' प्रत्येक स्कूलबस किंवा व्हॅन पिवळ्या रंगाची असण्यामागचं ‘लॉजिक’ ठाऊक आहे का? – InMarathi

प्रत्येक स्कूलबस किंवा व्हॅन पिवळ्या रंगाची असण्यामागचं ‘लॉजिक’ ठाऊक आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अगदी पूर्वीच्या काळात शाळा म्हणजे एक अजबच गोष्ट असायची, आजच्यासारखे समजूतदार शिक्षक आणि पालक जर तेंव्हा असते तर कठीणच होतं असं आपण आपल्या आई वडिलांच्या तोंडून बऱ्याचदा ऐकलं असेल!

पूर्वीच्या काळी शाळेत एकच नियम असायचा “छडी लागे छम छम विद्या येई घम घम”! आणि सध्याच्या शाळांमध्ये तर मुलांना ओरडायची सुद्धा चोरी आहे!

असो, तर त्यावेळेस शाळेत जाताना सुद्धा चालत जावे लागे, अगदीच आई वडीलांची ऐपत चांगली असेल तर मोटर सायकल किंवा सायकलने सोडत असे!

आजसुद्धा अनेक खेडेगावात शाळा कॉलेज नसल्याने कित्येक विद्यार्थी पायपीट करत कोसो अंतर दूर शिक्षण घ्यायला जातात!

 

school going inmarathi
Avax news

 

हे आजच्या सारख स्कूल बस आणि रीक्षा चे चोचले त्या वेळेस नव्हते!

सध्या शाळा कोणतीही असो स्कूल बस आहे की नाही हे मात्र पालक अवश्य बघतात! आज आपण या स्कूल बसबद्दलच काही जाणून घेणार आहोत!

सध्या मुलाने चांगल्या शाळेत शिकाव्या या अपेक्षेने त्यांची घरापासून दूरच्या शाळेत रवानगी केली जाते,

पण बहुतेक वेळा ‘चांगल्या’ शाळा या घरापासून लांबच का असतात हे मात्र अजूनही न उलगडलेलं कोडच आहे.

असो, तर शाळेपर्यंत जाण्यासाठी मुलांकरिता स्कूलबस सुरु केली जाते. आणि ही स्कूल बस साधारणत: शाळेचीच असते.

 

school-bus-marathipizza01
indianexpress.com

 

तर या स्कूलबसबद्दल एक शंका तुमच्या मनात आली आहे का? कोणतीही स्कूलबस पहा ती पिवळ्या रंगाचीच असते. असे का? चला तर आज यामागचे उत्तर जाणून घेऊया!

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे की, शाळेच्या बसला पिवळा रंग देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.

हे बंधन केवळ बस आकर्षक दिसावी यासाठी घालण्यात आले नसून त्यामागे एक महत्त्वाचे कारण देखील आहे.

हा पिवळा रंग यासाठी निवडण्यात आला, कारण हा रंग लगेच लक्ष वेधून घेतो. पिवळ्या रंगाची Wavelength 400 – 700 NM एवढी असते!

त्यामुळेच पिवळ्या रंग दिवसाच्या सूर्यप्रकाशातही दूर अंतरावरूनही डोळ्यांना सहज दिसते.

 

school-bus-marathipizza02
3.bp.blogspot.com

 

स्टॉप लाइट्स आणि स्टॉप चिन्हे ही सामान्यतः लाल रंगांची असतात. त्यामुळे लोकांचा समज आहे की, लाल रंग हा लगेच लक्षात येणारा रंग आहे, पण तसे नाही आहे.

पिवळा रंग हा कोणत्याही रंगापेक्षा कधीही जलद गतीने डोळ्यात भरतो.

धुक्यामध्ये किंवा कमी लाईट्समध्ये देखील पिवळा रंग हा चालकांना लगेच दिसतो, त्यामुळे अश्या वातावरणामध्ये स्कूलबस बंद वगैरे पडली की, मागून येणाऱ्या गाड्या ती स्कूलबस सहज पाहू शकतात.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पिवळ्या रंगावर काळ्या रंगाचे अक्षर उठावदार दिसते. त्यामुळे पहाटेच्या वेळेस आपल्या मुलांना शाळेला सोडणाऱ्या पालकांना लांबूनच बस येत आहे हे समजते.

भारतातील सर्व शाळांना आपल्या शाळेच्या बसला बाहेरून सोन्यासारखा पिवळा रंग देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आणि रंगाची ही शेडींग ही IS 5 – 1994 नुसार देण्यात यावे असा देखील नियम लागू करण्यात आलेला आहे.

शाळेच्या बस वर असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या या शेडींगला ‘नॅशनल स्कूल बस क्रोम’ असे नाव देण्यात आले आहे.

 

school-bus-marathipizza03
storiesfeed.net

काय? मिळालं ना तुमच्या शंकेचं उत्तर??! अहो मग शेअर करा आणि इतरांनाही सांगा की!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?