बहुगुणी वरई : आहारावर बोलु काही-भाग १३ 

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


मागील भागाची लिंक : राजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे : आहारावर बोलू काही – भाग १२

==

कुठलाही ऊपवास म्हटला की,  २ गोष्टी हमखास आठवतात, “साबुदाना खीचडी किंवा वरईचा भात”. तर अशी ही वरई किंवा भगर. भगरीला samo rice किंवा jungle rice असे देखील म्हणतात. वनस्पतीशास्त्रानुसार ही millet प्रकारात मोडते. ‘Proso Millet’ हे वरईचे नाव आहे. वरई म्हणजे सर्व पोषकांशाची पुर्तता करणारा अल्पाहाराचा ऊत्तम पर्याय आहे.

 

health-inmarathi02

 

वरईचे ईतर  ऊपयोग पुढीलप्रमाणे :

1) यात anti ooxidants चे प्रमाण भरपुर असते. त्यामुळे त्वचा, केस यांचे आरोग्य राखण्यास मदत होते.

2) यातील lecithin हा घटक nervous system मजबुत करतो व त्याचे कार्य सुकर करतो.

3) Pellagra हा कुपोषणजन्य व्याधी vit.B3-niacin च्या कमतरतेमुळे होतो. त्यात त्वचा खरखरीत होवुन खवले पडु लागतात. वरईमध्ये vit B3 भरपुर असते. त्यामुळे या रूग्णांना वरई अवश्य द्यावी. तसेच ज्या व्यक्तीचा प्राथमिक आहार मांसाहार आहे. त्यांनाही B3 ची कमतरता जाणवु शकते. त्यानींही भगरीचा समावेश आहारात करावा.


 

health-inmarathi

 

4) Calcium प्रचुर मात्रेत असल्याने हाडांची वाढ व आरोग्य राखण्यासाठी ऊपयुक्त ठरते. त्यामुळे लहान मुलांना तसेच वृद्धांना वरई ऊपयुक्त ठरते.

5) वरईतील काही घटक c-reactive protien चे concentration कमी करतात व हृद्रोगाचे प्रमाण घटवते.

6) वरईमध्ये phytic acid हे phytochemical असते. जे cholesterol चे नियमन करते.

7) यातील lignan हा घटक सस्तन प्राण्याच्या आंत्रामध्ये (intestine) मध्ये गेल्यावर mamellian lignan मध्ये परावर्तीत होतो व स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका टाळतो.


8) पेशींच्या वाढीसाठी आवश्यक phospherous यात भरपुर असतो.

 

health-inmarathi01

 

9) Magnessium चे प्रमाण भरपुर असल्याने रक्तातील glucose नियंत्रीत ठेवुन insulin चेही नियमन करते. अशा प्रकारे type-2 diabetes मध्ये ऊपयुक्त ठरते.

10) यातील insoluble fibers अतिरीक्त bile ची निर्मीती थांबवतात. त्यामुळे पित्ताशयातील खड्यांची (gall stones) निर्मीती थांबते.

11) ज्वारी, गहु, बाजरी, धान्ये ही भारतीय आहाराचा पाया आहेत व ती रोजच्या आहारात समाविष्ट असतात. पण वरई हे एकमेव आहे जे पूर्णतः gluten free आहे. त्यामुळे gluten allergy, celiac disease मध्ये ऊपयुक्त ठरते.

12) Fiber भरपुर व पचनास हलकी असल्याने वरई भुकेचे शमन करते. वजन कमी करताना वरईचा नक्कीच ऊपयोग होऊ शकतो.

आयुर्वेदानेही वरई स्थौल्य कमी करताना ऊपयुक्त सांगितली आहे. तसेच कफाचे संतुलन करणारी सांगितली आहे. अधिक प्रमाणात खाल्यास पित्त व वात दोषाचे वर्धन करते. अग्नीमांद्य (पचनशक्ती कमी होणे) या व्याधीत वरई ऊपयुक्त सांगितली आहे. कफजन्य व्याधीत ऊपयुक्त  सांगितली आहे.

टिप—थायराॅईडीसम चा त्रास असल्यास वरई टाळावी. कारण त्यात काही goiterogenic properties आढळतात.


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.




One thought on “बहुगुणी वरई : आहारावर बोलु काही-भाग १३ 

  • September 23, 2019 at 2:30 pm
    Permalink

    Bhagar khalltavar highper acidity hotel ka? Highper acidity asel tar bhagar khau shato ka?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?