' जैविक उत्क्रांतीबद्दलच्या बहुतेकांना माहिती नसलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी – InMarathi

जैविक उत्क्रांतीबद्दलच्या बहुतेकांना माहिती नसलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पांढऱ्या वाघांना पांढरे केस असणं हा जैविक उत्क्रांतीचा भाग आहे. पण जैविक उत्क्रांती म्हणजे काय ? जैविक उत्क्रांती म्हणजे जीवसृष्टीतील कोणताही आनुवंशिक बदल जो प्रत्येक पुढच्या पिढीत मागच्या पिढीकडून संक्रमित होतो. हा बदल लहान किंवा मोठा, लक्षणीय किंवा लक्षातही येणार नाही इतका सूक्ष्म असू शकतो.

एखादा बदल हा जैविक उत्क्रांतीतील पल्ला ठरायचा असेल तर तो बदल त्या पिढीतील बहुतेकांमध्ये व्हायला हवा आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हायला हवा.

तरच त्या समूहातील ती जैविक रचना किंवा अधिक खोलात सांगायचे तर, आपल्या शरीरातील विशिष्ट गुणसूत्रांच्या जोडीतील एक निश्चितपणे बदलले आणि पुढच्या पिढीकडे गेले असे म्हणता येईल. या बदलांच्या दृश्य रूपामुळे, आपण पुढच्या पिढीत हे बदल पाहू शकतो. जीवसृष्टीतील घटकांमध्ये जैविक पातळीवर मोठ्या प्रमाणावर झालेल्या छोट्याश्या बदलाला सूक्ष्म उत्क्रांती म्हणतात.

 

humanevolution-inmarathi
fthmb.tqn.com

जैविक उत्क्रांतीत सर्व जीवसृष्टी ही जोडलेली असून ती एक समान पूर्वजपासून उत्क्रांत झाली आहे असे मानले जाते. याला खूप मोठ्या प्रमाणात झालेली उत्क्रांती म्हणतात.

ही उत्क्रांती नव्हेच !

जैविक उत्क्रांती म्हणजे फक्त काळ पुढे सरकतो त्यामुळे झालेले बदल नव्हेत. कित्येक जीव हे स्वतःच्या आयुष्यातसुद्धा बदल अनुभवत असतात. कधी आपलं वजन वाढतं तर कधी कमी होतं. पण हे बदल म्हणजे उत्क्रांती नव्हे. कारण हे बदल म्हणजे गुणसूत्रांमधील बदल नव्हेत. त्यामुळे हे एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमितसुद्धा होत नाहीत.

उत्क्रांतीचा सिद्धांत :

उत्क्रांती हा चार्ल्स डार्विनने मांडलेला एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. असा सिद्धांत जो नैसर्गिकरित्या घडून आलेला सजीव सृष्टीचा प्रवास, निरीक्षणे आणि प्रयोगांच्या आधारे उलगडून सांगतो. ज्या गोष्टी निसर्गात घडल्या, त्या का आणि कशा घडत गेल्या असाव्यात याची कारणमीमांसा करतो. वैज्ञानिक सिद्धांताची व्याख्या, सामान्य अर्थापेक्षा वेगळी असते. यात एक गृहीतक मानलं जातं. एक चांगला वैज्ञानिक सिद्धांत हा तपासून पाहता येतो, खोटा ठरवता येतो, आणि पुराव्यानिशी शाश्वत ठरवता येतो.

 

Charles-Darwin-inmarathi
smithsonianmag.com

नैसर्गिक निवड म्हणजे काय ?

नैसर्गिक निवड ही जैविक उत्क्रांती होऊन बदल घडण्याची प्रक्रिया आहे. नैसर्गिक निवड ही मोठ्या समूहात घडणारी प्रक्रिया आहे. ही पुढील गोष्टींवर अवलंबून असते.

लोकसंख्येतील सजीवांमध्ये वेगवेगळ्या खुबी किंवा विशेषता असतात. त्या वातावरणात सूट होणाऱ्या विशेषता असणारे सजीव अधिक पुनरुत्पादन करतात. त्यामुळे कालांतराने त्या ठिकाणचा जैविक गट निश्चित होतो.

जीवसृष्टीत गुणसूत्रांतील बदल हा योगायोगाने घडून येतो पण नैसर्गिक निवड हा योगायोग नसतो. हा, गुणसूत्रांतील होऊ पाहणारा बदल आणि पर्यावरण यांच्या सुसंवादातून जन्म घेतो. जे बदल विशिष्ट परिस्थितीत / पर्यावरणात तग धरू शकतात, तेच बदल घडतात आणि तसे बदल स्वीकारू शकणारे जीवच तग धरून राहतात. त्यांचे पुनरुत्पादन इतरांपेक्षा जास्त होते आणि अनुकूल बदल हे पुढील पिढीकडे संक्रमित होतात. चित्त्यांच्या अंगावर असलेले पट्टे, झाडांसारखे दिसणारे किटकभक्षी प्राणी ही अशीच काही उदाहरणे.

गुणसूत्रांतील बदल कसा घडून येतो ??

गुणसूत्रांतील बदल हा प्रामुख्याने DNA mutationमुळे होतो, एका समूहातून दुसऱ्या समूहात गुणसूत्रांच्या होणाऱ्या आदानप्रदानातून होतो आणि sexual reproduction मुळे होतो. Sexual reproduction हे दुसऱ्या व्यक्तीच्या गुणसूत्रांशी संयोग होऊन गुणसूत्रांमध्ये बदल घडवून आणणे शक्य करते. अर्धसूत्री विभाजनामध्ये (meiosis) गुणसूत्रांची पुनर्जोडणी होते आणि एका स्वतंत्र गुणसूत्राची निर्मिती होते.

 

change-in-dna-inmarathi
researchgate.net

अर्धसूत्री विभाजनाच्या वेळी झालेले स्वतंत्र वर्गीकरणातून गुणसूत्राच्या अगणित जोडण्या बनू शकतात. त्यातून पर्यावरणाशी सुसंगत असेल अशी गुणसूत्रांची जोडणी केली जाते आणि पर्यावरणाशी विसंगत गुणसूत्रांचा नाश होतो.

जैविक उत्क्रांती विरुद्ध निर्मिती

जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत हा पहिल्यापासूनच वादाचा मुद्दा आहे. उत्क्रांतवाद्यांच्या म्हणण्यानुसार, उत्क्रांती ही देव आहे की नाही याच्याशी संबंधित नाही. ती देवाचा उल्लेखदेखील करत नाही तर कशाप्रकारे नैसर्गिकरित्या उत्क्रांती घडून आली असावी हा विचार मांडते. असे करताना ते उत्क्रांतीची वस्तुस्थिती ही काही धार्मिक भावनांच्या विरुद्ध जाते यापासूनही पळ काढत नाहीत. त्यांच्या मते आपला एक समान पूर्वज आहे.

तर बायबलमध्ये असं म्हटलंय की आपण देवाची निर्मिती आहोत. सगळ्या जीवसृष्टीचा कर्ता करविता ईश्वर आहे.

काहीजण या दोन्ही संकल्पनांचा मिलाफ घडवून असंही म्हणतात की देव आहे हे खरं आणि त्यानेच या जगाची निर्मिती केली आहे हे देखील खरंच. पण उत्क्रांती हीच देवाची मनुष्यनिर्मितीची प्रक्रिया आहे. अशा रितीने आजपर्यंत जीवसृष्टीचा प्रवास- उत्क्रांती की निर्मिती हा वादाचाच मुद्दा ठरला आहे आणि असं वाटतं की या प्रश्नावर इतक्या सहज एकमत होणं शक्य नाही…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?