गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नाही तर एका भारतीयाने लावला होता !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

गुरुत्वाकर्षणाचा शोध हा जगातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोधामुळे विज्ञान एक वेगळ्या उंचीवर गेलं आणि विज्ञानाचं सुवर्णयुग सुरु झालं असं म्हटलं तर वावग ठरू नये.

बरं तर हा शोध कोणी लावला? हा प्रश्न विचारल्यावर सगळे एका सुरात उत्तर देतील की, ‘गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला होता’. पण तुम्हाला ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल की गुरुत्वाकर्षणा’चा शोध न्यूटनच्या आधी १२०० वर्षांपूर्वी एका भारतीयाने लावला होता.

तो भारतीय होता भारतीय गणिततज्ञ भास्कराचार्य !


law-of-gravity-discovered-by-indian-marathipizza
स्रोत

जेव्हा सफरचंदाच्या झाडाखाली बसलेल्या न्यूटनच्या डोक्यावर एक सफरचंद पडले तेव्हा कुतूहलापोटी न्यूटनने संशोधन केले आणि त्याने गुरुत्वाकर्षणाची संकल्पना मांडली ही गोष्ट संपूर्ण जगाला ठावूक आहे. परंतु भास्कराचार्यांनी मात्र १२ व्या शतकातच गुरुत्वाकर्षणाशी निगडीत गोष्टींचा उलगडा केला होता हे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधून दिसून येते.

भास्कराचार्य हे १२ व्या शतकातील अतिशय विद्वान खगोलशास्त्रज्ञ आणि गणितीतज्ञ होते. त्यांनी ११५० या शतकामध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी ‘सिद्धांत शिरोमणी’ नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथामधील काही श्लोकांमध्ये गुरुत्वाकर्षणाशी निगडीत बाबींचा स्पष्ट उल्लेख आढळतो.

आकृष्टिशक्तिश्‍च मही तया यत् खस्थं गुरु स्वभिमुखं स्वशक्त्या ।
आकृष्यते तत् पततीव भाति समे समन्तात् क्व पतत्यंय खे ॥

याचा अर्थ आहे,

पृथ्वी आपल्या आकाशातील पदार्थ स्वशक्तीने आपल्याकडे खेचून घेते त्यामुळे आकाशातील पदार्थ पृथ्वीवर पडतो. परंतु ग्रहमंडलामध्ये सर्वच जण एकमेकांना खेचत असल्याने कोणीही खाली पडत नाही.

law-of-gravity-discovered-by-indian-marathipizza01

स्रोत

यावरून सिद्ध होते की पृथ्वीमध्ये वरून पडणारा पदार्थ स्वत:कडे खेचण्याची कोणतीतरी अदृश्य शक्ती आहे याबद्दल भास्कराचार्यांना खात्री होती. सदर उल्लेख हा सिद्धांतशिरोमणी भूवनकोश ६ मध्ये आढळतो.

सन ११६३ मध्ये त्यांनी “करण कुतूहल” नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात लिहिले आहे की जेव्हा चंद्र सूर्याला झाकतो तेव्हा सूर्यग्रहण होते आणि जेव्हा पृथ्वीची छाया चंद्राला झाकते तेव्हा चंद्रग्रहण होते. हा पहिला लिखित स्वरूपातील पुरावा हे दर्शविण्यास पुरेसा आहे की त्या काळाच्या भारतीयांना गुरुत्वाकर्षण, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांची नीट माहिती होती.

law-of-gravity-discovered-by-indian-marathipizza02

स्रोत

केवळ हाच नाही तर असे अनके शोध प्राचीन भारतामध्ये लावले गेले होते आणि वेदामध्ये आणि इतर प्राचीन ग्रंथांमध्ये हे सर्व संदर्भ सापडतात.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

One thought on “गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नाही तर एका भारतीयाने लावला होता !

 • December 31, 2016 at 11:22 am
  Permalink

  Hi,
  Tarkhanmadhe gonghal vatto, 2nd paragraph madhe hi ol – गुरुत्वाकर्षणा’चा शोध न्यूटनच्या आधी १२०० वर्षांपूर्वी एका भारतीयाने लावला होता. Nakki 1200 varshanpurvi ki 12 vya shatkamadhe hi shanka aapn dur karavi.

  Tumche lekh aamhi awdine vachat asto, keep it up Marathi Pizza team!!

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?