लहान मुलांचा आहार कसा असावा? जाणून घ्या…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===


लहान मुलांचा आहार (वयोगट- १ ते ५) :

लहान मुलांच्या आहाराचा विचार करताना २ बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत.

 

 Kids-health-inmarathi
honeykidsasia.com

पहिले म्हणजे प्रत्येक अन्नघटक हा ऊर्जेचा ऊत्तम स्त्रोत असायला हवा. कारण लहान मुले खुप सक्रिय असतात. दुसरे प्रत्येक अन्नघटक हा अत्यंत पौष्टीक असला पाहीजे. कारण त्यांची वाढ होत असते. त्यामुळे संपुर्ण,सकस आहार ही या वयोगटाची गरज असते. तसेच लहान वयोगट असल्याने थोडे थोडे किमान दिवसातून ५ वेळा खाऊ घालावे.

1) Breakfast
2) Lunch
3) Dinner
4) Snacks- 2times

 

दैनंदिन कॅलरीज :

 

health tips-inmarathi

 

मात्र आपण carbs, proteins यांची भाषा न बोलता ज्याद्वारे वरील तक्त्याची पुर्तता होईल अशा अन्नघटकांबद्दल बोलुया.


धान्ये:

सर्व प्रकारची धान्ये आहारात समाविष्ट असावीत. कारण ही ऊर्जेचा ऊत्तम स्त्रोत असुन ह्यात B-complex व fibres भरपुर प्रमाणात असतात. गहु, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदुळ, ओट्स, राजगिरा ही धान्ये पारंपारीक पद्धती व ॠतु, हवामान यांचा विचार करून सेवन करावीत. तसेच पोहे, रवा, दलिया हेही ऊत्तम स्त्रोत आहेत. फक्त मैदा पचनास जड असल्याने तो टाळावा.

डाळी व मांसाहार :

 

health tips-inmarathi01

 

हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थाव्यतिरीक्त proteins चे ऊत्तम स्त्रोत आहेत. तुर, मुग, ऊडीद, चना सर्व डाळींमध्ये protein तर असतेच पण त्याव्यतिरीक्त Bcomplex व fibreदेखील असते. मांसाहाराचा विचार करता अंडी, मासे, meat हे उत्तम स्त्रोत आहेत. मात्र कच्ची अंडी, कच्ची कडधान्ये, तसेच processed meat( nuggets,pattties) यागोष्टी टाळाव्या.

दुध व दुग्धजन्य पदार्थ :

 

health tips-inmarathi04

 

यामध्ये calcium; vitA, vitD ,proteins व healthy fats असतात. दुध, दही, पनीर व दुधाचे पारंपारीक पदार्थ हे त्याचे ऊत्तम स्त्रोत आहेत.
मात्र low fat milk, yogurts, cheese, flavoured milk, drinks टाळावेत.

फळे व भाज्या :

 

health tips-inmarathi05

 

फळे व भाज्या या vitamins,minerals, व fibres चा ऊत्तम स्त्रोत आहेत.हिरव्या पालेभाज्या लोह व कॅल्शीअम चा स्त्रोत आहेत .असे प्रत्येक भाजी व फळातुन वीशेष घटक मिळत असतात.त्यामुळे सर्व भाज्यांचा समावेश आहारात असावा.

 

health tips-inmarathi06

 

मात्र frozen instant vegetable snacks टाळावेत. Seasonal, ताजी, पिकलेली फळे खावीत. तर dehydrated fruits, jams, jellies हे प्रकार टाळावेत.

याशिवाय महत्वाचे घटक म्हणजे

Fats आणि Sugar :

तुप,लोणी यासारखे good fat मुलांना अवश्य द्यावे. २७gm ऐवढी त्याची दैनंदिन गरज असते. साखर देखील मुळ व सेंद्रीय स्वरूपात द्यायला काही हरकत नाही. फक्त chocolates, biscuits, souses टाळावेत. मीठ देखील २gm पेक्षा अधिक देवु नये. Low calorie व high sugar products टाळावेत.

Hydration :

 

water healwater health-inmarathi04th-inmarathi04

 

Hydration हा देखील महत्वाचा घटक आहे. “पाणी”हाच त्याचा ऊत्तम पर्याय आहे. दुध, ताज्या फळाचा रस हेही पर्याय आहेत. नारळपाणी, वेगवेगळी ताजी सरबते, मिठ साखर पाणीहेही ऊत्तम पर्याय आहेत.

Sometime food :

Chocolates, पेस्ट्रीज, तळलेले पदार्थ, junk food, केक, आईस्क्रीम, soft drink हे सकस नसले तरीही मुलांना आवडतेच! त्यामुळे आठवड्यातुन एकदा व कमी प्रमाणात द्यावेत.

काही सोप्या टीप्स :

  • चौरस आहार, आकर्षक रंगसंगती, आवडती चव यामुळे मुलांचा आहार वाढतो.
  • जेवनांच्या मधील वेळात गोड पदार्थ, सरबते, दुध टाळावीत.
  • प्रत्येक मुलाचा आहार वेगळा असतो. त्यामुळे बळजबरीने खाऊ घालु नये.

आता याबाबत आयुर्वेद विचार पाहुया…

आयुर्वेदात नवजात शिशुपासून ते कुमारावस्थेपर्यंत आहाराचे वर्णन आहे. मात्र आज आपण प्रकृतीनुसार लहान मुलांची आहाराबाबत काय काळजी घ्यावी हे पाहुया.

वातप्रकृती :

या प्रकृतीची मुले ही संवेदनाशील,कलात्मक व सतत सक्रिय असतात.सर्व गोष्टी लवकर आत्मसात करतात.एकावेळी खुप गोष्टी करत शिकत असतात.लवकर विचलीत होतात.

 


Kids-health-inmarathi01
newsera.in

 

आहार :

पचनशक्ती नाजुक असते. गरम गरम व पचनास हलके अन्न द्यावे.पोषक सुप्स,गरम पोहे,दलिया यांचा अवश्य समावेश असावा.व रात्रीचे जेवन झोपण्याच्या किमान2-3तास आधी
करावे.

पित्तप्रकृती :

ऊत्तम ईच्छाशक्ती, ऊत्तम नेतृत्व गुण व गतिशील असतात. कुठलेही ज्ञान लवकर आत्मसात तर करतातच पण सखोल अभ्यासही करतात.यांची पचनशक्ती तीव्र असते. त्यामुळे जेवन वेळेवर व अधिक प्रमाणात द्यावे. थंड गुणाचे पदार्थ अधिक द्यावेत. गरम मसाले टाळावेत.

कफप्रकृती :

शांत, स्थीर, कनवाळु स्वभावाची असतात. गोष्टी हळुहळू शिकतात मात्र शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकतात. भावनीक दृष्टीने अत्यंत स्थिर असतात. ही मुले खुप वेळ न खाता राहु शकतात. खरे खवय्ये असतात. पण त्यामुळे over eating ची सवय लागु शकते. मसाल्याचे पदार्थ यांच्या आहारात अवश्य असावेत. थंड व जड पदार्थ टाळावेत.


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?