महादेवाने का दिले एका चोराला ‘धन देवता’ होण्याचे वरदान?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लहानपणीपासून आपल्याला शिकवल्या जाते की चोरी करणे हे चुकीचे आहे. आपल्या शास्त्रांत तर याला महापाप मानली गेले आहे. तरी देखील लोकं चोरी करतात आणि जर पकडल्या गेले तर त्याची शिक्षा देखी त्यांना भोगावी लागते. पण पौराणिक कथांनुसार एक असा चोर होता जो चक्क मंदिरात चोरी करायचा आणि तरी त्याला भोलेनाथ म्हणजेच शंकरांनी शिक्षा न करता वरदान दिले होते. त्याला शंकरांनी असे वरदान दिले की तो धन देवता बनला. होय आम्ही कुबेर यांच्या बद्दलच बोलत आहोत.

 

kuber story-inmarathi02
templepurohit.com

पुराणांनुसार कुबेर यांना धन-संपत्तीचे देवता म्हणून पुजल्या जाते. ज्यावर कुबेराची नजर पडली त्याच्याकडे कधीही धन-वैभवाची कमी राहत नाही, असे मानल्या जाते. आता तुम्ही विचार करत असाल की कुबेर हे तर देव होते मग त्यांना चोरी करायची काय गरज पडली असेल? तश्या तर कुबेर यांच्या धन देवता बनण्यामागे खूप कथा आहेत, पण त्यापैकी एक पौराणिक कथा खूप प्रचलित आहे.

कुबेर हे मागील जन्मी चोर होते. ते पण असे चोर, जे चक्क देवाच्या मंदिरातच चोरी करायचे. शिव पुराणात आपल्याला या कथेचा संदर्भ सापडतो. शिव पुराणानुसार कुबेर हे खूप गरीब होते, त्याचं नाव गुनिधी होते. ते एवढे गरीब होते की त्यांच्याकडे खायला देखील काही नसायचे.


 

kuber story-inmarathi05
pinterest.com

जेव्हा त्यांची भूक अनावर झाली तेव्हा त्यांनी चोर बनण्याचा निश्चय केला. यानंतर ते स्वतःची उपजीविका भागविण्याकरिता मंदिरात चोरी करायला लागले.

kuber story-inmarathi06
flickr.com

आपल्या चोरी करण्याच्या सवयीमुळे एके दिवस गुनिधी हे एका शिव मंदिरात पोहोचले. ते शिव मंदिर सोने-चांदी आणि तिथल्या दागिन्यांसाठी खूप प्रसिद्ध होते. गुनिधी रात्रीच्या वेळी या मंदिरात चोरी करण्यकरीता गेले. त्यांनी मंदिरातील या खजिन्याचा शोध घेण्याकरिता एक दिवा पेटवला. पण वाऱ्यामुळे तो दिवा वारंवार विजत होता आणि गुनिधी खजिना शोधण्याकरिता त्या दिव्याला वारंवार पेटवत होते.

 

kuber story-inmarathi03
sandhyaleaks.in

बस मग काय, शंकरजी तर आहेच भोळे. त्यांनी गुनिधीच्या या वारंवार दिवा पेटवण्याला आपली दीप आराधना समजली आणि गुनिधी चोराला धन देवता होण्याचा वरदान दिला.

 

kuber story-inmarathi04
wallsnapy.com

याप्रकारे मागील जन्मीचा गुनिधी चोर हा पुढील जन्मी धन देवता कुबेराच्या नावाने जगप्रसिद्ध झाले. ज्यानंतर देवी लक्ष्मी सोबतच कुबेराला देखील पूजले जाऊ लागले.

 

kuber story-inmarathi
chaspikserial.ru

धन देवता असूनही कुबेर याचं व्यक्तित्व आणि चरित्र आकर्षक नसल्याच सांगितल्या जाते. कुबेर हे यात्यांच कुरुपतेसाठी देखील प्रसिद्ध होते. त्यांच्या शरीरयष्टी अतिशय विचित्र आहे. त्यांना तीन पाय आणि ८ दात आहेत.

कुबेर हे रावणाच्या कुळ-गोत्राचे असल्याचे सांगितल्या जाते. म्हणून त्यांना राक्षस किंवा यक्ष म्हणून देखील संबोधल्या जाते. यक्ष हा धनाचा रक्षक असतो पण तो ज्याचा उपभोग घेऊ शकत नाही.

तर अशी आहे एका चोराची धन देवता बनण्याची रोचक कहाणी…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *