प्रत्येक ऑलम्पिकवीर पदक का चावतो? जाणून घ्या यामागचे रंजक कारण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

ऑलम्पिक ही स्पर्धा जगातील सर्वोत्कृष्ट क्रीडा स्पर्धा आहे.

याआधी पार पडलेल्या रिओ ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या पी.व्ही सिंधू आणि साक्षी ह्यांनी पदके पटकावून भारताचे नाव संपूर्ण जगभरात उंचावले होते.

प्रत्येक खेळाडू आपल्या देशासाठी या स्तरावर खेळण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो आणि त्यासाठी खेळाडूंमध्ये नेहमी चढाओढ होत असते.

अश्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एक गोष्ट नेहमी बघायला मिळते ती म्हणजे एखादा खेळाडू जिंकल्यानंतर मिळालेले पदक दाताने चावतो. चला जाणून घेऊया असं करण्यामागे काय कारण आहे.

 

olympic-medal-bitting-marathipizza01
CNN.com

ऑलम्पिक ही नुसती पदक मिळवण्यासाठीची स्पर्धा नाही, तर त्यामध्ये आलेल्या प्रत्येक खेळाडूच्या मेहनतीबद्दलची कथा सांगणारी स्पर्धा आहे.

ही स्पर्धा एकमेकांचे कौतुक करण्याची आणि काहीतरी नवीन शिकवणारी स्पर्धा आहे. खेळाडू या स्पर्धेमध्ये आपले सर्वस्व पणाला लावतात.

आपले पदक तोंडाने चावण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे फोटोग्राफर. फोटोग्राफर त्यांना ती पोज देण्यास सांगतो. हे कारण बऱ्याच जणांना हास्यास्पद वाटू शकते, पण ते अगदी खरे आहे.

आता दुसरे महत्त्वाचे कारण जाणून घेऊया.

कधीही पहा तुमच्या लक्षात येईल की खेळाडू प्रत्येकवेळी सिम्बॉल असलेल्या बाजूनेच पदक चावतात. ही प्रथा जुन्या काळापासून चालत आलेली आहे.

पूर्वीच्या काळी खरे आणि खोटे सोने ओळखण्यासाठी ते सोने दाताने चावले जाई. ऑलम्पिक पदकाचे सोने हे लवचिक असते, त्यामुळे तुम्ही त्यावर आपल्या दातांचे निशाण आरामात उमटवू शकता. असे केल्याने हे कळते की, ते पदक शुद्ध सोन्याचे आहे की त्याच्यावर सोनाचा मुलामा दिला आहे.

 

olympic-medal-bitting-marathipizza02
abcnews.go.com

पण सध्या ऑलम्पिक मधील सुवर्णपदक देखील शुद्ध सोन्याचे नसते. त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो.

शेवटचे शुद्ध सोन्याचे पदक १९१२ मध्ये दिले गेले होते. आताच्या सुवर्णपदकामध्ये फक्त ६ ग्रॅम शुद्ध सोने असते ९२.५ टक्क्यांपेक्षा जास्त चांदी असते.

तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा या गोष्टीवर विश्वास नसेल की – सोने चावल्याने त्यावर दाताचे निशाण उमटत नाही. आपण ही गोष्ट लक्षात घ्यावी की –

माणसाने दाताने घेतलेल्या चाव्याच्या कठोरपणाचे रेटिंग ५ इतके आहे, तर सोन्याच्या कठोरपणाचे रेटिंग केवळ २.५ इतकेच आहे. त्यामुळे मनुष्य सोने चावू शकतो आणि त्यावर दाताचे निशाण उमटवू शकतो.

 

olympic-medal-bitting-marathipizza03
topyaps.com

याचा अर्थ हा नाही की खेळाडू पदक खरे आणि कि खोटे हे तपासण्यासाठी पदक चावतात, कारण त्यांना देखील माहित असते की पदक पूर्ण सोन्याचे नाही. हीच गोष्ट चांदी आणि कांस्य पदका बाबतही लागू पडते.

त्यामुळेच जणू एका प्रथेप्रमाणे प्रत्येक ऑलम्पिकवर आपले पदक चावून फोटोसाठी मस्त पोज देतो…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?