' माने साहेब मुली कोणाच्याही असोत त्यांना ‘नाचायला’ नव्हे तर ‘वाचायला’ शिकवा! – InMarathi

माने साहेब मुली कोणाच्याही असोत त्यांना ‘नाचायला’ नव्हे तर ‘वाचायला’ शिकवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : डॉ. मोहन पवार 

===

एकेकाळी आपल्या उपरा, भटक्यांचे गारुड इ. कादंबऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला अंतर्मुख व्हायला भाग पाडणारे व आजकाल प्रकाश आंबेडकर व असउद्दीन ओवैसी यांच्या ‘बहुजन वंचित आघाडीचे’ नेते असलेले लक्ष्मण माने यांची जीभ काल घसरली….

आपले विखारी विचार मांडताना माने म्हणाले,

“पाटलांनी आता लावणीला जाऊन फेटा उडवण्यापेक्षा त्यांची एखादी चांगली पोरगी आमच्याकडे पाठवावी. तिला मी लावणी शिकवतो”

 

lakshman-mane-cover-inmarathi (1)

 

मराठयांना चिथावणी देताना माने पुढे म्हणतात..

“मराठयांनी कितीही उडया मारल्या तरी ते महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहेत. त्यांची देशपातळीवरील संख्या ही अवघी दीड टक्के आहे आता तुम्ही मागणारे व आम्ही देणारे आहोत.

आता आमचे लोक बँड वाजवणार नाहीत. पाटलांनी बँड वाजवले पाहिजेत, आता फेटे आम्ही उडविणार तुम्ही बँड वाजवा’

सुशिक्षित असणे  व सुसंस्कृत असणे या दोन्ही संपूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत हे वाक्य तंतोतंत खरे आहे. हेच दाखवून देत माने यांनी मराठा समाजाविषयी आणी एकूणच स्त्री जातीबद्दल आपल्या मनात किती विष भरलेले आहे याची एकप्रकारे कबुलीच दिलेली आहे.

खरंतर नृत्य करणे किंवा वाद्ये वाजवणे ही एक कला असून आजकाल मराठाच नाही तर झाडून सर्वच जातीधर्मातील मुले-मुली या क्षेत्रात कार्यरत असलेले दिसून येतात. त्यामुळे आपल्या विषारी वाणीने मानेंनी केवळ मराठयांचा किंवा स्त्री जातीचाच अपमान केलाय असे नव्हे तर हजारो वर्षांची अभिजात कलेची परंपरा असणाऱ्या आपल्या देशातील कलेचाही अपमान केलाय असे म्हणावे लागेल.

तसे बघता मानेंनी महाराष्ट्राला पहिल्यांदाच स्त्रियांबद्दलच्या आपल्या घाणेरड्या प्रवृत्तीचे दर्शन घडवलेय असे काही नाही..

याआधी २०१३ साली मानेंच्या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या सातारा येथील आश्रमशाळेत काम करणाऱ्या एक दोन नव्हे तर तब्बल पाच महिलांनी मानेंविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अटकेच्या भीतीने हे महाशय १५ दिवस फरार झाले होते.

 

lakshman-mane-arrest1-inmarathi
www.majhapaper.com

एका बाजूने साहित्य अकादमी, फोर्ड फौंडेशन तसेच पद्मश्री पर्यंतचे राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा माणुस एवढा जातीयवादी तसेच स्त्रियांबद्दल पराकोटीची गलिच्छ पाषाणयुगीन मानसिकता बाळगणारा कसा असू शकतो हा प्रश्न पडतो. तर दुसऱ्या बाजूने इतकी घाणेरडी मानसिकता असणारी माणसं या जगात अस्तित्वात आहेत याची लाजही वाटते.

आपल्याला वाटेल की मराठा समाज किंवा स्त्रिया यांच्याबाबतच मानेंचे विचार विषारी आहेत. परंतु भारतीय लोकशाही किंवा निवडणुका याबद्दलही या ‘पद्मश्री’ सन्मानीत महाशयांचे विचार काही फार वेगळे नाहीत.. अगदी अलीकडेच सोलापुरात झालेल्या बहुजन वंचित आघाडीच्या मेळाव्यात आपल्या बांधवांना मतदानाचे महत्व समजावून सांगताना हे महाशय म्हणाले होते,

“निवडणुकीत मत विकायचेच असेल तर किरकोळ पैशात विकू नका. त्याचे भरपूर पैसे घ्या आणि पैशांसोबत ‘चपटी’ म्हणजे दारूची बाटली घ्यायला विसरू नका’..या वक्तव्यावरून आपण यांची खालावत असणारी बौद्धिक पातळी लक्षात घ्यायला हरकत नाही.

 

mane1-inmarathi
veethi.com

या निमित्ताने मानेंना वेळोवेळी मदत करणारे तसेच १९९० ते ९६ या काळात विधानपरिषदेत स्थान देऊन मानेंसारखी प्रवृत्ती मोठी करण्यात हातभार लावणारे मराठा समाजातील ‘मातब्बर’ नेते मानेंना त्यांच्या या वक्तव्याबद्दल जाब विचारणार का? हा प्रश्न मात्र मराठा समाजाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.

मराठा समाजाला आरक्षण जाहिर झाल्यापासून महाराष्ट्रात एक फॅड आलेले आहे. कोणीही उठतो व मराठा समाजाबद्दल काहीही बरळतो..

आरक्षण जाहीर केलेले असले तरी ते कोर्टात टिकते की नाही या शंकेमुळे आधीच मराठा समाजमन धगधगत आहे. मानेंसारख्यांची वक्तव्ये त्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत….यातून उडणाऱ्या भडक्यात समाजासमाजात दंगली पेटवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा मानेंसारख्यांचा प्रयत्न असेलही.

पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समाजघटकांना बरोबर घेउन चालण्याच्या, समतेच्या तत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्राला आजतागायत एकसंध ठेवणारा मराठा समाज कदापी हा डाव यशस्वी होऊन देणार नाही हे मात्र नक्की.

 

maratha-morcha-inmarathi01
firstpost.in

जाता जाता मानेसाहेबांना एक सल्ला द्यावासा वाटतोय…

“मानेसाहेब मुली कोणाच्याही असोत…”नाचायचं” की नाही हे आयुष्यातील योग्य टप्प्यावर आल्यावर त्यांचं त्या ठरवतीलच… तुम्ही त्यांना नाचायचं  सोडून फक्त योग्य वेळी “वाचायला” शिकवा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?