धर्म सुधारण्याचा आग्रह धरणाऱ्याला जिवंत जाळण्याचा हा इतिहास अंगावर काटा आणतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतात अनेक प्रकारची धर्मसुधारक आणि धर्मावर टीका करणारी मंडळी होऊन गेली. त्यांना त्यांच्या या मताबद्दल कशा प्रकारची वागणूक देण्यात आली हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

पण आपल्याला नेहमीच उत्सुकता असते की जगामध्ये अशाप्रकारे धर्मसुधारणा साठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना कशी वागणूक देते आज आपण अशाच एका धर्मसुधारका बद्दल..

जागतीक इतिहासामध्ये २१ मार्च हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. कारण २१ मार्च १५५६ रोजी थॉमस क्रेमर यांना स्पोर्ट मध्ये जिवंत जाळण्यात आलं होतं.

कारण थाँमस क्रेमर यांना बॅक आरटीओ येथील धर्मसंस्थेने त्यांच्यावर ती खटला चालविला होता आणि त्यांना गुन्हेगार सिद्ध केल्यानंतर धर्मसंस्थेने त्यांना भयानक शिक्षा दिली होती.

त्यांच्यासोबतच्या आणखी तिघांना १२ सप्टेंबर १५५५ रोजी देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

 

thamous cremar inmarathi
www.inmarathi.com

त्यांना जिवंत जाळण्यात आले त्यानंतरही अशा प्रकारच्या शिक्षांचे सत्र थांबले नाहीत आणि १६ ऑक्टोबर १५५५ रोजी ही अशाच प्रकारच्या शिक्षांना पूर्णत्वास नेण्यात आले होते.

क्रेमर हे एक धर्म सुधारक म्हणून प्रसिद्ध होते पण त्यांच्यावर ती गुन्हा दाखल केल्यानंतर धर्मनिरपेक्ष शक्तींनी त्यांच्या वरती बंदी आणली त्यांचे कडील कार्यालय जप्त करण्यात आले.

क्रेमर यांनी स्वतःला वाचवण्यासाठी ४ विनंती अर्ज रोम येथे पाठवले होते. यातील पहिला विनंती अर्ज त्यांनी जानेवारी १५५६ रोजी रोम येथे रवाना केला होता.

त्यांनी सुनावणीच्या काळामध्ये स्वतःला चर्च कडे स्वाधिन करुन टाकले होते. त्यांनी त्यांना सर्व अटी मानण्यास संमती दिली होती.

खरं बघता एडमंड पोनर जे इंग्लंडचे बिशप म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी अशा प्रकारच्या सुनावणीस पूर्णपणे नकार दर्शविला होता. त्यांचा हा निर्णय चर्च विरुद्ध समजून त्यांच्याकडील संत पद रोमच्या चर्चने काढून घेतले आणि त्यांनाही या गुन्ह्याचा भाग ठरवत त्यांनाही अशाच प्रकारची शिक्षा ७ मार्च रोजी ठोठावण्यात आली.

 

त्यानंतर वाचण्याचा प्रयत्न करत असलेल्या क्रेमर यांनी परत एक विनंती अर्ज लिहिला ज्यामध्ये असं सांगितलं होतं की ते कॅथलिक धर्माला ते पूर्णपणे मानतात आणि, त्यामध्ये सुधारणा करण्याचा त्यांचा कुठलाही मानस नाही.

त्यामुळे त्यांना आता या आरोपांमधून मुक्त करण्यात यावे आणि.

या अर्जाचा क्रेमर यांना उपयोग असा झाला की त्यांना देण्यात येणारी शिक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आली. शेवटी २१ मार्च रोजी त्यांना शिक्षा देण्याचे ठरविण्यात आले.

त्यांनी असं काहीही केलं नव्हतं त्यामुळे त्यांना अशा भयानक प्रकारची शिक्षा देण्यात येईल.

ज्या दिवशी थॉमस क्रमांक यांना शिक्षा देण्यात येणार होती त्यादिवशी असे सांगण्यात आले की,  “तुम्ही लोकांसाठी ऑक्सफर्ड येथील युनिव्हर्सिटी चर्चमध्ये भाषण कराल.”

त्यांनी ही गोष्ट मान्य केली. ते भाषण देण्यासाठी उभे राहिले. त्यांनी चर्चला अपेक्षित असणारी प्रार्थना सर्वांसाठी केली. त्यांनी राजाला मानवंदना दिली त्यानंतर आपल्याला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेला शेवटचा प्रतिकार म्हणून त्यांनी त्यांचे भाषण देण्यास सुरुवात केली.

या भाषणामध्ये त्यांनी असे म्हटले की,

“आता मी एक असा आदर्श झालो आहे, बाहेर बसून सत्य लिहिल्यामुळे मला अशा प्रकारची शिक्षा मिळत आहे. मी कधीच मी लिहिलेल्या गोष्टींना नकार दिलेला नाही, कारण मी जे लिहिलं ते सत्य होते.

मला ते सत्य हृदयामधून जाणवले होते. मी जर कुठे असं लिहिले असेल मग ते काही असो, मला अटक होण्यापूर्वीच असो किंवा मी अटक झाल्यानंतर स्वतःच्या बचावासाठी समोर आलेल्या प्रत्येक कागदपत्रावर केलेल्या सह्या असोत.. जर मी खोटा असेल तर लिहिल्याबद्दल प्रथमतः माझ्या हाताला शिक्षा देणे गरजेचे आहे.

त्यामुळे जेव्हा मला आगीच्या स्वाधीन करण्यात येईल त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने सांभाळा की माझे हात पहिल्यांदा जळतील आणि त्यांना शिक्षा मिळेल.”

आणि त्यानंतर क्रेमर गुडघ्यावर बसले त्यांनी देवाकडे शेवटची प्रार्थना केली आणि त्यानंतर ग्रामर त्यांना सांगण्यात आले की तुम्ही आता तुमच्या शिक्षेसाठी तयार व्हा. काहीजणांनी त्यांना असा सल्ला दिला की आता शेवटच्या क्षणी तरी देवाची माफी मागा आणि जे काही सत्य असेल ते सांगून टाका. पण क्रेमर मात्र अजूनही स्थिर होता आणि तो त्याने केलेल्या प्रत्येक विधानावरती ठाम होता.

 

Cranmer-hand inmarathi
archbishopcranmer

त्यानंतर एका साखळीच्या सह्ह्याने त्याला लाकडी खांबाला बांधण्यात आले. त्या लाकडी खांबा वरती इंधन टाकण्यात आले आणि त्या लाकडी खांबाला पेटवले गेले.

त्यानंतर क्रेमर यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी काही धर्मगुरूं मार्फत ईश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.

क्रेमर यांच्या शरीराला नुकसान व्हायला सुरवात होण्याच्या आधी क्रेमर यांच्या मुखातून उदगार निघाले,

“माझ्या उजव्या हाताची काही चूक नाही.” आणि त्यांच्या शरीरामध्ये असह्य अशा वेदना होऊ लागल्या होत्या आणि या वेदनांमधून आवाज येत होता की,

“हे ईश्वरा माझ्या आत्मा ला सद्गती प्राप्त होऊ दे.”

आणि त्याची ही प्रार्थना तोपर्यंत चालू होती जोपर्यंत त्या आगीच्या ज्वाळा त्याच्या शरीराला पूर्णपणे स्थिर करत नाहीत. काही वेळाने त्यांनी इहलोकीचा प्रवास सुरू केला. त्यांच्या शरीराने त्याची साथ सोडून दिली होती.

 

Cranmer-hand inmarathi
Cranmer-hand inmarathi

 

२१ मार्च १५५६ रोजी क्रेमर मृत्यू पावले. थॉमस क्रेमर यांना देण्यात आलेले शिक्षा ही कायद्याला अनुसरून अजिबात नव्हती. थॉमस क्रेमर यांनी तेच केलं जे त्यांच्या बुद्धीला पटलं.

त्यांनी धर्मव्यवस्थेच्या सुधारण्यासाठी एक चळवळ चालू केली होती.

त्यांनी धर्मव्यवस्थेने त्यांना दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली होती. मग प्रश्न असा पडतो की धर्मव्यवस्थेने अशा प्रकारची शिक्षा एवढ्या चांगल्या माणसाला का द्यावी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?