तुम्हाला पिनकोडच्या मागचं लॉजिक माहिती आहे का?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर होय. १५ ऑगस्ट १९७२ पासून पिनकोड भारतामध्ये अस्तित्वात आले. हा तो काळ होता जेव्हा संवादाचे मुख्य माध्यम हे पत्रव्यवहार होते. हा पत्रव्यवहार अधिक सुलभ व्हावा म्हणून ही पिनकोडची संकल्पना अस्तित्वात आली. पत्रावर पिनकोड लिहिला असल्याकारणाने पत्र योग्य जागी पोचलं जातं, ही गोष्ट तुम्हाला देखील माहिती आहे.

परंतु तुम्हाला या पिनकोड मागचं लॉजिक माहिती आहे का? हे पिनकोड कसे ठरवले गेले हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहित, तर आज जाणून घ्या.

 

pincode-logic-marathipizza01

स्रोत

पिनकोडचा पहिला क्रमांक विभाग कोणता आहे ते दर्शवतो


उत्तर- १ आणि २
पश्चिम- २ आणि ४
दक्षिण- ५ आणि ६
पूर्व- ७ आणि ८
आर्मी- ९

 

एकूण ९ पिन क्षेत्रे आहेत ज्यापैकी ८ क्रमांक भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी वापरली जातात तर ९ हा क्रमांक सैन्यासाठी स्वतंत्ररित्या वापरला जातो.

 

pincode-logic-marathipizza02

स्रोत

पिनकोडचा दुसरा क्रमांक राज्याचा उपविभाग किंवा पोस्टल क्षेत्र दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले दोन क्रमांक खालील क्षेत्रे दर्शवतात.

 

pincode-logic-marathipizza03

स्रोत

पिनकोडचा तिसरा क्रमांक जिल्हा कोणता आहे ते दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले तीन क्रमांक जिल्हा दर्शवतात.

पिनकोडचे शेवटचे तीन क्रमांक त्या जिल्हातील विभाग किंवा पोस्ट ऑफिसचे स्थान दर्शवतात जेथे पत्र पोचवायचे आहे.

इथे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  मालवणचे उदाहरण घेऊया.

मालवणचा पिनकोड आहे – ४१६६०६

यामधील ४ हा क्रमांक पश्चिम विभाग दर्शवतो. पहिले दोन क्रमांक म्हणजे ४१ हा क्रमांक हे क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे असे दर्शवते. पहिले तीन क्रमांक म्हणजे ४१६ हा क्रमांक हे क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे असे दर्शवतो. आणि उरलेले शेवटचे तीन क्रमांक अर्थात ६०६ हा क्रमांक मालवण पोस्ट ऑफिसमध्ये पत्र पोचवायचे आहे असे दर्शवतो.

 

pincode-logic-marathipizza04

स्रोत

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *