न्यूड सिन करण्यासाठी अशी विचित्र अट ठेवली की सेट वरचे सगळे गांगरले…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपण बरेचदा म्हणजे हल्ली तर जवळ जवळ प्रत्येकच चित्रपटात इंतीमेत सिन्स किसिंग सिन्स बघतो त्यात फारसं काही नाविण्य उरलेलं नाही, अलीकडे तर मालिका सुद्धा ह्यात मागे नाहीत सेक्रेड गेम्स आणि मिर्जापूर ही त्यातली काही ताजी उदाहरणं आपल्या समोर आहेत.

हे सीन बघायला जेवढे सहज दिसतात तेवढे पर्फोर्म करायला कठीण असतात.

शोबिझ मध्ये काही गोष्टी अगदीच गृहीत धरल्या जातात, जसे की जसे दिग्दर्शक सांगेल तसेच व्हायला हवे डीरेक्टर्स एक्टर असणे हे भूषण समजले जाते परंतु ह्यात फक्त कथेची गरज लक्षात घेतली जाते कलाकाराचा कम्फर्ट लक्षात घेतला जात नाही.

कलाकाराला त्यानुसार तडजोड करावी लागते. विपरीत मानसिक स्थितीत उत्तम अभिनय करावा लागतो.

 

nude-inmarathi
catlandbooks.com

सामान्य दृश्य चित्रित करताना एकवेळ हे सहज जमून जातं. परंतु जेव्हा वेळ येते नग्न दृश्य चित्रित करायची, तेव्हा मात्र सगळंच काहीसं अवघड होऊन बसतं.

साधारणपणे चित्रपट किंवा मालिकांमध्ये असे सिन्स चित्रित होत असताना सेट वर फारशी मंडळी नसतात, मोजक्याच अत्यावश्यक क्र्यू मेम्बर्स च्या उपस्थितीत हे शुटींग केले जाते आणि पुढचे सोपस्कार पार पडले जातात म्हणजे एडिटिंग वगैरे.

अशा दृश्यांमध्ये बहुतेकदा अभिनेते आणि अभिनेत्री ह्यांचा सहज वावर अपेक्षित असतो जो दृश्य जिवंत वाटण्यासाठी आवश्यक ठरतो. जेणेकरून हे प्रेक्षकांन अपील होईल, त्यामुळे कलाकारांकडून असणाऱ्या अपेक्षा अर्थातच वाढतात.

अशावेळी त्यांना आपला कम्फर्ट झोन सांभाळून उत्कृष्ट अभिनय करणे गरजेचे होऊन बसते.

पण अशा सिन्स मध्ये प्रत्येकवेळी कलाकार गृहीत धरला जाऊ शकत नाही, कधी कधी दिग्दर्शकालाही आपला कम्फर्ट झोन सोडून काम करावे लागू शकते.

 

abstract-inmarathi
indobus.com

ह्या विधानाला दुजोरा देणारा एक प्रसंग नुकताच घडला, नग्न दृश्य देण्यासाठी ह्या नायिकेने चक्क एक विचित्र अट घातली. काय होती ती अट ? नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया.

आपल्या एका चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान ह्या अभिनेत्रीने एक नग्न दृश्य चित्रित करणे अपेक्षित होते परंतु तीला काही कारणास्तव हे करण्यास सहज वाटत नव्हते आणि म्हणून, चित्रिकरणा आधी तिने तिथे उपस्थीत असलेल्या सर्व क्र्यू मेम्बर्सन एक विचित्र अट घातली.

ती म्हणजे हे दृश्य चित्रित करताना तिच्यासह सर्व मेंबर्सनी आपले कपडे उतरवून ठेवावेत तरच ती हे दृश्य करेल.

हि घटना घडली ते साल होते २०१२, चित्रपटाचे नाव होते, “ द कॅनियन्स” आणि ही विचित्र अट घालणारी अभिनेत्री होती लिंडसे लोहान. कथेनुसार तिला त्यात topless दृश्य द्यायचे होते आणि ती तिथल्या दहा जणासमोर हे करण्यास तयार नव्हती.

जेव्हा क्र्यू मेम्बर्सनी तिची अट ऐकली तेव्हा ते क्षणभर चपापले. आणि त्यांनी तिच्या ह्या मागणीला नकार दिला.

 

Love Fashion Art
vjohn.com

परंतु चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल श्राडर ह्यांना कोणत्याही परिस्थितीत हे दृश्य चित्रित करायचे असल्याने त्यांनी आणि सोबतच इतर लोकांनीही तिची ही अट मान्य केली आणि त्यानुसार आपले कपडे उतरवून हे दृश्य शूट केले आणि पुढे सर्व विना अडथळा पार पाडले.

त्यावेळी एक वाया गेलेली अभिनेत्री अशी तिची ओळख होती आणि ह्या घटनेने तर ती आणखीनच चर्चेत आली होती. सगळीकडे फक्त एकच प्रश्न विचारला जात होता की, तिची हिम्मत कशी झाली अशी मागणी करण्याची ?

कारण सगळ्यांनी ह्यापूर्वी तिला Internet वर किंवा magazine मध्ये नग्न अवस्थेत पाहिलेले होतेच. त्यामुळे असे नेमके काय झाले की तिने ही अट घातली असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

त्यावरून तिच्यावर बरीच टीका झाली आणि ह्या विषयावर उलट सुलट कमेंट्स सुद्धा झाल्या, आणि तिच्या सोबत चित्रिकरणा दरम्यान काय करावे अशी बरीचशी उपरोधिक खिल्ली उडवली गेली.

जसे की,

·         शुटींग दरम्यान तिने  कपडे काढल्यापासून परत घालेपर्यंत सेट वरच्या कोणीही साधा श्वासही घेऊ नये.

·         ती जसे दृश्य देते आहे तसेच तिथे उपस्थितीत इतरांनीही द्यावे

·         तिच्या त्या दृश्यांसाठी इतर सदस्यांनीही कण्हल्याचे आवाज काढावे जेणेकरून तिला बरे वाटेल.

 

lohan-inmarathi
imdb.com

·         सेटवर एक लिंडसे चे कौतुक करणारी वही फिरवण्यात यावी ज्यात प्रत्येकाने लीन्डसे बद्दल चांगलेच लिहावे, ती किती छान काम करते म्हणून. जरी ते लक्षात राहण्यासारख नसेल तरी.

·         लिंडसे ला अप्रीशियेट करण्यासाठी सेट वर प्रत्येकाने तिच्यासाठी घरी तयार केलेली लहानशी भेटवस्तु घेऊन यावी.

·         एक ओबमांना वगळून प्रत्येकाने वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षाचा मुखवटा घालून सेटवर यावे

·         सेट वरच्या प्रत्येक मेम्बर च्या दोषांवर बोट ठेवून तिने त्याच्यावर मनसोक्त हसावे.

·         टेक दरम्यान मेम्बर्सनी लिंडसे चे आवडते मिस्फिट गाणे संथ आवाजात गात राहावे इ.

अशा एक ना अनेक प्रकारे तिला ट्रोल केलं गेलं होतं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?