रामायणातील ह्या १२ गोष्टींपैकी किती तुम्हाला माहिती आहेत?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

रामायण हिंदू धर्मातील दोन सर्वात महत्वाच्या ग्रंथांपैकी एक आहे. भगवान रामांच्या जीवनावर आधारित असलेल्या या ग्रंथामध्ये लोकांच्या खूप भावना जोडल्या गेल्या आहेत. वाल्मिकीने लिहिलेल्या या ग्रंथात खूप शिकण्यासारखे आहे, पण आम्ही तुम्हाला रामायणाविषयो काही अशी माहिती आज सांगणार आहोत जी तुम्हाला कदाचित माहित नसतील.

 

ramayana-marathipizza01
flickriver.com

१. वाल्मिकींनी सर्वात पहिल्यांदा रामायण लिहिले होते नंतर तुलसीदासांनी याचे रुपांतर रामचरितमानस मध्ये केले.

 

२. सीता जनक राजाची नाही तर, भूदेवीची मुलगी होती, ती पृथ्वीवर देवी लक्ष्मीचा अवतार होती.

 

३. जेव्हा रावण शंकर देवांचे दर्शन घेण्यासाठी कैलाश पर्वतावर गेला. तेव्हा त्याला नंदीने दरवाजावर थांबवले त्यावेळी रावणाने त्याची मस्करी केली त्यामुळे रागात येऊन नंदी ने त्याला शाप दिला की, त्याच्या राज्याचा नाश एक माकड करेल. हा शाप तेव्हा पूर्ण झाला जेव्हा वानरसेनेने रावणाच्या साम्राज्याचा अंत केला.

ramayana-marathipizza02
pinterest.com

४. लक्ष्मण आपल्या भावाच्या आणि वहिनीच्या सुरक्षेमध्ये एवढे मग्न होते की ते १४ वर्षाच्या वनवासामध्ये एकदाही झोपले नाहीत, झोपेची देवी निद्राने सांगितले की त्यांच्या जागेवर कोणालातरी दुसऱ्याला झोपावे लागेल, म्हणून लक्ष्मणाची बायकी उर्मिला १४ वर्षापर्यंत झोपली होती. मेघनादला वरदान मिळाले होते की, ज्याने झोपेवर प्रभुत्व मिळवले असेल तोच त्याला हरवू शकतो म्हणून लक्ष्मण त्याला हरवू शकला.

 

५. राम आणि त्यांच्या भावांच्या जन्मापूर्वी राजा दशरथाला कौशल्या कडून शांता नावाची मुलगी झाली होती. कौशल्याची मोठी बहिण वर्षिनी आणि तिचा नवरा राजा रोमपदला कोणतेही अपत्य नव्हते, म्हणून दशरथाने त्यांना आपली मुलगी दान केली.

 

६. शंकरदेवांना प्रसन्न करण्यासाठी रावणाने स्वतःच आपले शीर कापले होते,पण त्याचे शीर सारखे उगवत होते. त्याप्रकारे त्याने १० वेळा आपले मुंडके कापले. हेच १० शीर त्याला शंकरदेवांनी परत केले होते.

ramayana-marathipizza03
zeenews.india.com

७. भगवान राम विष्णू देवांचा अवतार होते. भरत त्यांचा सुदर्शन चक्र होता आणि शत्रुघ्न त्यांचा शंख आणि लक्ष्मणला त्यांचा शेषनाग मानले जायचे.

 

८. एकदा भगवान राम यमाला भेटायला गेले होते, तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला बाहेर पहारा द्यायला सांगितले. यमाने त्यांच्यासमोर एक अट ठेवली की, दरम्यान जो कोणी आत येण्याचा प्रयत्न करेल त्याला मरावे लागेल. तेवढ्यात तिथे ऋषी दुर्वास आले, त्यांना थांबवल्याने त्यांनी अयोध्याला शाप देण्याचे ठरवले. त्यामुळे लक्ष्मणाला नाईलाजाने आतमध्ये जावे लागले. त्यानंतर लक्ष्मणाने सरयूला जाऊन आपला प्राण त्याग केला.

 

९. राम राजा बनल्यानंतर,एकदा त्यांच्या दरबारात नारदमुनींनी हनुमानाला विश्वमित्राला सोडून सगळ्या ऋषींना नमस्कार करायला सांगितले, कारण विश्वामित्र हे पूर्वी राजा होते. त्यानंतर नारदमुनींनी जाऊन विश्वामित्राला भडकावले, त्यांनी रामाला हनुमानाला शिक्षा द्यायला सांगितले. राम आपल्या गुरूचा शब्द मोडू शकत नव्हते, म्हणून त्यांनी हनुमानाला बाण मारले आणि त्याचवेळी हनुमानाने रामाचा जप सुरु केला आणि एकही बाण त्याला लागला नाही, त्यानंतर रामाने ब्रम्हास्त्राचा वापर केला परंतु तरीही हनुमानाला काही झाले नाही. अखेर नारदमुनींनी हे युद्ध थांबवले.

 

ramayana-marathipizza04
aumamen.com

१०. संपत्तीचे देव कुबेर हे रावणाचे सावत्र भाऊ. रावणाने त्यांना हरवून लंका काबीज केली होती.

 

११. जेव्हा रामसेतू बनवला जात होता तेव्हा एक खार सुद्धा रामसेतू बनवण्यासाठी आपले योगदान देऊ इच्छीत होती, तिने जेव्हा तीन छोटे दगड उचलून आणले तेव्हा काही माकडे तिच्यावर हसली. त्यामुळे दुःखी होऊन ती रामाजवळ बसली, तेव्हा श्री रामांनी तिच्यावरून प्रेमाने हात फिरवला त्या दिवसापासून खारींच्या पाठीवर त्या रेषा आहेत.

 

१२. गायत्री मंत्राची २४ अक्षरे आहेत आणि रामायण मध्ये २४००० श्लोक आहेत. प्रत्येक १००० व्या श्लोकामधील पहिले अक्षर एकत्र केले तर गायत्रीमंत्र बनतो.

 

ramayana-marathipizza05
wiralfeed.wordpress.com

 

तर – ह्यातील किती गोष्टी आज कळाल्या तुम्हाला? 😀

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?