एका भारतीय व्यक्तीने न लढता मिळवले राज्य !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्या कल्पनेच्या राज्यात आपण राजे असतो. तीच कल्पना आपण सत्यात उतरवायची असल्यास आपलं घर आपले नियम (My Home my rules) या मार्गातून व्यक्त करतो. पण समजा या पृथ्वी तलावर तुम्हाला एक असा जमिनीचा तुकडा सापडला जिथे कोणाचेच राज्य नाही. फक्त तुमचेच राज्य आहे. तर तुम्ही काय म्हणाल? असं बोलणाऱ्याला तुम्ही मेंटल हॉस्पिटलचा रस्ता दाखवाल. पृथ्वीवर प्रत्येक देश इंच इंच लढवतोय आणि वेगळा जमीनीचा तुकडा साक्षात सृष्टीचा निर्माता जरी आला तरी त्याला शक्य नाही.

 

iflscience.com

पण अशी घटना घडली आहे. ती देखील काही दिवसांपूर्वीच आणि याच पृथ्वीतलावर. आश्चर्याची गोष्टं म्हणजे त्या जमीनीच्या तुकड्याचा मालक भारतीय वंशाचा आहे ! त्याचे नाव आहे सुयश दिक्षित.

 

Scoopwhoop.com

सुयश एका खाजगी कंपनीत काम करतो. तसंच या आधी त्याने  गुगल डेव्हलपर म्हणून  काम केलं आहे. सुयश मुळचा इंदोरचा आहे.
इजिप्त आणि सुदान या देशांमध्ये असलेल्या 900 चौ. मैल जागेवर सुयशने ताबा मिळवला आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने 319 किमीचा प्रवास केला. इजिप्तमधून निघताना लष्कराच्या हद्दीत शुट अँड साइड ची ऑर्डर होती. तिथे शुटिंग किंवा फोटोग्राफीलाही बंदी होती. परंतू मोठ्या धैर्याने त्याने त्याविभागातून बाहेर येत या जागेवर ताबा मिळवला. ही जागा राहण्यासाठी योग्य असल्याचे सांगत सुयोगने इथे झाडं लावण्याचा कार्यक्रमही हाती घेतला होता.

 

Kingdom of Dixit InMarathi 3
media3.mensxp.com

सुयोगने अबू सिंबील ते बीर तावील असा 319 किमीचा प्रवास मुस्तफा नावाच्या एका स्थानिक ड्रायव्हरला घेऊन केला. फक्त वाळू आणि खडतर रस्ता या गोष्टीपार करत त्याने इथपर्यंत येत आपला झेंडा रोवला आहे. इथे येण्यासाठी रस्ता नव्हताच असं सुयोग म्हणतो. तसंच आपण या देशाचे राजे असल्याचे त्याने फेसबूक वॉलवर अधिकृतपणे जाहीर केले असून युनायटेड नेशन्सकडे देश म्हणून मान्यता मिळवण्यासाठी अर्ज देखील केला आहे.

 

सुयशने दक्षिण इजिप्त मध्ये असलेल्या अबु सिंबील या ठिकाणाहून आपल्या प्रवासाला सुरवात केली. त्याकरता दोन दिवस व दोन रात्री तो कसा प्रवास करावा हा विचार करत होता. त्याने निवडलेला ड्रायव्हर मुस्तफा याला सुयश पहिलेतर मनोरुग्ण वाटला होता. थोडे जास्त पैसे दिल्यावर त्याने बीर तावील येथे नेण्यास होकार दिला. निघताना सुयशने त्याची मैत्रीण एसरा ला  सांगितले की मी जर परत आलोच नाही तर मी हरवल्याची पोलिसात तक्रार कर.

दिनांक 5 नोव्हेंबर 2017 रोजी त्याने आपल्या देशाची घोषणा केली. तसंच त्याच्या राजधानीचं नाव सुयशपूर असं ठेवलं आहे. “मी इथे आलेली पहिली व्यक्ती नाही हे मला माहित आहे. पण इथे येऊन मी रोपं लावली आहेत. तसंच युनायटेड नेशन्सकडे अर्ज केला आहे. जर कुणाला या जागेवर हक्क सांगायचा असेल तर त्यांना माझ्याशी युद्ध करून ही जागा जिंकावी लागेल.”

 

scoopwhoop.com

सुयशने त्याच्या राज्यात दोन ठिकाणी झेंडा रोवला आहे. त्यापैकी एक त्याने आपल्या राजधानी सुयशपूरमध्ये रोवला आहे.

दिक्षित साम्राज्याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :

देशाचे नाव – किंग्डम ऑफ दिक्षित

झेंडा – वर दाखवल्या प्रमाणे

लोकसंख्या – 1

स्थापनेचा दिवस – 5 नोव्हेंबर 2017

राष्ट्रीय प्राणी – पाल ( कारण इथे फक्त तोच एक प्राणी आहे.)

“मी सुयोग दिक्षित असे घोषीत करतो की मी या देशाचा पंतप्रधान व लष्कर प्रमुख आहे. तसंच आमच्या देशातील इतर कारभार पहाण्यासाठी मी अननेक पदं रिक्त आहेत. इच्छुक व्यक्ती अर्ज करू शकतात”.

तसंच सुयोगने त्याच्या वडीलांना त्यांच्या वाढदिवशी या देशाचे राष्ट्रपती म्हणून घोषीत करत त्यांना बर्थडे गिफ्ट दिले.

 

Kingdom of Dixit InMarathi 4
Scoopwhoop.com

याआधी 2014 साली जेरमिया हेथेन नावाच्या एका व्यक्तीने याठिकाणी झेंडा रोवत त्याची कन्या या राज्याची राजकुमारी असल्याचे म्हटले आहे. पण त्याने त्याव्यतिरिक्त  कोणताही अर्ज युनोकडे केलेला नाही.

आपल्या देशाचा विकास करण्यासाठी सुयोग इन्व्हेस्टर्स च्या शोधात आहे. जे त्याच्या देशात गुंतवणुक करतील.

===

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?