TV वर दिसणारा हा क्रमांक अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तुम्ही देखील लक्ष दिलं असेल की आपण टीव्ही बघताना अचानक एक नंबर मध्येच आपल्याला दिसायला लागतो. टीव्हीशी किंवा केबल वाल्याशी निगडीत काहीतरी असेल म्हणून बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करतात, पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हा नंबर अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो. चला जाणून घेऊया या मागे काय लॉजिक दडलंय!

InMarathi Android App

हे नंबर random पद्धतीने आपल्याला दिसत असतात. म्हणजे प्रत्येक वेळेस हा नंबर तुम्हाला वेगळा दिसेल. या नंबर्सना क्षेत्र आणि DTH च्या आधारानुसार चॅनेलवर Algorithm केलं जातं. त्यामुळेच टीव्ही वर कोणत्याही कार्यक्रमावेळी हा नंबर दिसून येतो. या नंबरला डिजिटल वॉटरमार्क म्हणतात.

digital-watermark-marathipizza

स्रोत

तुम्हाला ही गोष्ट तर माहित असेलंच की DTH कंपन्या आपल्या ग्राहकांना चालू कार्यक्रम रेकोर्डिंग करण्याची सेवा देतात. पण जेव्हा एखादी व्यक्ती DTH रेकोर्डिंगच्या माध्यमातून किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम रेकॉर्ड करतो तेव्हा हा नंबर देखील त्यात रेकॉर्ड केला जातो. ज्यावरून त्या व्यक्तीचा माग घेणं सोप्प होतं. या नंबरवरून हे कळतं की व्हिडियो कोठून रेकॉर्ड झाला आहे आणि कोणत्या DTH च्या माध्यमातून रेकॉर्ड झाला आहे.

म्हणजेच समजा एखादा व्यक्ती कार्यक्रमाचे चित्रीकरण करून पैसे मिळवण्याच्या उद्देशाने अनधिकृतपणे ते विकत असेल किंवा तसा त्याचा वापर करत असेल तर ती पायरसी मानली जाते आणि या क्रमांकामुळे पायरेटेड कंटेन्ट बनवणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचणे सोप्पे होऊन जाते.

digital-watermark-marathipizza01

स्रोत

तसेच एखाद्या केबल टीव्ही ऑपरेटरने अनधिकृतपणे दुसरा एखादा चॅनेल (जो चालवण्याची त्याला परवानगी नाही) आपल्या नेटवर्क वर चालवला तर त्याची देखील माहिती या क्रमांकाद्वारा मिळवता येते.

जर तुम्ही अश्याच एखाद्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करून ते सोशल मिडीयावर अपलोड केले आणि त्यात हा नंबर रेकॉर्ड झाला तरी तुमचाही माग हा नंबर काढू शकतो.

म्हणजेच पायरेसीला आळा घालण्यासाठी डिजिटल वॉटरमार्कचा वापर केला जातो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *