' मिस यु मिस्टर म्हणताय ? लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपमधील अंतर कमी करण्याच्या या टिप्स जरूर वाचा – InMarathi

मिस यु मिस्टर म्हणताय ? लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपमधील अंतर कमी करण्याच्या या टिप्स जरूर वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘इन अ रिलेशनशिप’ असे status आजकाल सोशल मीडिया वर सर्रास पाहायला मिळतात. रिलेशनशिप, नातं.. मग ते कोणत्याही प्रकारच असो…नात्याला ‘बॉयफ्रेंड- गर्लफ्रेंड’ एवढ्याच चौकटीत न बसवता वेगळ्या नजरेने पाहायला हवं. नातं हे आई मुलापासून चांगल्या मित्र मैत्रिणी पर्यंत कोणाचं ही असू शकतं…

काही कारणांनी माणूस शरीराने आपल्या माणसांपासून दूर जातो… मात्र त्याच वेळी मनं दूर जाऊ नयेत यासाठीचे प्रयत्न दोन्ही माणसांकडून व्हायला हवेत. यालाच आज लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप असं गोंडस नाव दिलेलं आहे. यात फक्त माणसाच्या शरीरातील अंतर वाढून चालेल पण मनातील अंतर वाढू न देणे ही खरी कसोटी असते.

 

lon distance inmarathi
metro.co.uk

 

नात्यात फूट पडणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे संभाषणातील कमतरता. चांगलं संभाषण हा उत्तम नातेसंबंधाचा पाया आहे. जर दोन माणसांमधील संपर्क आणि संभाषण हे नियमित आणि चांगलं असेल तर कितीही लांबचा माणूस जवळचा वाटतो.

दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास. माझ्या पार्टनरवर विश्वास आहे असं नुसतं म्हणून चालत नाही, तर वेळप्रसंगी तो विश्वास दाखवावा लागतो आणि दुसऱ्या माणसाने ही तो संपादन करावा लागतो. नाहीतर बरीचशी नाती माझा फोन का उचलला नाहीस? काय करत होतास/होतीस?,  मी सोडून आणखी कोणाशी बोलतोयस /बोलतेयस या आणि अशा अनेक कारणांमुळे संपतात.

जेव्हा पार्टनर वरचा विश्वास कमी होऊ लागतो तेव्हाच आपण समजावं की नात्यांची वीण कमी होत चालली आहे. “मी आहे तुझ्यासोबत” एवढे दोन शब्द ही माणसाला जवळ नसूनही खूप मोठा आधार देऊन जातात.

नातं हे पाण्यासारखे निर्मळ आणि पारदर्शी असणे जास्त महत्त्वाचं असतं. आपल्या पार्टनर च्या आयुष्यात काय चालू आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट लपवावी असं वाटणे हेच नात्याचं मोठं अपयश आहे. एकमेकांपासून लांब राहून सुद्धा एकमेकांची आयुष्य जवळून पाहणं जास्त महत्त्वाचं आणि आनंददायी असतं.

दोघांनी एकमेकांचा आदर राखणे हे नात्यात फार महत्त्वाचे आहे. तिथे मी जास्त कमावतो मी मोठा, मी दिसायला सुंदर आहे माझं ऐकावच लागेल.. वगैरे गोष्टी गौण असाव्यात. आपला पार्टनर जसा आहे तसं त्याला गुणदोषांसकट स्वीकारणे जास्त गरजेचे असते. यातूनच त्या नात्याचा सुद्धा आब राखला जातो.

 

Long Distance Relationship.Inmarathi1
wikihow.com

 

शेअरिंग हा सुद्धा चांगल्या नात्याचा पाया आहे. आपल्या पार्टनरच्या आयुष्यातली प्रत्येक महत्त्वाची गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे. लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप तर शेअरिंग वरच टिकतात. जास्तीत जास्त शेअरिंग अंतर संपवून माणसांना जवळ आणण्यास मदत करतं. शेअरिंग मुळेच नात्यातला तणाव सुद्धा कमी होतो.

आपल्या पार्टनरच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेऊन योग्य ठिकाणी त्याचे कौतुक करणे, त्याला प्रोत्साहन देणे या जरी वर वर छोट्या वाटल्या तरी खूप परिणामकारक गोष्टी आहेत. पार्टनरच्या वाढदिवसापासून त्याची महत्त्वाची परीक्षा, मीटिंग या सगळ्याची नोंद ठेवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे जी नातं टिकवायला आणि गैरसमज दूर करायला फार मोठी मदत करते.

 

long distance inmarathi 2

 

लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांमधील अंडरस्टॅंडिंग. जेवढी एकमेकांना समजून घेण्याची कुवत जास्त तेवढं नातं जास्त फुलतं. जरी तिसऱ्या माणसांकडून नात्यात गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न झाला तरी दोघांनी ते आपल्या पातळीवर समजून घेऊन त्याला कितपत महत्त्व द्यायचं याचा विचार करण गरजेचे आहे.

उदाहरणार्थ,  एखाद्याने फोन उचलला नाही याचा अर्थ तो कामात असू शकतो हे समजून घेणे महत्वाचे. अशा वेळी संशयाचे भूत मानेवर बसले तर सगळंच कठीण होऊन बसतं.

 

Long Distance Relationship.Inmarathi
yourtango.com

 

शेवटी नातं टिकवणे आणि ते फुलवणे हे त्या दोन माणसांच्या हातात असते. त्यासाठी शक्य तितका वेळ एकत्र घालवणे, एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांचा विचार करणे या गोष्टी खूप महत्त्वाची जबाबदारी बजावतात. ज्या नात्यात बंधन असूनही कधीही बंधनाची जाणीव होत नाही ते नाते जास्त निकोप असते.

जर नात्यात दोघांनी आपली मिळून अशी काही एकत्र ध्येय ठेवली तर लांब अंतरावरून सुद्धा नातं निभावणं सोप्पं जातं. त्या दोघांसोबतच त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार यांनाही आपल्या वर्तुळात सहभागी करून घेणं महत्त्वाचं ठरतं.

या सगळ्या गोष्टी कितीही परिणामकारक असल्या तरी लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये ही थोड्या कालावधी साठीच ठीक आहे. लांब राहून माणसाला माणसाची किंमत कळते हे जरी खरं असलं तरी दोन माणसांमध्ये bonding निर्माण होण्यासाठी सहवास आणि संवाद या दोन गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत.

 

Long Distance Relationship.Inmarathi4
hercampus.com

 

मात्र long distance doesn’t work म्हणणाऱ्यांसाठी वरील गोष्टी नक्कीच उत्तर ठरू शकतात आणि या गोष्टी सर्व प्रकारच्या नात्यांना तेवढ्याच चपखल पणे लागू होतात. कारण नातं कोणतही असु दे त्यात जर गोडवा नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ नसतो मग ते जवळचं असो किंवा लांबचं….

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?