अळीवचे औषधी गुणधर्म : आहारावर बोलु काही-भाग : १६

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


मागील भागाची लिंक : कडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15

===
“मेथीलाडु” प्रमाणेच “अळीवलाडु” हे देखील हिवाळ्यात सर्वाना आठवतातच! “अळीव” ही वनस्पती पर्शियातून भारतातील आलेली आहे. भारतीय आहारात विशेषकरून त्याच्या बीजांचा समावेश आहे.

 

aliv-inmarathi
veggiemania.blogspot.in

अळीव यातील पोषणमुल्ये :

अळीवमध्ये Vit- C भरपुर प्रमाणात असते. जे c-reactive protiens ची मात्रा प्रमाणात ठेवते. त्यामुळे हृदयविकाराची संभावना कमी होते.

यात Vit- A देखील भरपुर प्रमाणात असते. त्यामुळे food allergy पासुन दुर ठेवते.

दुग्धनिर्मितीमध्ये स्तनग्रंथींना प्रवृत्त करण्याचा विशेष गुणधर्म यात असतो. त्यामुळे प्रसुतिनंतरच्या काळात याचे सेवन ऊपयुक्त ठरते.


अळीवातील Magnese या घटकामुळे Bone density वाढते आणि त्यामुळे Arthritis ची शक्यता कमी होते.

अळीवातील Vit- B2(riboflevin) हे मज्जासंस्थेशी निगडीत व्याधी दुर करते.

Neural tube defect शी निगडीत birth defects ( जन्मजात व्यंग) हे Vit- B9 च्या कमतरेने होतात. अळीवात 10% Vit- B9 असते. त्यामुळे गर्भावस्थेतही अळीव खावे.

यातील Vit- B6 हे hemoglobin च्या निर्मितीस मदत करते. त्यामुळे ते Anemiaमध्ये ऊपयुक्त ठरते.

हा तर झाला अर्वाचिन दृष्टीकोन.

 

aliv-inmarathi01
kitchen.blogspot.in

आता आयुर्वेदानुसार अळीवाचे ऊपयोग पाहुया :

आयुर्वेदात अळीवास “चंद्रशुर” नाव आहे.

अळीवाच्या बीया या स्निग्ध (oily) पिच्छील (बुळबुळीत) गुणात्मक असतात.

कफदोष व वात दोषाचे संतुलन अळीव करते.

पित्तदोषाचे वर्धन करते.

पुष्टीवर्धन करते व प्रतिकारक्षमता वाढवते.

ऊत्कृष्ट पोषण करते.

 

aliv-inmarathi02
recipes.blogspot.in

औषधीय ऊपयोग :

हिक्का (hiccups) (उचकी लागणे) मध्ये ऊपयुक्त ठरते.


वातव्याधी (संधीवात, आमवात) मध्ये ऊपयुक्त ठरते.

कफज अतिसार (dysentry) मध्ये ऊपयुक्त सांगितले आहे.

वातरक्त (gout) मध्ये ऊपयुक्त सांगितले आहे.

औषधीकल्प :

चतुर्बीज चुर्ण—bloating

वातविध्वंस रस—osteoarthritis

धन्वंतरारीष्ट—post natal care


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?