणि नैनीताल येथील वेधशाळेच्या निर्माण कार्यात एक प्रमुख भूमिका निभावली. १९६० साली कोडईकनाल येथी वेधशाळेचे प्रमुख म्हणून पदभार सांभाळला.

आणि वेधशाळेचे आधुनिकीकरण करण्यात आपले योगदान दिले आणि १९८६ साली तमिळनाडूच्या कवलूर येथे एक शक्तीशाली दुर्बिण बसवून वेधशाळेची स्थापना केली.

त्यांनी खगोलशास्त्रातील सर्वात मोठा सन्मान मिळविला जेव्हा ते १९७९ ते १९८२ ह्या कलावधीसाठी आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्ष बनले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?