मोठमोठाल्या सेलेब्रिटींना लाजवतील असे बंगले – खास कुत्र्यांसाठी बनवलेले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

पाळीव प्राणी हे सर्वांनाच आवडतात आणि त्यातही कुत्रा म्हंटल तर तो सर्वांच्याच आवडीचा, हा आता याला काही लोक अपवाद ठरतात खरे. पण तरी या जगात ‘Dogs Lovers’ ची कमी नाही.

कारण कुत्रा हा प्राणी मुळातच मनुष्याच्या मित्रासारखा आहे, तसेच तो तेवढाच प्रामाणिकही आहे. पण हा प्राणी तेवढाच भयानकही आहे. जर त्याला धोक्याचा संशय आला तर तो तुम्हाला आपलं रौद्र रूप दाखवतो.

 

Dogs magnificent Homes.Inmarathi
jagranimages.com

पण कुत्रे तेवढेच प्रामाणिक देखील असतात, काही लोकांना आपला पाळीव प्राणी एवढा आवडत असतो की, ते त्याचे सर्व लाड पुरवतात आणि त्यांच्यावर खूप पैसे देखील खर्च करण्याची तयारी ठेवतात.

आज आम्ही तुम्हाला कुत्र्यांची काही अशी घरं दाखवणार आहोत, जी पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.

इंग्लंडपासून स्कॉटलंडपर्यंत काही श्रीमंत कुत्रे प्रेमी हे इतर कुत्रे पाळणाऱ्या लोकांपेक्षा खूपच पुढे गेले आहेत.

त्यांनी आपल्या या आवडत्या पाळीव प्राण्यांसाठी लाखो – करोडो किंमतीचे अलिशान महाल आणि बंगले बनवायला सुरुवात केली आहे. या शाही घरांमध्ये या कुत्र्यांसाठी प्रत्येक प्रकारची सुविधा करण्यात आलेली आहे, ज्या माणसांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दिल्या जातात.

 

Dogs magnificent Homes.Inmarathi1
kendrabindu.com

या कुत्र्यांच्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या सुख सुविधा ह्या आपल्या विचाराच्या पलीकडील्या आहेत.

या घरांमध्ये एसी, रूम हिटर, डॉग फूड डिस्पेन्सर याबरोबरच इंटरकॉम ते व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा खासकरून मालक आणि प्राण्यांमध्ये लाइव्ह कम्युनिकेशनसाठी असेल, त्यामुळे ते आपल्या या प्रिय मित्राला कधीही पाहू शकतात आणि त्याच्याशी बोलू शकतात.

पाळलेल्या कुत्र्यांसाठी हे आरामदायी बंगले बनवणाऱ्या कंपनीचे नाव हेकाते वेरोना आहे. या कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांनी बनवलेल्या घरांमध्ये कुत्र्यांसाठी ते सर्व काही असेल जे त्यांना आवडते.

बंगल्यामध्ये असलेल्या खूप साऱ्या खिडक्यांच्या मदतीने ते आरामात बाहेरचे दृश पाहू शकतात. त्याचबरोबर या विलासी घरांचे प्रवेशद्वार देखील प्रत्येकाच्या पसंतीनुसार कस्टमाइज आणि सुंदर असतील.

 

Dogs magnificent Homes.Inmarathi2
forum.p24.hu

कुत्र्यांसाठी हे हॉटेलसारखे घर बनवणाऱ्या या कंपनीने लक्झरी होम्सपासून व्हिला अपार्टमेंट बनवायला सुरुवात केली आहे.

या घरांची किंमत ३० हजार पौंडपासून दीड लाख पौंड दरम्यान असेल. भारतीय रुपयांप्रमाणे या घरांची किंमत जवळपास २५ लाख ते सव्वा कोटींमध्ये असेल. या किंमतीवरून तुम्ही अंदाज लावू शकता की, या घरांचा लुक किती भारी असेल.

अशी ही कुत्र्यांसाठी बनवली जाणारी घरे खूपच आरामदायी आणि कुत्र्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा असणारी असणार आहेत. पण ही घरे सामान्य प्राणी प्रेमींना मात्र परवडणारी नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?