लिओनार्डोने त्याचं ऑस्कर परत केलंय, पण कारण जाणून घेतल्यावर तुम्ही देखील त्याची प्रशंसा कराल!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

लिओनार्डोला कोण नाही ओळखत? टायटानिक मधल्या आपल्या अभिनयाने त्याने जे प्रेक्षकांवर गारुड केले ते कायमचेच, पण अश्या या हरहुन्नरी अभिनेत्याला इंडस्ट्री मध्ये कित्येक बेस्ट परफॉर्मन्स देऊनही ऑस्कर काही मिळाला नव्हता. ऑस्कर मिळवणे म्हणजे प्रत्येक अभिनेत्याचे एकमेव स्वप्न…गेल्या वर्षीच्या ऑस्कर अवॉर्डसची घोषणा झाली आणि रेव्हेनन्ट चित्रपटासाठी अखेर सर्वोत्तम अभिनेता म्हणून लिओनार्डोला ऑस्कर मिळालाच. जगभरातील त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी हा क्षण म्हणजे अविस्मरणीय सोहळा ठरला. तुम्ही देखील लिओनार्डोचे भयंकर मोठे फॅन असला आणि लिओनार्डोला ऑस्कर मिळाल्यावर तुम्हाला देखील आभाळ ठेंगणे झाले असेल पण आता आम्ही जी बातमी सांगू ती ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण “लिओनार्डोने त्याचं ऑस्कर परत केलंय.”

leonardo-marathipizza01
data1.ibtimes.co.in

थांबा, लगेच हवालदिल होऊन गैरसमज करून घेऊ नका. संपूर्ण प्रकरण सांगण्यापूर्वी आणि तुमचा गोंधळ उडू नये म्हणून एक गोष्ट स्पष्ट करतो की तुम्हाला वाटतंय तो ऑस्कर त्याने परत केलेला नाही आहे, म्हणजे गेल्या वर्षी त्याला मिळालेला ऑस्कर त्याने परत केलेला नसून त्याला भेट म्हणून मिळालेला एक ऑस्कर त्याने परत केला आहे. पण एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की ऑस्कर परत करण्यामागचं कारण जाणून घेतल्यावर तुमचा त्याच्याविषयीचा आदर अधिकच वाढेल.

त्याने तो ऑस्कर परत केलाय जो प्रसिद्ध कलाकार मार्लेन ब्रँडन यांना मिळाला होता आणि तो ऑस्कर लिओनार्डोला भेट म्हणून दिला हेला होता.

“On the Waterfront” या चित्रपटामधील जबरदस्त परफॉर्मन्ससाठी मार्लेन ब्रँडन यांना हा ऑस्कर मिळाला होता आणि हीच ऑस्करची बाहुली Red Granite Pictures या प्रोडक्शन कंपनीने लिओनार्डोला गिफ्ट म्हणून दिली होती, कारण दरम्यानच्या काळात त्यांची निर्मिती असलेला “The Wolf Of Wall Street” या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते आणि या प्रोडक्शन कंपनीला चित्रपटासाठी जबरदस्त डेडीकेशन दाखवल्याबद्दल लिओनार्डोला काहीतरी विशेष गिफ्ट द्यायचे होते आणि म्हणून त्यांनी मार्लेन ब्रँडनची ऑस्कर बाहुली लिओनार्डोला भेट म्हणून दिली. यासोबतच त्यांनी लिओनार्डोला तब्बल ३० लाख रुपये किमतीची प्रसिद्ध चित्रकार पिकासो यांचो ओरीजनल पेंटिंग आणि ९० लाख रुपयांचे बॅस्क्वेट कोलाज देखील दिले होते.

leonardo-marathipizza02
nydailynews.com

आता जाणून घेऊया हा ऑस्कर लिओनार्डोने का परत केलाय?

ज्या Red Granite Pictures कंपनीने हा ऑस्कर लिओनार्डोला भेट दिला होता, ते सध्या एका स्कॅंडल मध्ये अडकले असून मलेशिया मध्ये खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कंपनीवर हा आरोप झाल्यावर आणि त्या विरोधात पुरावे सापडल्यावर लिओनार्डोने कंपनीसोबत असलेले सर्व संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी दिलेला ऑस्कर आणि इतर भेटी परत करून त्याने कंपनी आणि आपल्या नात्याला पूर्व विराम दिला आहे. फसवेगिरी करणाऱ्या कोणत्याही कंपनीसोबत मला स्वत:ला लिंक करायचे नाही असे मत लिओनार्डोने मांडले आहे.

leonardo-marathipizza03
theweeklyobserver.com

आपल्या सच्चेपणासाठी हॉलीवूड मध्ये प्रसिद्ध असलेल्या लिओनार्डोने उचललेले हे पाउल त्याच्या असंख्य चाहत्यांच्या मनात त्याची प्रतिमा अधिक उंचावणारेच आहे नाही का?

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?