राजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे : आहारावर बोलू काही – भाग १२

===

===

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : दिवाळीच्या फराळा मागचं शास्त्रीय महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ११

InMarathi Android App

===
‘राजगिरा’ आपल्याला नवरात्री, एकादशी अशा उपवासांना आठवतो. पण एवढा मर्यादीत त्याचा ऊपयोग आहे का??? नक्कीच नाही. राजगिरा ही अत्यंत गुणकारी वनस्पती असुन जागतिक दर्जावर superfood म्हणुन घोषित झाला आहे. राजगीऱ्यास रामदाना,अमरनाथ म्हणुनही ओळखले जाते. अमेरीकेतून भारतात आलेली ही वनस्पती आहे.

 

rajgira-inmarathi02
boldsky.com

आधूनिकदृष्ट्या, प्रथम राजगिरा जाणुन घेऊया.

===
===

पोषणमुल्ये :

• Calories-371mg
• Carbs-371mg
• Protien-13.5mg
• Iron-76mg
• Suger-1.69mg
• Fat-7.2mg
• Magnessium-248mg
• Fiber-6.7mg
• Calcium-159mg
• Starch-57mg

जीवनसत्वे
• B1-0.1mg
• B5-1.4mg
• vitC-4.2mg
• B2-0.2mg
• B6-0.5mg
• vitE-1.9
• B3-0.9
• B9-82mg

rajgira-plant-inmarathi
acchitips.com

 

आता आपल्या लक्षात आले असेलच की राजगिरा ऊपवासाला का खातात?? जवळपास सर्व आहारसत्वांची पुर्तता होते.

१. Calciumभरपुर असल्याने व लायसीन हे calcium शोषणास मदत करणारेvitamin असल्याने हाडांची मजबुती राखते.

२. vit c भरपुर मात्रेत असल्याने त्वचा ,केस यासाठी ऊपयुक्त सांगितले आहे. हिरड्याच्या विकारात (scurvy)ऊपयुक्त ठरते.

३. राजगिर्यातील protien मध्ये insulin वर नियंत्रण राखण्याचा विशेष गुणधर्म आढळतो .त्यामुळे Diabeticच्या रुग्णांमध्ये ऊपयुक्त ठरते.

४. राजगिराGluten free,fibersने युक्त व भुक आहे. त्यामुळे वजन कमी करताना ऊपयुक्त ठरतो.

५. magnessium अधिक असल्याने migrain मध्येही ऊपयुक्त ठरते.

६. यातील bioactive compounds हेantiallergic असतात.

७. fibers व unsaturated fats असल्यामुळे रक्तवाहिन्यातील cholesrol चे प्रमाण कमी करण्यास मदत करते.हृदयाचे स्वास्थ्य राखते.

 

rajgira-inmarathi
boldsky.com

आता आयुर्वेदीक दृष्टीकोण पाहुया.

१. आयुर्वेदाने राजगिरा रूचीवर्धक( appetizer)सांगितले आहे.त्यामुळे पचनव्याधीनंतर येणारा nausea कमी करण्यास मदत करते.

२. “रक्तशोधक” सांगीतले आहे. त्यामुळे रक्तपित्त, त्वचा विकार, यात ऊपयुक्त ठरते.

३. “स्तन्य” हा राजगिर्याचा गुणधर्म सांगितला आहे.म्हणजेच मातृत्वामध्ये स्तनदुग्धाची वृद्धी याच्या नियमित सेवनाने होते.

४. “मल:सारक” हा राजगीर्याचा गुण बद्धकोष्ठ, संग्रहणी या व्याधीत ऊपयुक्त ठरते.

५. “हृद्य” हाही गुणधर्म सांगितला आहे. म्हणजेच हृदयासाठी ऊत्तम सांगितले आहे.

६. नेत्ररोगांमध्ये राजगिर्याचे सेवन सांगितले आहे. रोजच्या आहारात राजगिरा असेल तर दृष्टी ऊत्तम राहते.

७. स्थौल्य कमी करण्यासाठी आयुर्वेदाने रोज राजगिर्याचे सेवन सांगितले आहे.

८. पंडू(Anemia)मध्ये राजगिरा ऊपयुक्त सांगितला आहे.

९. केस गळणे, केस पांढरे होणे हे विकार राजगिरा सेवनाने टळतात.

१०. “रक्तस्तंभक” म्हणजे रक्तस्त्रव थांबवण्यास मदत करते .त्यामुळे रक्तार्श (heamorhoids)मध्ये ऊपयुक्त ठरते.

 

===
===
rajgira-inmarathi01
thehealthsite.com

हे सर्व गुणधर्म राजगिर्याची पाने व बियांमध्ये असतात. त्यामुळे राजगिर्याच्या पानांची भाजी,रस आहारात समाविष्ट करावी.तसेच राजगिरा हा लाडू,पराठे,थालिपीठ, शिरा, खीर अशा अनेक स्वरूपात बनवता येतो.

 

rajgira-inmarathi03
boldsky.com

म्हणुनआठवड्यातून एकतरी नाष्ता राजगिर्याचा खावा. चाॅकलेट्सची जागा राजगिर्याच्या लाडवांनी किंवा चीक्कीने घेतली तर ऊत्तमच! वजन कमी करताना राजगिर्याच्या लाह्या तुम्ही ओट्स,काॅर्नफ्लेक्स ऐवजी घेवू शकता. मधुमेहीसुद्धा त्यांची न्याहारी राजगिर्याच थालिपीठ,लाह्या,भाकरी असे ठेवू शकतात.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *