' एक असा दगड जो तुटला की त्यातून रक्त वाहतं..! – InMarathi

एक असा दगड जो तुटला की त्यातून रक्त वाहतं..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

समुद्र हा रहस्यांचा खजिना आहे. आजवर या समुद्रातील कित्येक रहस्य उलगडण्यात आले आहेत तर कित्येक रहस्य हे अजूनही मानवासाठी रहस्यच आहेत.

अश्याच आणखी एका समुद्री रहस्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

चिली आणि पेरू येथील समुद्र तळात एक असा विचित्र दगड आढळतो जो खाली पडल्यावर तुटतो तर खरा, पण त्यासोबतच त्यातून रक्त वहायला लागत.

आजपर्यंत आपण केवळ प्राण्यांच्या शरीरातूनच रक्त निघताना बघितले असेल पण एका दगडातून रक्त बाहेर पडणे हे खरंच आश्चर्यकारक आहे.

आपल्याला लहानपणी पासून हेच सांगण्यात आलं आहे की दगड हे निर्जीव असतात. मग काय हा दगड सजीव आहे, की निर्जीव वस्तूंमधून देखील रक्त येतं… असे प्रश्न पडणे साहजिकच आहे.

चला तर मग जाणून घेऊया या अद्भुत दगडाबद्दल…

 

Pyura Chilensis-marathipizza
realmonstrosities.com

चिली आणि पेरू येथील समुद्री तटांवर तसेच समुद्रात हे दगड मोठ्या प्रमाणात आढळतात. या दगडांना बघून कोणीही हे सांगू शकतं की हे कुठल्या प्रकारचे दगड नसून समुद्री जीव आहे.

कारण ते दिसायला एखाद्या समुद्री जीवासारखेचं दिसतात. याला Pyura Chilensis या नावाने ओळखलं जाते.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हा दगड श्वासही घेतो आणि अन्नही ग्रहण करतो. एवढचं काय तर तो प्रजनन देखील करतो.

 

Pyura Chilensis03-marathipizza
mdavidford

Pyura Chilensis मध्ये Clear Blood आणि Vanadium याची मात्रा खूप जास्त प्रमाणत असते. Vanadium एक दुर्लभ आणि रहस्यमयी तत्व आहे. या दगडासारख्या दिसणाऱ्या जीवात आढळणारे Vanadium, इतर समुद्री जीवांच्या तुलनेत एक कोटीपेक्षाही जास्त असते.

पण हा जीव कशाप्रकारे एवढ्या प्रमाणात Vanadium गोळा करतो आणि त्यासाठी त्याच्या शरीराचा कुठला अवयव त्याला मदत करतो याचा शोध अद्यापही लागलेला नाही.

 

Pyura Chilensis04-marathipizza
tumblr.com

Pyura Chilensis हे एका दगडाच्या रुपात असल्याने ते प्रजनन क्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या आपल्या जोडीदाराच्या शोधात कुठे जाऊ शकत नाही. म्हणून ते Hermaphroditic म्हणजेच उभयलिंगी असतात.

जेव्हा हे जन्म घेतात तेव्हा ते नर असतात आणि हळूहळू त्यांच्यात मादाचे अवयव देखील विकसित होतात. याप्रकारे ते प्रजनना करीता आवश्यक असणारे स्पर्म्स आणि एग्स दोन्हीही सोबत प्रोड्यूस आणि रिलीज करतात.

ज्यामुळे प्रजनन क्रिया पूर्ण होऊन एका नवीन जीवाची निर्मिती होते. वास्तविक पाहता यांचे सूक्ष्मजीव खडकांवर चिटकून असतात जे हळूहळू वाढतात.

 

Pyura Chilensis02-marathipizza
Stéphane Batigne

या समुद्री जीवाच्या मांसाला लोकं अतिशय आवडीने खातात. हा एक अद्भुत जीव असल्याने त्याचं मांस खूप महाग असतं.

हा जीव बाहेरून दगडाप्रमाणे कठोर तर आतून अगदीच मऊ असतो. याचं मांस काढण्याकरिता धारधार चाकुची गरज असते. लोकांना याचं मांस कच्च खायला जास्त आवडतं.

आजकाल या Pyura Chilensis च्या मांसाची खूप डिमांड आहे. म्हणूनच लोकं या दगडासारख्या दिसणाऱ्या समुद्री जीवाचा समुद्रात खोलवर शोध घेत आहेत.

समुद्रात दडलेल्या अनेक रहस्यांपैकीच एक आहे हा रहस्यमयी Pyura Chilensis…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?