अविश्वसनीय आणि हृदयद्रावक….. एक कुटुंब ज्यांनी तब्बल ४० वर्षे ‘जग’ पाहिले नव्हते!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आधुनिकीकरणाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने जग अधिकच जवळ येत आहे ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाही. मोबाईल आणि कम्प्युटर तर त्याचे जिवंत साक्षीदार आहेत आणि इंटरनेट त्याचा दुवा. आज घरबसल्या जगभरातील कोणीतीही गोष्ट आपण सहज पाहू शकतो. हजारो किमी दूरवर असलेल्या व्यक्तीशी बोलू शकतो ते देखील त्याचा चेहरा पाहून अर्थात व्हिडियो कॉलिंग. एखाद्याला वस्तू पाठवायची असेल तर ती देखील सहज पाठवू शकतो. पूर्वी एकट्याने शहरात राहायचं म्हटलं तर सोपी गोष्ट नव्हती. घरच्यांची, मित्रांची आठवण यायची. पण आता मात्र कितीही दूर जा आपण एकटे असल्यासारखे वाटतच नाही. म्हणजेच काय तर आजच्या युगातील कोणीही मनुष्य घ्या…तो जगापासून अलिप्त राहूच शकत नाही. तो नेहमी जगाशी जोडलेला असतो. पण मंडळी असे असले तरी आता आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती वाचून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. आताच आपण पाहिलं की तंत्रज्ञान इतकं प्रगत झालंय की, माणूस जगापासून एकटा राहूच शकत नाही, पण मंडळी एक असं कुटुंब आहे ज्यांनी तब्बल ४० वर्षे एकट्याने काढली आहेत. या ४० वर्षांत बाहेरील जगाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. काय म्हणता? अजूनही विश्वास बसत नाहीये? मग हे प्रकरण तुम्ही जाणून घ्याच!

lykov-family-marathipizza01
davidjrodger.files.wordpress.com

रशियातील लायकोव्ह कुटुंब तब्बल ४० वर्षे जगाच्या संपर्कात नव्हते. यादरम्यान ते सायबेरियातील पर्वतात अबॅकन जिल्ह्यात वास्तव्यास होते. १९७८ मध्ये रशियन जिऑलॉजिस्टच्या पथकाने त्यांना शोधून काढले. जिऑलॉजिस्टचा हा समूह सायबेरियात पोहोचला तेव्हा त्यांना हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी योग्य ठिकाण सापडत नव्हते. सगळीकडे उंच उंच झाडे होती. लँडिंगसाठी जागा शोधत हा समूह नकळत अबॅकनपर्यंत पोहोचला. सहा हजार फूट उंचीवर फक्त देवदार वृक्षांचे दाट जंगल होते. अचानक तेथे त्यांना मानवी वस्तीच्या खुणा दिसल्या. हाताने बांधलेली एक केबिन दिसली. ते पाहून असे वाटत होते की, कुणीतरी येथे खूप दिवसांपासून राहत आहे. त्यांच्यासाठी हा खूप मोठा शोध होता. हा डोंगर मानवी वस्तीपासून सुमारे २४० किलोमीटर अंतरावर होता. या जागेला यापूर्वी कुणीही भेट दिली नव्हती. सोव्हिएत संघाकडेसुद्धा या जिल्ह्यात कुणी राहत असल्याची नोंद नव्हती.

१८ व्या शतकात रशियात नवा नियम लागू करण्यात आला होता. त्यानुसार ख्रिश्चनांना दाढी ठेवण्यासाठी कर भरावा लागणार होता. कर चुकवल्यास दाढी काढावी लागणार होती. लायकोव्ह कुटुंब १७ व्या शतकातील परंपरा जपणारे होते. रशियन नियमांपासून बचाव करण्यासाठी १९३६ मध्ये कुटुंबातील कार्प हे पत्नी अकुलिना, सेव्हिन नावाचा नऊ वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांच्या नतालिया नावाच्या मुलीसह रशिया सोडून पळून गेले.

lykov-family-marathipizza02
tumblr.com

जाताना ते काही सामान आणि बियाणे सोबत घेऊन गेले. त्यातून त्यांनी एक छोटा बगिचा तयार केला. टोमॅटो खाऊन आयुष्य जगू लागले. १९४० मध्ये कार्पला आणखी एक दिमित्री नावाचा मुलगा आणि १९४३ मध्ये अगाफिया नावाची मुलगी झाली. दोघांनीही आपल्या कुटुंबीयांशिवाय इतर माणसांना पाहिले नव्हते. १९६१ मध्ये कडाक्याची थंडी पडल्यामुळे त्यांचा बगिचा नष्ट झाला. अशा परिस्थितीत अकुलिनाने मुलांना बुटांचे चामडे खाऊ घालून जिवंत ठेवले. पण ती स्वत: वाचू शकली नाही. १९८१ च्या आसपास या कुटुंबातील अनेक सदस्य मरण पावले. साविन आणि नतालिया मूत्रपिंड निकामी झाल्याने मरण पावले. न्यूमोनिया झाल्याने दिमित्रीचे निधन झाले. दिमित्रीचा मृत्यू हा जिऑलॉजिस्टसाठी धक्कादायक होता. कारण तिला न्यूमोनियाचा संसर्ग तिच्या मित्रांमुळेच झाला होता. दिमित्रीने हेलिकॉप्टरमधून शहरात जाण्यासही नकार दिला होता. खूप समजावून सांगूनही कुटुंबातील उर्वरित सदस्य त्यांच्यासोबत बाहेर पडले नाहीत. १९८८ मध्ये कार्पच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी अगाफिया एकटीच राहिली. तरीही तिने इतर कुटुंबीयांप्रमाणे ती जागा सोडली नाही.

lykov-family-marathipizza03
culturacolectiva.com

या अविश्वसनीय कहाणीवर पत्रकार व्हेसिली पेस्कोव्ह यांनी लिहिलेले Lost in the Taiga: One Russian Family’s Fifty-Year Struggle for Survival and Religious Freedom in the Siberian Wilderness हे पुस्तक १९९४ साली प्रकाशित झाले. फ्रांसमध्ये हे एक बेस्ट सेलर ठरले. याच पुस्तकातील प्रसंगांवर आधारित Lost in the Taiga नावाचा एक चित्रपट देखील येऊन गेला आहे. याबाबत   अधिक जाणून घ्यायचे असल्यास जीज्ञासुंनी या चित्रपटाचा आस्वाद नक्की घ्यावा!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?