एका स्त्री साठी या साध्या गोष्टी असतात खूप रोमँटिक! बायकोला खुश करण्यासाठी एकदा वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

आपल्याकडे रोमॅण्टिकपणाच्या कल्पना बहुतेकदा हिंदी सिनेमातून येतात. त्यामध्ये हीरो कसा अशक्यप्राय गोष्टी करत असतो आणि मग हिरोईन त्याच्यावर भाळते आणि त्यांची प्रेमकहाणी सुरू होते.

अहो, पण सिनेमा दीड-दोन तासांचा असतो आणि त्यानंतर संपतो. पण आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्य काढायचं असतं. मग आपणही तशाच अशक्यप्राय गोष्टी कराव्यात का? तर नाही आणि ते शक्यही नाही.

ते नातं फुलवण्यासाठी, विश्वास निर्माण करण्यासाठी खूप काही मोठ्या गोष्टी करायची गरज नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला समोरच्या व्यक्तीला खुश करता येतं.

समजा, एखादी मुलगी आवडून तिच्याबरोबर तुमची प्रेमकहाणी सुरू झालीये किंवा जर तुमच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत, तर अशा वेळेस तिला खूश करण्यासाठी काय करता येईल की जेणेकरून तुमच्या नात्यातला गोडवा दिवसेंदिवस वाढत राहील?

 

pula inmarathi
pinterest

 

एखाद्या व्यक्तीची सवय झाली की मग आपण तिला गृहीत धरायला लागतो आणि रोजचं आपलं जगणं सुरू राहतं त्यात कोणतंही नाविन्य नसतं आणि मग आयुष्य कंटाळवाणं वाटायला लागतं. आपलं एकमेकांवर प्रेम आहे कमी झालंय अस वाटायला लागतं.

पण हुशार तोच असतो जो प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ ची वाट पाहत नाही. काही छोट्या छोट्या गोष्टी तिच्यासाठी म्हणून केल्या तर समोरची व्यक्ती पण आपल्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल.

जाणून घेऊयात, अशाच काही गोष्टी…..

 

couple holding hands inmarathi

 

जेव्हा तुमच्या नात्याची सुरुवात होते त्यावेळेस ते नाते तुम्ही सगळ्यांना सांगावं अशी तिची इच्छा असते. म्हणजे अगदी रस्त्यातून चालतानाही जर तुम्ही तिचा हात हातात घेतलात तरीसुद्धा ही गोष्ट तिच्यासाठी खूप मोठी असते.

म्हणजे रस्त्यावरच्या अनोख्या गर्दीत एक तरी विश्वासू हात आपल्या हातात आहे याचा तिला खूप अभिमान वाटतो.

लग्नाच्या आधी बायकोचा वाढदिवस कायम लक्षात ठेवणारे लोक लग्नानंतर मात्र ते विसरून जातात, बऱ्याच जणांच्या बाबतीत हे घडतं. तर ही चूक मात्र कधीच करायची नाही. (नाहीतर वर्षभर टोमणे ऐकावे लागतील. आजकाल मोबाईल मध्ये वाढदिवसासाठी अलार्म सेट करता येतो.)

तिचा वाढदिवस लक्षात ठेवून तिला काहीतरी सरप्राईज गिफ्ट देणं हे तिला पण आनंद देणार असतं.

आणि जर तुम्ही तिच्या वाढदिवसासोबतच जर तिच्या मित्र-मैत्रिणींचा विशेषतः खास फ्रेंडचा वाढदिवस वगैरे लक्षात ठेवलात आणि तो आपण साजरा करूया तसं म्हटलं तर तिला जास्त आनंद होईल.

 

priyanka birthday inmarathi

 

महिन्यातून एकदा तरी तिला बाहेर फिरायला घेऊन जाणं जितकं महत्त्वाचा आहे तितकंच सहा महिन्यातून एकदा तरी तिच्या आवडीच्या लोकांसोबत, म्हणजे तिच्या माहेरची माणसं किंवा तिच्या मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत एखादं आऊटींग केलंत तर तुमचं नातं दृढ व्हायला मदत होईल.

दिवसभर तुम्ही कितीही बिझी असलात तरी दिवसा तिच्याशी एकदा तरी फोनवरून बोलणे किंवा मेसेज करणे यातून तुम्ही तिची किती काळजी घेताय हे दिसून येतं.

 

using Mobile while eating InMarathi

 

घरात पाहुणे आले असतील आणि जर तिला खूप काम पडत असेल, तर बऱ्याचदा स्त्रिया स्वतःच्या जेवणाकडे दुर्लक्ष करतात. त्यावेळेस तुम्ही एखादा फोन केलात आणि तिला जेवण केलंस का? असं विचारलं तर तुमच्या या बोलण्याने तिला खूप आधार वाटेल.

एखाद्या रविवारी किंवा ऑफिसमधून जर लवकर घरी आलात तर तिच्यासाठी म्हणून किंवा घरच्यांसाठी म्हणून तुम्ही स्वयंपाक घरात एखादी डिश बनवली तर त्यासारखा दुसरा आनंद नसेल.

 

husband-cooking-for-wife InMarathi

 

हॉटेलमध्ये गेला असाल तर तिला तिच्या आवडीची एखादी डिश निवडू द्या. तिला तिच्या आवडीचं आईस्क्रीम खायला द्या.

उगीचच,”हे तू संपवणार आहेस का?”, ” तुला हे जाईल का?” असले प्रश्न विचारू नका.. नाहीतर ती रागात येऊन २ आईस्क्रीम मागवेल.

तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज अधून मधून देत जा त्याने ती आनंदी तर होईलच, आणि तुम्ही तिची किती काळजी घेता या जाणिवेने ती सुखावेल.

 

things-happy-couples-talk-InMarathi

 

तिला आवडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही करत राहीलात, तर तुमचं नातं मजबूत होण्यासाठी उपयोगी पडेल. उदाहरणार्थ, तिचा एखादा आवडीचा टीव्ही शो जर चालू होणार असेल तर त्याची आठवण करून देणे किंवा तिच्या आवडत्या हिरो हिरोइनचा सिनेमा आला तर त्या मुव्हीला घेऊन जाणे.

आपल्या समाजात एकूणच पुरुषाला आपल्या भावना नीट व्यक्त करता येत नाहीत किंवा त्या भावना दाबून ठेवायची सवय लागलेली असते. तशी शिकवण मिळालेली असते म्हणा.

पुरुष पटकन व्यक्त होत नाहीत, पण जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रत्येक गोष्ट शेअर केलीत, तर तिचा तुमच्यावर पूर्ण विश्वास बसतो.

तुमचे यश -अपयश, तुमच्या आयुष्यातल्या अडचणी जर तुम्ही तिच्या सोबत शेअर केल्यात तर आपणही कोणाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहोत म्हणून ती तुम्हाला आधार देण्यासाठी खंबीरपणे उभी राहील.

 

swapnil mukta inmarathi 1

 

कोणतीही गोष्ट करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू नका. त्यामुळे तिचा तुमच्यावरचा विश्वास कमी होईल. एखाद्यावेळेस स्वयंपाकात तिखट,मिठाचं प्रमाण चुकलं तर तिला त्यावरून टोचून बोलू नका.

तिच्या भूतकाळाबद्दल जास्त विचारू नका किंवा तुम्हाला माहित असेल तर त्यावरून तिच्याशी चर्चा करू नका किंवा त्यावरून सतत टोमणे मारु नका. उलट तिच्या भूतकाळात जर काही वाईट घडले असेल तर, आता मात्र मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास तिला द्या.

तिच्या सुख दुःखाच्या प्रसंगात प्रामाणिकपणे तिच्यासोबत रहा. ही गोष्ट तिला नक्कीच आवडेल.

 

virat anushka inmarathi 1
iwmbuzz

 

एखाद्या संध्याकाळी जर तिला बाहेर पाणीपुरी खायला तुम्ही घेऊन गेलात आणि तुमच्या प्लेटमधली शेवटची पाणीपुरी जर तिच्यासाठी ठेवली आणि तिला सांगितलं की, ही फक्त तुझ्यासाठी आहे, तर ते तिला नक्कीच आवडेल.

 

panipuri-inmarathi03
thebetterindia.com

 

कधीकधी स्त्रियांना एकटं रहावसं वाटतं, कोणाचीही लुडबुड नको वाटते त्यावेळेस तिचा तिचा वेळ तिला द्या. ज्यामध्ये ती वाचन करणे, संगीत ऐकणे, बागकाम करणे इत्यादी तिच्या आवडीच्या छंदांना वेळ देऊ शकेल.

पुरुषांना सगळ्यात जास्त कंटाळा येतो ते बायकांच्या खरेदीचा. त्यावरून अनेक जोक्स निर्माण झालेले आपण पाहतो.

पण एखाद्या शनिवारी किंवा रविवारी तिच्याबरोबर मॉलमध्ये जाऊन तिच्यासाठी तिच्या आवडीचा ड्रेस घेणे खरंतर तुम्हा दोघांसाठी आनंददायक होऊ शकेल.

 

 

फक्त शारीरिक संबंधापुरतं तिच्याशी गोड न बोलता तिला संपूर्ण आयुष्यभर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आधार, सन्मान दिलात तर तुमचं सहजीवन नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?