हस्तमैथुन करताना लता दीदींचं गाणं! मंगेशकर कुटुंब संतप्त!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लस्ट स्टोरीज नावाचा नेटफ्लिक्सचा एक भारतीय संकलित चित्रपट आहे, जो चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट फिल्म्सला एकत्र करून तयार केला आहे. त्यात दिबाकर बॅनर्जी, झोया अखतर, अनुराग कश्यप आणि करणं जोहर या बॉलीवूडच्या काही प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या शॉर्ट फिल्म्स आहेत.

ह्या चित्रपटाला जरी समीक्षक भरभरून दाद देत असले तरी हा चित्रपट त्याचातील बोल्ड कंटेंटमुळे प्रसिद्ध होत आहे. खासकरून त्यात असलेला हस्तमैथुनाचा एक प्रसंग ज्यात कियारा अडवाणी आणि नेहा धुपिया आहेत.

यात भरीसभर म्हणून काय तर गाणकोकिळा लता मंगेशकरांच्या कुटुंबियांनी मात्र करणं जोहर विषयी नाराजी व्यक्त केली आहे कारण त्याने त्यात अनावश्यक त्याचाच कभी खुशी कभी गम या चित्रपटातील गाण्याचा वापर हस्तमैथुनाच्या सिन मध्ये केला आहे, ज्यात कियारा आडवाणीचा समावेश आहे.

 

lust-stories-inmarathi
theparadiseofcinema.wordpress.com

त्यांचा एका कुटुंबियांने एका खाजगी वेबपोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, एका हस्तमैथुनाच्या दृश्यात ज्यात हिरोईन चरमानंद घेत आहे त्यावेळी एका भजनसदृश्य गाण्याला वाजवण्याने काय साध्य होणार होतं? दुसऱ्या गाण्याचा वापर करायला हवा होता.

यावरून असं भासत होतं की कुटुंबाला यामुळे खूप नाचक्कीचा सामना करावा लागला आहे. लतादीदींना आम्ही या वयात कुठल्याही अश्लील प्रसंगाचा भाग बनवू इच्छित नाही, करन जोहरने लता दीदींच्या या अजरामर कलाकृतींचा असा वापर करायला नको होता. हे गाणे लता दीदींनी गावे यासाठी लतादीदींच्या विनवण्या करणने केल्या होत्या.

जेव्हा लतादीदींनी गाणं गायलं तेव्हा करणने स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली होती. मग आता असं काय झालं? असं मत लतादीदींच्या कुटुंबातील व्यक्तीने व्यक्त केले.

 

lust-stories-scene-inmarathi
Bollywoodpapa.com

तरी या प्रकरणावर इंटरनेटवर लोकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्या सिनमध्ये असं काय होतं ? अशी विचारणा लोक करत आहेत. लोक म्हणताय की एखाद्या स्त्रीने हस्तमैथुन करण्याचा प्रसंगावर भारतात अश्या विचित्र प्रतिक्रिया का देत आहेत. लोकांनी वेगवेगळे मत या संदर्भात ट्विटर आणि इतर सोशल साईट्स वर मांडले आहेत.

मागे अश्याचप्रकारचा रोष स्वरा भास्करला तिने वीरें दि वेडिंग या चित्रपटात केलेल्या सिन वर ओढवून घ्यावा लागला होता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?