हिम्मतवाला ते इंग्लिश विंग्लिश : ‘हवा हवाई’ चा असामान्य प्रवास
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
उत्कृष्ट अभिनय आणि नृत्याने लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी श्रीदेवी आज आपल्यात नाही. यूएईमध्ये त्यांच निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी श्रीदेवीने घेतलेल्या अकाली एक्झिटने बॉलिवूडसह तिचे तमाम चाहते हळहळले आहेत.
संयुक्त अरब अमिरातीतील रास अल खैमामध्ये श्रीदेवी सहकुटुंब गेल्या होत्या. पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी कपूर कुटुंब तिथे गेले होते.
शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी त्यांच्यासोबत दुबईत होते, तर मोठी मुलगी जान्हवी मुंबईत होती.
श्रीदेवी एक अशी अभिनेत्री होती जिने चित्रपटसृष्टीत ४ वर्षांपासून ते वयाच्या ५४ व्या वर्षापर्यंत काम केलं. तशी ती अजूनही तरुणच दिसायची. कोणीही हे सांगू शकत नव्हते की ती ५४ वर्षांची आहे. तिला पडद्यावर बघत अनेक तरुणांनी तिच्यात आपली प्रेयसी बघितली, तर अनेक तरुणींनी तिची प्रेरणा घेत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

तिने नेहेमीच तिच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेगळीच छाप सोडली. कदाचित म्हणूनच तिला सिनेसृष्टीतील पहिली फिमेल सुपरस्टार म्हटल्या जाते.
आज ती आपल्यात नाही ह्यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नाहीये. संपूर्ण बॉलीवूड ह्याने हादरले आहे. पण ती गेली… आता ती कधीच आपल्याला दिसणार नाही. दिसतील तर केवळ तिने निभावेल्या भूमिका. तिने निभावलेल्या प्रत्येक भूमिकेतून आपल्याला एक वेगळी श्रीदेवी दिसली. आणि ह्यानंतर त्याचं भूमिकांतून ती आपल्यात नसूनही आपल्या मनात नेहेमी असणार आहे.
हिम्मतवाला (१९८३)

हा चित्रपट तिच्या जीवनातील टर्निंग पोईंट ठरला. ह्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची देखील सर्वत्र वाहवाह करण्यात आली. ह्या चित्रपटातील ‘नैनों में सपना, सपनों में सजना’ हे गाण त्या काळातील सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक होत. आणि आजही ते आपल्या ओठांवर असत.
सदमा (१९८३)

श्रीदेवी ह्यांच्या करिअरमधील गाजलेल्या काही चित्रपटापैकीच हा एक. ह्या चित्रपटात त्यांनी सर्वांना दाखवून दिले की अभिनय काय असतो. कदाचित म्हणूनच त्यांना बॉलीवूडची पहिली फिमेलसुपरस्टार म्हणतात. त्यांच्या ह्या चित्रपटाने त्यंच्या अॅक्टिंग करिअरमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली.
नगीना (१९८६)

ह्या चित्रपटात श्रीदेवी हिने एका नागिणीची भूमिका साकारली होती, जी देखील प्रेक्षकांच्या मनाला खूप भावली. त्यांचा हा चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला.
मिस्टर इंडिया (१९८७)
अनिल कपूर आणि श्रीदेवी ह्या दमदार जोडीने मिस्टर इंडिया हा चित्रपट एतिहासिक बनवला. ह्यातील ती गोंडस श्रीदेवी प्रेक्षकांच्या मनाला खूप भावली, तर ‘काटे नहीं कटते दिन ये रात’ ह्या गाण्यातील श्रीदेवीचा तो मंत्रमुग्ध करणाऱ्या परफॉर्मन्सने तर अनेकांना घायाळ केले. आजही ते गाण The Most Sensual Songs च्या लिस्ट मध्ये सर्वात वर असते.

ह्याच चित्रपटात आपल्याला श्रीदेवीचा आणखी एक अवतार बघायला मिळाला. तो म्हणजे हवा हवाई… “मै ख्वाबों की शेहजादी, मै हुं हर दिल पे छाई…” असं म्हणणाऱ्या श्रीदेवीचा तो खट्याळ अंदाज मनाला भावून जातो. असं वाटत की हे गाण फक्त आणि फक्त तिच्यासाठीच लिहल्या गेलं आहे. तिचे ते बोलके डोळे, अप्रतिम एक्सप्रेशंस आणि डान्स हा आजही आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडतो.
चांदनी (१९८९)

ती खरच ह्या चित्रपटसृष्टीची चांदणी होती. १९८९ साली यश चोपडा ह्यांच्या चांदनी चित्रपटात श्रीदेवी आणि ऋषी कपूर ह्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
चालबाज (१९८९)

ह्या चित्रपटात पहिल्यांदा श्रीदेवी डबल रोल मध्ये दिसून आली. ह्या चित्रपटातील गाना ‘ना जाने कहाँ से आई है’ हे गाणे देखील अतिशय प्रसिद्ध झाले होते. ह्या चित्रपटासाठी श्रीदेवीला बेस्ट अॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाल होता.
लम्हे (१९९१)

लम्हे हा देखील यश चोपडा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट. ह्या चित्रपटासाठी देखील श्रीदेवीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.
जुदाई (१९९७)

श्रीदेवी अनिल कपूर आणि उर्मिला मातोंडकर अशी स्टारकास्ट असलेला जुदाई हा चित्रपट एका मिडलक्लास कुटुंबाचे वास्तव आणि त्यांच्या इच्छा-अकांशांची कहाणी घेऊन आला. ह्यात श्रीदेवी हिने एका मिडलक्लास व्यक्तीच्या म्हण्जेच्या अनिल कपूरच्या पत्नीची भूमिका साकारली होती. जी तिच्या जीवनापासून संतुष्ट नव्हती, तिला श्रीमंत व्हायचे होते. ह्यात तिची भूमिका जरा नकारात्मक दर्शविण्यात आली असली तरी ती तिने चोख पार पाडली.
‘इंग्लिश विंग्लिश’ (२०१२)
तब्बल १५ वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर श्रीदेवीने ह्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले. ह्यात तिने एका अश्या गृहिणीची भूमिका साकारली आहे जिला इंग्रजी येत नाही म्हणून तिचा पती आणि मुलं तिची चेष्टा करतात.

आणि मग ती इंग्रजी शिकते. ह्यात आपल्या अत्यंत साध्या पण प्रभावी भूमिकेतून तिने परत प्रेक्षकांना तिचं पहिली फिमेल सुपरस्टार होती, आहे आणि नेहेमी राहिलं हे दाखवून दिले.
तिचा मॉम हा ३०० वा चित्रपट शेवटचा ठरला. ती आज आपल्यात नसली तरी तिने ज्या भूमिका साकारल्या त्यातून ती नेहेमीच वेगवेगळ्या अंदाजात आपल्याला भेटत राहील.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.