डॉक्टरकी न केलेले डॉक्टर: केशव बळीराम हेडगेवार

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सदर लेखावर प्रतिवाद करायचा असल्यास तो आमच्या फेसबुक पेजवर पाठवावा. अभ्यासपूर्ण आणि सभ्य शब्दात केलेल्या प्रतीवादास नक्कीच प्रसिद्धी देण्यात येईल.

आमच्या फेसबुक पेजची लिंक: facebook.com/InMarathi.page

===

वरचे शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असणार हे नक्की ! पण होय तुम्ही बरोबरच वाचलंय, ‘डॉक्टरकी न केलेला डॉक्टर.’

आज त्याच डॉक्टरांच्या बाबतीत थोडी माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न. खरंतर अनेक लोकांना या डॉक्टरचे नाव माहीत आहे, पण नावाखेरीज फारशी माहिती नाही. त्यासाठी हा लेखनप्रपंच.

 

dr-hedgewar-inmarathi
sanghmitra-vaishali.in

डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार यांचा जन्म १ एप्रिल १८८९ रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी काश्यप गोत्री असणाऱ्या हेडगेवार कुटुंबात नागपुरात झाला.

संघे शक्ति: इति ज्ञात्वा लोककल्याणकारक:| येन संघ कृतस्तस्मै केशवाय नमो नमः ||

अर्थात –

“संघटनेमध्ये सामर्थ्य असते, हे ओळखून लोकांचे कल्याण करणारा संघ ज्यांनी स्थापन केला, अशा त्या केशवांना पुनः पुनः नमस्कार असो.”

 

dr-hedgewar-inmarathi03
wikipedia.org

एखाद्या महान समाजकार्य करणाऱ्या किंवा क्रांतिकार्य करणाऱ्या व्यक्तीचे स्वभावगुण त्याच्या अंगी उपजतच असतात असं म्हणतात. केशवराव तरी याला अपवाद कसे असतील? शालेय वयात असतानाच काही घटना अशा झाल्या की, हा केशव काहीतरी महान कार्य करणार याची खात्री सर्वांनाच पटली.

सीताबर्डी किल्ल्यावर असणारा इंग्रजांचा युनियन जॅक माझ्या देशात का फडकतो म्हणून त्याला काढून फेकायचं या इच्छेने केशव व त्याच्या मित्रमंडळीनी चक्क शिक्षकांच्या घरातून किल्ल्यापर्यंत भुयार खोदायला सुरुवात केली, वेळीच हे शिक्षकांच्या लक्षात आलं, त्यांनी इतकंच सांगितलं की देशप्रेम समजू शकतो पण वेडेपणा करू नकोस, तू नक्की मोठ काम करणार आहेस.

दुसरी म्हणजे शाळेत कधीतरी इंग्रज अधिकारी परीक्षण करायला येणार होते. त्यांचे सर्वांचे स्वागत वंदे मातरमच्या घोषणेने करायचे असं केशव व मित्रमंडळीनी ठरवलं! बस्स, मग काय! ज्या वर्गात स्वारी जाई त्या वर्गात सर्व विद्यार्थी उभे राहून जोरदार वंदे मातरम ची घोषणा करत. इंग्रज अधिकारी जाम वैतागला, चिडचिड करत निघून गेला. असे होते केशवराव लहानपणी !

 

dr-hedgewar-inmarathi01
wikipedia.org

सन १९२५ ला विजयादशमी च्या दिवशी केशवरावांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात मोहिते वाड्यात केवळ ७ ते ८ लहान मुलांना घेऊन केली. स्वतःच्या संघटन कौशल्याने आणि माणसे जोडून ठेवण्याच्या कलेने डॉक्टरांनी एक-एक व्यक्ती पक्का जोडला. १९२५ ते १९४० या १५ वर्षांत संघ अवघ्या भारतभर पसरला.

अनेकदा डॉक्टर स्वतःच्या वागण्यातून असा काही आदर्श घालून देत की, दगडही संस्कारित होईल. अण्णा बागुल नावाचे स्वयंसेवक आपला अनुभव सांगतात की. शिबिरात नळावर कपडे धुताना खालच्या नळावर मी स्वतः डॉक्टरांना आपले कपडे धुताना बघितलं, आणि मी म्हणलो की मी धुतो, तेव्हा डॉक्टर उद्गारले,

“आपले कामं आपणच केले पाहिजेत, तेव्हाच व्यक्ती निर्माण होईल.”

अण्णा बागुल म्हणतात मला नाईलाजाने जावे लागले, पण राष्ट्राच्या एवढ्या मोठ्या संघटनेचा प्रमुख स्वतः कपडे धुतो हे बघून तर सह्याद्री मधला काळा दगड सुद्धा संस्कारित होईल तर माणूस का नाही ?

 

dr-hedgewar-inmarathi02
rssts.org

आपल्या आत्मचरित्रामध्ये स्वतः ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके डॉक्टरांची एक आठवण लिहितात, मुंबईत असताना बाबूजींना बराच काळ काही काम मिळत नव्हते, त्यात त्यांनी संघ कार्यालयात निवासाला राहणे सोडले होते. डॉक्टर एके दिवशी जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी बाबूजींना बोलावून घेतले.

बाबूजी लिहितात, डॉक्टरांनी मला विचारले , “काय करतोस?” बाबूजी म्हणले “काहीच नाही!” डॉक्टरांनी पुनः विचारले “कुठं असतोस ?” बाबूजी म्हणले “कुठंच नाही” आणि डॉक्टरांनी बाबूजींना मिठी मारल्यावर बाबूजींच्या खांद्यावर पडलेला अश्रूचा थेंब त्यांना जाणवला. तिथून पुढं त्या एका घटनेने बाबूजी आयुष्यभर संघकामात राहिले.

 

RSS-InMarathi02
rssts.org

सन १९४० च्या संघाच्या तृतीय वर्षात डॉक्टरांनी आपले शेवटचे बौद्धिक दिले. अवघ्या १५ वर्षात संघ इतका विस्तारला की, देशभरात सर्व राज्यात शाखा सुरू झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनी केलेल्या अविश्रांत परिश्रमाला डॉक्टरांनी शेवटच्या बौध्दिकात म्हटल होतं की,

“मी हिंदुराष्ट्राचे छोटे रूप तुम्हा सर्वात पाहतो आहे.”

२१ जून १९४० रोजी डॉक्टर केशवराव हेडगेवार यांची प्राणज्योत मालवली. आज संघाच्या स्थापनेला तब्बल ९२ वर्ष झाले असून देश विदेशात संघाचे काम डॉक्टरांनी सांगितलेल्या तत्वांना धरून सुरूच आहे. अनेक आयाम, अनेक सेवाकार्य, अनेक सामाजिक उपक्रम या सर्व गोष्टीतून संघ व्यक्तिनिर्माणाचे कार्य आज ही तितक्याच सक्षमतेने करतोय आहे.

संघाच्या एका गीतामध्ये संघाच्या कामाची कल्पना येऊ शकते,

“शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है “

===

सदर लेखावर प्रतिवाद करायचा असल्यास तो आमच्या फेसबुक पेजवर पाठवावा. अभ्यासपूर्ण आणि सभ्य शब्दात केलेल्या प्रतीवादास नक्कीच प्रसिद्धी देण्यात येईल.

आमच्या फेसबुक पेजची लिंक: facebook.com/InMarathi.page

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?