“कोल्ड वॉर” – शीत युद्ध नेमकं काय होतं – समजून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये संयुक्त राज्य अमेरिका आणि सेव्हियत रशियामध्ये उत्पन्न झालेल्या तणावाच्या स्थितीला शीत युद्धाच्या नावाने ओळखले जाते.

१९४० ते १९९० च्या सुरुवातीपर्यंत हे तणावाचे वातावरण होते. काही इतिहासकारानी याला ‘शस्त्र सज्जित शांती’ असे नाव देखील म्हटले आहे.

 

Coldwar.Inmarathi
fthmb.tqn.com

द्वितीय महायुद्धाच्या दरम्यान संयुक्त राज्य अमेरिका, ब्रिटन आणि रुस म्हणजेच आताचे रशिया यांनी एकत्रित येऊन शत्रू राष्ट्रे असलेल्या जर्मनी, इटली आणि जपान यांच्या विरोधात संघर्ष केला होता.

पण युद्ध संपताच एकीकडे ब्रिटेन आणि संयुक्त राज्य अमेरिका यांच्यामध्ये आणि दुसरीकडे सेव्हियत संघामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. लवकरच या तणावामुळे भयंकर स्थिती उत्पन्न झाली.

शीत युद्ध या नावानेच हे लक्षात येते कि, हे युद्ध शस्त्रांचे न होता फक्त धमक्यांपर्यंतच मर्यादित राहिले. यामध्ये जगातील दोन बलाढय शक्तींनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जगातील अधिकांश भागामध्ये अप्रत्यक्षपणे युद्ध लढली.

या युद्धाचा एकच उद्देश होता, तो म्हणजे आपापल्या गटांमध्ये मित्र राष्ट्रांना समाविष्ट करून आपली स्थिती अधिक मजबूत करणे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या विरोधी गटातील राष्ट्रांच्या चाली सहजपणे निष्फळ करता येतील.

 

Coldwar.Inmarathi1
pindex.com

शीतयुद्धाच्या उत्पत्तीचे कारण

१९६१ च्या बर्लिन संकटाच्या वेळी संयुक्त राज्य अमेरीका आणि सेव्हियत रुस यांचे टॅंक समोरासमोर आले आणि यातूनच शीतयुद्धाचे लक्षण द्वितीय महायुद्धाच्या वेळीच प्रकट व्हायला सुरुवात झाली होती.

ह्या दोन्ही महाशक्ती आपापल्या स्वार्थांना लक्षात घेऊन युद्ध लढत होत्या. तसेच, परस्पर सहयोगाच्या भावनेचा त्या दिखावा करत होत्या.

जी सहयोगाची भावना युद्धाच्या दरम्यान दिसत होती, ती भावना युद्ध संपल्यानंतर समाप्त झाली आणि शीतयुद्धाची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागली होती. दोन्ही गट एकमेकांच्या तक्रारी करू लागल्या होते.

याच काही तक्रारी या शीतयुद्धाचा आधार होत्या. या गटांमध्ये असलेले परस्पर मतभेदच शीतयुद्धासाठीचे प्रमुख कारण होते.

शीतयुद्धाची काही प्रमुख कारणे

पुंजीवादी आणि साम्यवादी विचारधारणेचा प्रसार, सेव्हियत संघ आणि अमेरिकेचे वैचारिक मतभेद, सेव्हियत संघ एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभे राहणे, इराणमधील सेव्हियतचा हस्तक्षेप, टर्कीमध्ये सेव्हियतचा हस्तक्षेप,

युनानमध्ये साम्यवादी प्रचार, अमेरीकेची अणुचाचणी, परस्पर विरोधी प्रचार, बर्लिनचा वाद, सेव्हियत संघाद्वारे बाल्कनच्या कराराची उपेक्षा. हे आणि इतर काही कारणे शीतयुद्धासाठी जबाबदार आहेत.

 

Coldwar.Inmarathi2
vanityfair.com

शीतयुद्धाचे झालेले राजनैतिक परिणाम

शीतयुद्धाने १९४६ पासून १९८९ पर्यंत वेगवेगळ्या स्तरामधून जात वेगवेगळ्या रूपाने जगाच्या राजनीतीला प्रभावित केले. या शीतयुद्धाने अमेरिका तसेच सेव्हियत संघ यांच्यामध्ये तणाव निर्माण करण्याबरोबरच इतर काही प्रभाव देखील टाकले.

शीतयुद्धाने जगाला दोन गटांमध्ये विभागले. सेव्हियत गट आणि अमेरिकन गट या दोन गटांमध्ये जग विभागले गेले. त्यामुळे जगातील प्रत्येक समस्येला गटांच्या स्वार्थावर पाहण्यात आले. शीतयुद्धामुळे युरोपचे विभाजन झाले.

शीतयुद्धामुळे जगामध्ये आतंक आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये तणाव, प्रतिस्पर्धा आणि अविश्वासाच्या भावनेचा जन्म झाला. यामुळे वास्तविक युद्धाचे वातावरण निर्माण झाले होते आणि शीतयुद्धाचे कधीही खऱ्या युद्धामध्ये परिवर्तन होऊ शकत होते.

 

Coldwar.Inmarathi3
emol.com

शीतयुद्धाने आण्विक युद्धाची संभावना वाढली आणि अणुशास्त्रांच्या विनाशाबद्दल विचार करण्यात येऊ लागला. यामुळे जग आण्विक शस्त्रांकडे वळले. शीतयुद्धामुळे नाटो, सीटो, सेंटो तसेच वारसा पॅक्ट यांसारख्या सैनिक संघटनांचा जन्म झाला आणि यामुळे तणावाची स्थिती  वाढत गेली.

शीतयुद्धाने संयुक्त संघाची भूमिका कमी झाली. आता आंतरराष्ट्रीय समस्यांवर संयुक्त राष्ट्रसंघ दोन्ही महाशक्तींच्या निर्णयावर अवलंबून राहू लागले.

संयुक्त राष्ट्रसंघ समस्यांचे निवारण करण्याचा मंच न राहता, आंतरराष्ट्रीय संघर्षाचा मंच बनले, ज्यामध्ये  दोन्ही महाशक्ती आपापले डावपेच चालवू लागले.

शीतयुद्धाने सुरक्षा परिषदेला एकप्रकारे अपंग बनवले. ज्या सुरक्षा परिषदेवर विश्व शांतीचा भार होता. आता हीच परिषद दोन्ही महाशक्तींच्या संघर्षाचे मैदान बनले. शीतयुद्धाने शक्ती संतुलनच्या स्थानाचे रुपांतर दहशत संतुलनाच्या स्थानात केले.

 

cold-war-inmarathi
chinausfocus.com

अशाप्रकारे शीतयुद्धाचा आंतरराष्ट्रीय संबंधांवर व्यापक प्रभाव पडला. या शीतयुद्धाने संपूर्ण जगाला दोन गटांमध्ये विभाजित करून जगामध्ये संघर्षाची प्रवृत्तीला वाढण्यास मदत झाली. पण नकारात्मक प्रभावांबरोबरच याचा काही सकारात्मक प्रभाव देखील पडला.

यामुळे तंत्रज्ञान आणि तांत्रिक विकासाचा मार्ग खुला झाला. यामुळे जगाच्या राजनीतीमध्ये नवीन राष्ट्रांच्या भूमिका देखील  महत्त्वपूर्ण मानल्या जाऊ लागल्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on ““कोल्ड वॉर” – शीत युद्ध नेमकं काय होतं – समजून घ्या

 • October 23, 2018 at 11:43 pm
  Permalink

  काश्मीर मध्ये अल्पसंख्यांक आयोग का नाही याबाबत लेख लिहावा.

  Reply
 • September 10, 2019 at 6:38 pm
  Permalink

  American civil war baddal lekh lihava.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?