काजव्यांच्या प्रकाशाचं तुम्हाला माहित नसलेलं गुपित!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काजवा एक असा किटक आहे ज्याकडे आपण नेहमी कुतूहलाने पाहतो. लहानपणी उन्हाळ्यात गावी गेल्यावर एखाद्या झाडावर काजवे चमकत असतील तर ते पाहण्यास खूपच मज्जा येत असे. कारण त्या झाडावर चमकणाऱ्या काजव्यांना पाहून असे वाटे, जसे की ते झाड सोन्याने नटलेले आहे.

 

fireflies-marathipizza01

 

आपण प्रत्येकानेच पहिले आहे कि, रात्रीचे काजवे एक मंद असा विलक्षण प्रकाश फेकत असतात. सामान्यत: असे दृश उन्हाळ्याच्या रात्री दिसते. पण चंद्राच्या प्रकाशामध्ये सुद्धा या काजव्यांचे चमकणे स्पष्ट दिसते आणि हे एक आश्चर्य आहे.

विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात उबदार आणि दमट वातावरणामध्ये त्यांना प्रकाशित करणारा घटक हा अधिक सक्रीय होतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे की, जवळपास २००० पेक्षा जास्त कीटकांच्या प्रजाती या अश्या वातावरणामध्ये आपल्या अंगातून प्रकाश फेकतात.

 

fireflies-marathipizza
nationalgeographic.com

तर प्रश्न हा आहे की, कोणती गोष्ट आहे त्यांना प्रकाशित करण्यास मदत करते? चला जाऊन घेऊ या.

खरेतर हा एक केमिकल लोचा आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर काजव्याच्या शरीरामध्ये रासायनिक प्रक्रिया घडते. त्यामुळे ते चमकतात. या प्रक्रियेला bio-luminescence असे म्हणतात. परंतु हा प्रकाश लाईट बल्बसारखा नसतो.

सामान्य बल्बचा प्रकाश हा खूप उष्ण असतो, पण काजव्यांनी परावर्तीत केलेला प्रकाश हा शीतल असतो, त्यात प्रखरपणा जाणवत नाही. तरी त्यांना फायर फाइल्स म्हटले जाते, आहे की नाही गंमत…असो!

ही प्रक्रिया अधिक स्पष्टपणे समजावून घेऊ.

जेव्हा ऑक्सिजन, कॅल्शिअम, एडोनोसाइन ट्रायफॉस्फेट (ATP) आणि लुसिफेरीन हे घटक एकत्र येतात, तेव्हा लुसिफेर्सच्या प्रभावामुळे हा प्रकाश उत्पन्न होतो.

 

fireflies-marathipizza02
mnn.com

तरीसुद्धा अजूनही शास्त्रज्ञांना या काजव्यांच्या प्रकाश बाहेर फेकण्याच्या पद्धतीबद्दल ठोस असा निष्कर्ष मिळालेला नाही. कारण शास्त्रज्ञांना हे अजूनही खात्रीने सांगता येत नाही आहे की काजव्यांची ही प्रकाश बाहेर फेकण्याची पद्धत – त्यांच्या अवयवांमुळे नियंत्रित होते की ते शरीरात घेत असलेया ऑक्सिजनमुळे नियंत्रित होते.

पण शास्त्रज्ञांनी याचा मात्र शोध लावला आहे की या प्रकाशाचा वापर हे काजवे नेमका कश्यासाठी करतात.

काजवे या प्रकाशाचा वापर आपल्या साथीदाराला इशारा देण्यासाठी करतात. तसेच नर आणि मादी आपल्या संभाव्य जोडीदाऱ्याची निवड करण्यासाठी करतात. काही लोकांचे असे सुद्धा म्हणणे आहे कि, हा प्रकाश नर आणि मादीच्या मिलनासाठी आवश्यक असतो.

हे प्रकाशाचं प्रकरण आता तुमच्या लक्षात आलंच असेल. आता अजून एका गैरसमजाबद्दल जाणून घेऊया.

तूमच्यातील बहुतेकांचा असा समज असेल कि, जर आपण जास्त वेळ काजवा हातात धरून ठेवला तर तो हळूहळू प्रकाश उत्पन्न करणे बंद करेल. कारण तेव्हा तो उडू शकत नाही. पण विश्वास ठेवा हा गैरसमज आहे.

कारण प्रकाशाची निर्मिती करण्यासाठी काजव्यांनी सातत्याने उडत राहणे गरजेचे नाही.

 

fireflies-marathipizza04
traveltrikon.com

आणि – हा गैरसमज दूर करण्याचे श्रेय जाते संशोधक स्टीव्हन हॅडॉक यांना!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?