' रोमन सम्राट सीजरने जिथे आपले शेवटचे शब्द उच्चारले, आज तिथे २५० मांजरी नांदतात..! – InMarathi

रोमन सम्राट सीजरने जिथे आपले शेवटचे शब्द उच्चारले, आज तिथे २५० मांजरी नांदतात..!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

या जगात कित्येक अशी ठिकाणे आहेत जिथे आपल्याला मांजरी बघायला मिळतात. आपल्याचं परिसरात आपल्याला कितीतरी मांजरी फिरताना दिसतात. एवढचं नाही तर कितीतरी लोकं या माजरींना पाळतात देखील. पण आज आम्ही आपल्याला एका अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जे वाचून तुम्हाला जरा विचित्र वाटेल.

cats-istanbul-marathipizza
rosselcdn.net

आता मला सांगा तुम्हाला रोज किती मांजरी दिसतात- एक, दोन ना… पण जर तुम्हाला एक लक्ष मांजरी दिसल्या तर… काय झाले न आश्चर्यचकित, जगात असा एक देश आहे जिथे एक लक्ष मांजरी आहेत. या मांजरींची तेथे राहणाऱ्या लोकांबरोबर खुप पटतं, तर येथील  लोक या मांजरींची आवश्यक ती काळजी घेतात.

या ठिकाणाचं नावं आहे इस्तांबुल… जिथे जवळपास एक लक्ष मांजरी आहेत.

cat-istanbul-marathipizza
boredpanda.com

असेच एक आणखी ठिकाण आहे मोंटेनेग्रो येथील कोटरचे एक छोटेसे समुद्रतटावरील शहर, हे शहर एड्रीयाटिक समुद्राच्या तटावर वसलेले आहे. या शहरातील लोकांचे मांजीरींवर किती प्रेम आहे हे तुम्ही येथील अॅंटिक दुकान बघून समजू शकता. एवढचं काय तर इथे मांजरींना समर्पित असे एक म्युजीअम देखील आहे.

cats-kotor-marathipizza
travelcake.net

तुम्हा-आम्हा सर्वांसाठी मांजरी केवळ एक प्राणी असेल पण इस्तांबुल आणि कोटर मध्ये ते एका सिम्बॉल प्रमाणे आहेत. या शहरातील मांजरी बिनधास्तपणे शहरातील गल्ली-बोळांत फिरतात, जिथे वाटेल तिथे झोपतात. येथील स्थानिक लोकं देखील यांची खूप काळजी घेतात. यासर्वांत रोम मध्ये एका विशिष्ट जमातीच्या मांजरी आढळतात, ज्या अश्या ठिकाणावर आढळतात ज्याचे ऐतिहासिक महत्व आहे.

torre-argentina-cats-marathipizza
pinterest.com

लार्गो डी टोररे अर्जेंटीना  येथे जंगली मांजरी वास्तव्यास आहेत. या जंगली मांजरी पर्यटकांच्या मुख्य आकर्षणाचा केंद्र बनली आहेत. जिथे या मांजरी वास्तव्यास आहेत, त्या ठिकाणी रोमन इतिहासाशी निगडीत एक महत्वपूर्ण घटना घडली होती. याच ठिकाणी रोमन सम्राट जुलिअस सीजरच्या ६० मंत्र्यांनी कट रचून त्यांची हत्या केली होती. यावेळी सीजर यांच्या शरीरावर चाकूने २३ वेळा वार करण्यात आले होते.

largo-di-torre-marathipizza
pinterest.com

लार्गो डी टोररे अर्जेंटीना एक प्रसिद्ध प्राचीन स्थळ आहे, ज्यात चार रिपब्लिकन रोमन मंदिरं आणि पोम्पी थियेटर या वास्तूंचे नाममात्र अवशेष आहेत. हा संपूर्ण परिसर रोम स्थित प्राचीन मार्टियसचा भाग आहे. इथे प्राचीन रोम च्या सुरवातीच्या काळात काहीही नव्हते. रोमन आर्मी त्यावेळी येथे अभ्यास करायची, म्हणूनच या ठिकाणाचं नावं युद्धाचे रोमन देवता मार्स यांच्या नावावर ‘कैंपस मार्टियस’ किंवा ‘फील्ड ऑफ मार्स’ पडले.

torre-argentina-cats02-marathipizza
pinterest.com

ज्या ठिकाणावर सीजर ने आपले शेवटचे शब्द ‘Et tu, Brute?’ म्हणजे ‘and you, Brutus?’ काढले होते आज त्याच जागी जंगली मांजरींचे राज्य चालते. टोररे अर्जेंटीना येथे जवळजवळ २५० मांजरींचे वास्तव्य आहे. आता हे ठिकाणं Cat Sanctuary मध्ये रुपांतरीत झाले आहे. असे म्हणतात की, १९९० च्या दशकाच्या सुरवातीस या मांजरींची संख्या ९९ च्या जवळपास होती पण आज ती २५० च्या घरात आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?