लिओनार्डो दि कॅप्रीओ + अभिनयाचं अजब रसायन = प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा परफॉर्मन्स!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काही हॉलीवूड चित्रपट कितीही वेळा बघितले तरी कंटाळा येत नाही. ह्यापैकीच एक चित्रपट म्हणजे Titanic होय. Titanic म्हटले की पहिल्यांदा डोळ्यापुढे येतो तो तरणाबांड चॉकलेट हिरो Jack म्हणजेच लिओनार्डो दि कॅप्रिओ.

त्याचे किलर लुक्स आणि अप्रतिम अभिनय सर्वांना आवडून गेला व तो जगभरातील तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. आपल्याकडे जे फारसे इंग्लिश सिनेमे बघत नाहीत त्यांना लिओ हा Titanic मधला हिरो इतकेच माहिती आहे. Titanic मध्ये त्याने प्रेमळ, केअरिंग पण तितक्याच खंबीर असलेल्या प्रियकराची भूमिका इतकी सुरेख वठवली आहे कि त्याच्याकडे बघून प्रत्येक मुलीला आपल्यालाही अगदी अस्साच प्रियकर मिळावा हे न वाटल्यास नवल!

leonardo-marathipizza
copicola.com

पण लिओने आजवर केवळ चॉकलेट हिरोच्याच भूमिका केल्यात असे नाही बरं का! त्याने त्याच्या २६ वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका केल्या आहेत. विश्वास नाही ना बसत? पण हे खरे आहे कि लिओला चित्रपटसृष्टीत येऊन २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. लिओकडे बघून तर हे मुळीच खरे वाटत नाही. दिवसेंदिवस तो अधिकाधिक यंग आणि handsome दिसू लागला आहे. त्याने आजवर जितके चित्रपट केले आहेत त्यात त्याने एकातही वाईट अभिनय केला नाही. त्याला बहुतेक वाईट अभिनय म्हणजे काय हे माहितीच नसावे इतका तो प्रत्येक भूमिकेत अगदी फिट्ट बसतो आणि त्या चित्रपटातील पात्राशी एकरूप होऊन उत्तम अभिनयाचे प्रदर्शन घडवतो.

प्रत्येक भूमिका त्याने इतकी समरसून केली आहे कि जणू ती फक्त त्याच्यासाठीच लिहिली गेली होती. ११ नोव्हेंबर १९७४ साली जन्मलेल्या लिओने त्याच्या अभिनयाची सुरुवात ९० च्या दशकात टीव्ही वरील जाहिरातींपासून केली. सुरुवातीला त्याने Santa Barbara आणि Growing Pains ह्या आणि अनेक टीव्ही सिरियल्स मध्ये कामे केली. त्याचा पहिला चित्रपट म्हणजे १९९१ साली प्रदर्शित झालेला Critters 3, ह्यात त्याने जॉश हे पात्र रंगवले होते. १९९१ ते आजवर लिओने विविध भूमिका केल्या, त्याची प्रत्येक भूमिका त्याने खूप उत्तम प्रकारे करूनही त्याला बरीच वर्ष ऑस्कर पुरस्काराने हुलकावणी दिली म्हणून त्याचे चाहते नाराज होते. पण अखेर २०१६ साली त्याला The Revenant ह्या चित्रपटासाठी best actor चा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

leonardo-marathipizza01
zimbio.com

ह्या आधी त्याला त्याच्या उत्तम अभिनयासाठी जवळजवळ ५० विविध पुरस्कार मिळाले आहेत व १६७ वेळा नामांकने मिळाली आहेत. म्हणूनच आज तो हॉलीवूड मधील सर्वात यशस्वी कलाकारांपैकी एक आहे व अनेक निर्माते, दिग्दर्शक त्याच्या बरोबर काम करण्यासाठी उत्सुक असतात. तो फक्त चित्रपटांमध्येच काम करत नाही. निसर्ग संवर्धन व ग्लोबल वॉर्मिंग बद्दल लोकांमध्ये जागृती करण्यासाठी सुद्धा तो तितक्याच नेटाने काम करतो. आज आपण लिओच्या अनेक चांगल्या चित्रपटांपैकी अशा चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यातील भूमिकांमुळे लिओ आज यशाच्या शिखरावर विराजमान झाला आहे.

१. This Boy’s Life (1993)

leonardo-marathipizza02
imdb.com

ह्यात लिओने एका Toby नावाच्या मुलाची भूमिका केली आहे. Toby हा स्मार्ट व स्वतंत्र विचारांचा मुलगा आहे. त्याला त्याच्या कठोर शिस्तीच्या सावत्र वडिलांपासून सुटका हवी आहे. त्याचे सावत्र वडील हे थोडे वेडसर,विकृत विचारांचे असतात. ह्या चित्रपटात काम करणे सुरु केले तेव्हा तो एक टीनेजर होता. सतत वाईट वागणूक मिळाल्यामुळे, गैरसमजाचा बळी ठरल्यामुळे व मन मारत आयुष्य जगल्यामुळे मनाची झालेली घुसमट त्याने अगदी छान सादर केली आहे. मग एका क्षणी त्याला स्वत:च्या भल्यासाठी बंड करून उठताना, स्वतःचा बचाव करताना, स्वतःच्या आयुष्यासाठी लढा देताना बघून आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. रोबर्ट दि निरो ह्या ज्येष्ठ अभिनेत्यासमोर आपली भूमिका लिओने तितक्याच ताकदीने वठवली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांना खात्री झाली होती कि हा मुलगा एक दिवस हॉलीवूड मधील मोठा स्टार होणार!

 

२. What’s Eating Gilbert Grape (1993)

leonardo-marathipizza03
theodysseyonline.com

ह्या चित्रपटात लिओने एका Autistic मुलाची भूमिका केली आहे. हि भूमिका करून त्याने त्याची अभिनयक्षमता जगाला दाखवून दिली. इतक्या लहान वयात इतकी आव्हानात्मक भूमिका चांगल्या प्रकारे करणे हे सर्वांनाच शक्य नाही. पण लिओने हे करून दाखवले. अतिशय सुंदर चित्रपट व त्यातील लिओची अप्रतिम भूमिका बघण्यासारखी आहे.

 

३. The Basketball Diaries (1995)

leonardo-marathipizza04
alchetron.com

ह्या चित्रपटात लिओने Jim Carroll नावाच्या एका हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या बास्केटबॉल प्लेयरची भूमिका केली आहे. जिमला त्याने ड्रग्स घेतल्यामुळे टीम मधून काढून टाकण्यात येते. त्यानंतर त्याची अधोगती सुरु होते आणि तो नको त्या गोष्टीत अडकतो. दुष्टचक्रात अडकलेल्या तरुणाची भूमिका लिओने अतिशय उत्तम प्रकारे केली आहे. ह्या चित्रपटाच्या वेळी लिओ फ़क्त २१ वर्षांचा होता. हा चित्रपट जरी फारसा हिट झाला नसला तरी ह्या भूमिकेने लिओला एक वेगळी ओळख मिळवून दिली.

 

४. Marvin’s Room (1996)

leonardo-marathipizza05
nytimes.com

ह्या चित्रपटात लिओ बरोबर Robert De Niro, Diane Keaton आणि Meryl Streep ह्यांच्यासारखे दिग्गज कलाकार असून सुद्धा लिओने त्याच्या अभिनयाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एक वैतागेला, निराश व विध्वंसक मुलगा ते एक प्रेमळ, काळजी घेणारा व सर्व जबाबदारी नीट सांभाळणाऱ्या मुलापर्यंतचा त्याचा प्रवास लिओने अगदी सुंदर रंगवला आहे.

 

५. Romeo + Juliet (1996)

leonardo-marathipizza06
bristolfilmfestival.com

ह्या चित्रपटात शेक्सपिअरच्या रोमियो आणि ज्युलीयेट ह्या गोष्टीचे नवे रुप आपल्याला बघायला मिळते. ह्या चित्रपटाने लिओला एक सेन्सेशनल हार्टथ्रोब आणि एक डायहार्ड प्रियकर म्हणून जगासमोर आणले. त्याने ह्या चित्रपटासाठी जेव्हा ऑडीशन दिली तेव्हा त्याचे जबरदस्त काम बघून लगेच त्याला हि भूमिका देण्यात आली.

 

६. Titanic (1997)

leonardo-marathipizza07
pluggedin.com

आधीच्या चित्रपटांद्वारे लिओला एक romantic हिरो म्हणून ओळख मिळाली होती, ती ह्या चित्रपटाने आणखी पक्की केली. एका श्रीमंताघरच्या मुलीला एका शिप वर आपल्या प्रेमात पाडून नंतर तिला त्या बुडत्या बोटीवर वाचवण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न करणारा एक मुलगा, जो प्रसंगी तिला वाचवण्यासाठी आपल्या जीवाचा त्याग करतो. लिओने हि भूमिका अगदी अजरामर करून ठेवली आहे. ह्या चित्रपटाने जगाला एक सुंदर लव्हस्टोरी दिली. ह्या चित्रपटाने लिओला जगभरात खरी ओळख मिळवून दिली.

 

७. Catch Me If You Can (2002)

leonardo-marathipizza08
filmsufi.com

ह्या चित्रपटात लिओने Tom Hanks सारख्या ताकदवान अभिनेत्याला तगडी कॉम्पिटीशन दिली. ह्या चित्रपटात त्याने एका फुलप्रुफ Con artist ची भूमिका केली. हा मनुष्य एफबीआयच्या most wanted लिस्ट मध्ये असतो. ह्यात लिओ ला अनेक प्रकारच्या भूमिका करायला मिळाल्या. डॉक्टर, पायलट, वकील अशा अनेक भूमिका त्याने अगदी सहज करून दाखवल्या. ह्या चित्रपटात फक्त लिओच हि भूमिका करू शकला असता.

 

८. Gangs Of New York (2002)

leonardo-marathipizza09
pinterest.com

ह्या चित्रपटापर्यंत लिओ हा फक्त romantic , chocolate boy म्हणून प्रसिद्ध होता. पण ह्या चित्रपटाने त्याला वेगळी ओळख दिली. आपल्या वडिलांना मारणाऱ्या एका गुंडाचा बदल घेण्यासाठी केलेले प्रयत्न लिओने अगदी उत्तम रित्या सादर केले आहेत. ह्या भूमिकेसाठी लिओचे सगळीकडे कौतुक झाले. त्याने हि भूमिका अतिशय ताकदीने उभी केली.

 

९. The Aviator (2004)

leonardo-marathipizza10
criticsroundup.com

ह्या चित्रपटात लिओने प्रसिद्ध व कुख्यात Howard Hughesची भूमिका केली आहे.ह्या Howard Hughes ने एव्हिएशन एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. तसेच आपल्या अभिनयाने हि भूमिका लिओने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. OCD ने त्रस्त असलेल्या व मानसिक व शारीरिक आजारांनी तब्येत खालावत चाललेल्या व्यक्तीची आव्हानात्मक भूमिका लिओने जिवंत केली आहे.

 

१०. The Departed (2006)

leonardo-marathipizza11
the-indie-pendent.com

हा एक गुन्हेगारी विषयावरचा चित्रपट आहे. गुन्हेगारीचे जग किती भेसूर व क्रूर असते, त्यात जिवंत राहणे किती कठीण असते आणि undercover agent बनून राहणे किती अवघड असते ह्याचे दर्शन ह्या चित्रपटातून होते. Matt Damon आणि Jack Nicholson सारखे अभिनेते असतानाही लिओने ह्या चित्रपटात सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्याच्या अभिनयाने त्याने जगाला दाखवून दिले कि तो किती ताकदीचा अभिनेता आहे.

 

११. Blood Diamond (2006)

leonardo-marathipizza12
sky.com

हा लिओचा आणखी एक प्रसिद्ध चित्रपट आहे, ज्यात दक्षिण आफ्रिकेतील हिरेव्यापारातील स्मगलिंग, गैरव्यवहार, हिऱ्याच्या खाणीतील चालणारी अनागोंदी ह्या सर्वाचे दर्शन घडते. एक अनमोल हिरा मिळवण्यासाठी त्याने केलेली धडपड, त्याची हिऱ्या साठी असलेली हाव त्याला एका भ्रष्टाचारी क्रूर जगात घेऊन जाते . तिथे अनुभवलेल्या घटनांनंतर त्याचे हृदयपरिवर्तन होते. त्याचा हा प्रवास बघताना आपलेही डोळे नकळत पाणावतात. लिओला ह्या भूमिकेसाठी ऑस्कर चे नामांकन मिळाले होते.

 

१२. Revolutionary Road (2008)

leonardo-marathipizza13
altfg.com

हा चित्रपट लिओने त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबरोबर म्हणजेच केट विन्स्लेट हिच्या बरोबर केला आहे. ह्यात ह्या दोघांनी एका विवाहित जोडप्याची भूमिका साकारली आहे. दोघेही एकमेकांना व त्याच त्या मोनोटोनस रुटीनच्या आयुष्याला कंटाळतात. ह्यात लिओने एका निराश, विचित्र व मूडी नवऱ्याची भूमिका साकारली आहे. त्यांच्यातली भांडणे खरी वाटतात. चित्रपटाचा शेवट अंगावर काटा आणतो.

 

१३. Inception (2010)

leonardo-marathipizza14
fanpop.com

ह्यात लिओने एक अतिशय आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. ह्यात तो लोकांच्या मनावर ताबा मिळवून त्यांच्या कल्पना चोरतो. हा चित्रपट फक्त आणि फक्त लिओचा आहे. अनेक कंगोरे असलेली हि भूमिका लिओने अतिशय सहजतया पडद्यावर जिवंत केली आहे.

 

१४. Shutter Island (2010)

leonardo-marathipizza15
keywordsuggest.org

हा चित्रपट पाहिल्यानंतर कळते कि लिओचे अभिनयसामर्थ्य काय आहे. अतिशय भयानक गूढ गोष्टींचा शोध घेताना लिओ अशा काही जागांवर जाऊन पोचतो ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. प्रेक्षकांना त्याच्या मनाचा थांग लावता येत नाही. लिओने ह्या चित्रपटात अतिशय powerpacked परफोर्मंस दिला आहे.

 

१५. J. Edgar (2011)

leonardo-marathipizza16
the-void.co.uk

हा चित्रपट सर्वच दृष्टींनी डावा होता. फक्त ह्यात लिओचे असणे हि एकमेव उजवी गोष्ट होती. J. Edgar Hoover ह्या एफबीआय अधिकाऱ्याची भूमिका ह्यात लिओने साकारली आहे. J. Edgar Hoover ह्यांनी एफबीआय चे मुख्य म्हणून ५० वर्ष जबाबदारी सांभाळली. त्यात त्यांचे आयुष्य कसे होते हे लिओने अगदी हुबेहूब पडद्यावर उतरवले आहे. चित्रपट पाहण्यासारखा नसला तरी लीओची भूमिका मात्र पाहण्यासारखी आहे.

 

१६. Django Unchained (2012)

leonardo-marathipizza17
rollingstone.com

ह्या चित्रपटात लिओ पहिल्यांदाच एका पूर्णपणे व्हिलनच्या भूमिकेत बघायला मिळतो. तो काळ्या लोकांना गुलाम बनवतो आणि त्याच्या खेळासाठी त्यांचा गुलाम म्हणून वापर करून घेतो. अतिशय क्रूर आणि निर्दयी अशा माणसाचे character लिओने ह्यात जबरदस्त ताकदीने रंगवले आहे. हा चित्रपट बघताना आपल्याला लिओचा संताप येतो हेच त्याच्या अभिनयाचे यश आहे.

 

१७. The Wolf Of Wall Street (2013)

leonardo-marathipizza18
stirileprotv.ro

गुन्हा, प्रेम, ड्रग्स असे सर्व काही असलेल्या ह्या चित्रपटात लिओने एका अशा माणसाची भूमिका साकारली आहे, जो सर्व वाईट साईट धंदे करून, चीटिंग करून भरपूर पैसा कमावतो आणि नंतर सगळा पैसा गमावतो. ह्या चित्रपटात लिओची भूमिका अतिशय explicit आहे. भूमिका करून लिओने धाडसच केले आहे.

 

१८. The Great Gatsby (2013)

leonardo-marathipizza19
curva3omar.wordpress.com

आपल्याला सोडून गेलेल्या प्रेयसीला परत मिळवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करून, तिला काहीही करून परत मिळवण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या माणसाची भूमिका ह्यात लिओने केली आहे. त्याची प्रेयसी जी दुसऱ्या कोणाची तरी बायको आहे, तिला परत मिळवण्यासाठी हा अनेक चांगले वाईट प्रयत्न करतो. प्रेयसी सोडून गेल्यानंतरचे भकास व उदास भाव लिओने अतिशय उत्तम प्रकारे मांडले आहे. निराश झालेला लिओ बघून आपल्याली मनात उदास भाव दाटून येतात.

 

१९. The Revenant (2015)

leonardo-marathipizza20
nerdlocker.com

अखेर ह्या चित्रपटासाठी लिओला ऑस्कर मिळाले. खरं तर त्याला ह्या आधीच हे पुरस्कार अनेक वेळा मिळायला हवे होते, पण ह्या पुरस्काराने नेहमीच लिओला हुलकावणी दिली. अखेर चाहत्यांची प्रार्थना ज्युरींनी ऐकली आणि लिओची best actor म्हणून ह्या पुरस्कारासाठी निवड झाली. ह्या चित्रपटात लिओवर एक अस्वल हल्ला करतं. ह्यात तो गंभीर जखमी होतो. तरी सुद्धा तो जगण्यासाठीची धडपड करीत राहतो. जगण्याची आशा तो सोडत नाहीं. त्याची हि जगण्यासाठी सुरु असलेली लढाई बघून आपल्या मनात तो कायमचा घर करतो. त्याचा ह्या चित्रपटातील अभिनय बघून सर्व जगाने त्याच्यापुढे मान झुकवली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही लिओच्या आणखीनच प्रेमात पडाल.

असा हा चतुरस्त्र अभिनेता लिओनार्डो दि कॅप्रीओ ! ह्याची प्रत्येक भूमिका म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी असते. चाहत्यांच्या गळ्यातला हा ताईत आता पुढे आणखी कुठल्या भूमिका करून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो ह्याचीच उत्सुकता आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?